पैशांसाठी देश विकणारा सैनिक ! 

सैनिक देशासाठी लढतात. आपल्या देशाचा एक इंच देखील शत्रूराष्ट्राकडे जाणार नाही यासाठी प्रसंगी बलिदान देतात मग तो देश कोणताही असो जशी भारताच्या सैनिकांना भारताबद्दल आपुलकी तशीच पाकिस्तानच्या सैनिकांना त्यांच्या देशाबद्दल आपुलकी.

आत्ता विषय अशाच एका सैनिकाचा. त्यानं काय केलं तर देश विकला. समाधानकारक गोष्ट इतकीच की स्वत:चा देश न विकता दूसराच देश विकला. कोणाला विकला तर आपल्याच नागरिकांना. तो देशातील नागरिकांनी विकत पण घेतला. पण इथच हे प्रकरण संपत नाही तर नंतर लक्षात आलं असा कोणताच देश अस्तित्वाच नव्हता ! 

किस्सा अफलातून टोप्या घालणाऱ्या माणसाचा मध्ये हि पहिली कथा देश विकणाऱ्या सैनिकाची. 

किस्सा आहे १८२१ सालचा.

जेव्हा ब्रिटीश लोकं अक्ख्या जगावर राज्य करत होते, तेव्हा या माणसाने ब्रिटिशांच्याच नाकाला चुना लावला होता. या माणसाचा कारनामा असा की त्याने एक असा देश विकायला काढला होता, जो कधी अस्तित्वातच नव्हता. विशेष म्हणजे त्याने या देशातील मोठ्या प्रमाणातील जमीन-जुमले ब्रिटीश जनतेला विकले देखील होते आणि नंतर तो पैसे घेऊन फरार झाला होता.

ग्रेगर मॅकग्रेगर हा ब्रिटीश सैन्यदलात सैनिक म्हणून कार्यरत होता. इंग्रजांनी द. अमेरिकेतलं युद्ध संपवलं होतं आणि बहुतेक ब्रिटीश सैनिक मायदेशी परतले होते. ग्रेगर देखील इंग्लंडला पोहोचला होता. सैनिक म्हणून तो शुरच होता, त्यामुळे लोकांना त्याच्याकडून युद्धाचे किस्से ऐकायला खूप आवडायचं.

ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर देखील तो लोकांना युद्धाच्या रम्य कथा सांगत असे. या कथा सांगताना त्याने एक शक्कल लढवली आणि तो लोकांना सांगायला लागला की मध्य अमेरिकेतील एक देश नव्यानेच स्वातंत्र्य झाला आहे. आपल्या युद्धातील शौर्याबद्दल हा देश आपल्याला मिळाला असून आपण या देशाचे राजे आहोत.

हा देश जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असून, हा देश म्हणजे सर्वांच्याच कल्पनेतील स्वर्गीय स्थळ आहे. आपण सर्वांनी ज्या सुंदर जागेची कल्पना केलेली  असते, अशी जागा याच पृथ्वीतलावर आहे. आपण फक्त त्या जागी जाऊन ती अधिक विकसित करणं आवश्यक आहे, असं तो लोकांना सांगत असे.

ग्रेगरने या देशाला ‘पॉइस’ असं नांव दिलं होतं.

12
wikipedia

ग्रेगर लोकांना या देशाविषयी जे काही सांगत असे ते अविश्वसनीय असंच होतं, पण तो गोष्ट इतक्या खुबीने पटवून देत असे की लोकांना त्यावर विश्वास बसत असे. ग्रेगर लोकांना या देशात गुंतवणूक करण्यासाठी सांगत होता. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ग्रेगरने नकली चलनी नोटा देखील छापल्या होत्या. या सर्व गोष्टींमुळे लोकही त्याच्यावर विश्वास ठेऊन पॉइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी  उत्सुक होते.

१९२१ साल संपता संपता ग्रेगरने पॉइसमधील जमिनी विकून जवळपास २ लाख डॉलरएवढी रक्कम जमवली होती. ज्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या त्या लोकांना पॉइसमध्ये घेऊन जाण्यासाठी त्याने ७ जहाज विकत घेतले होते. ब्रिटनमधील लोकांना पॉइसच्या दिशेने पाठवून ग्रेगर स्वतः मात्र फ्रांसला निघून गेला होता.

लोकांना घेऊन निघालेलं जहाज ज्यावेळी पॉइसला पोहोचलं, त्यावेळी लोकांना समजलं की आपली फसवणूक झालेली आहे. जवळपास २०० लोक त्यावेळी पॉइसला पोहोचले होते. हे एक रुक्ष ठिकाण होतं, जे राहण्याच्या देखील लायकीचं नव्हतं. फसवणूक झालेले लोक परत माघारी आपल्या मायदेशी निघाले पण त्यातले बरेच लोक परतू शकले नाहीत, प्रवासादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

13
wikipedia

फ्रांसमध्ये पोहोचलेल्या ग्रेगरने तिथे देखील आपली हीच स्कीम सुरु केली. तिथे देखील सुरुवातीला त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला, लोकांनी जमिनी  विकत घेतल्या. पण फ्रांसच्या लोकांनी थोडी चौकसबुद्धी दाखवली आणि खरच अशी जागा आहे का, याचा शोध घेतला त्यावेळी ग्रेगरचं पितळ उघडं पडलं. ग्रेगरला अटक करण्यात आली.

पुढे तो  व्हेनेझुएलाला निघून गेला. तिथे त्याने व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला आणि शौर्य देखील गाजवलं. त्यामुळे ज्यावेळी ग्रेगर मॅकग्रेगरचा मृत्यू झाला त्यावेळी व्हेनेझुएलाच्या सैन्याने राजकीय सन्मानासह त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.