महागुरू ‘गुगल’ला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !!!

गुगल.

गुगल म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचा, आमचा आणि आपल्या सर्वांचा ‘महागुरू’

बाकी कुणी कितीही महागुरू असल्याचा दावा करू द्यात पण ‘गुगल’ हाच आपला आजच्या डिजिटल युगातील ‘महागुरू’ असल्याचं तथ्य आपल्याला ठरवलं तरी नाकारता येत नाही.

कुठलीही माहिती हवी असेल तर केवळ हाताचे काही  बोट फिरवायचा तेवढा अवकाश. एका क्लिक सरशी जगभरातली माहिती ‘गुगल’ तुमच्यासमोर उपलब्ध करून देतं.

तर आजच्या शिक्षक दिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय आपल्या या ‘महागुरू’विषयीच्या काही रंजक गोष्टी. या गोष्टी आपल्याला माहित असायलाच हव्यात.

गुगलची स्थापना 

गुगलची स्थापना ४ सप्टेबर १९९८ रोजी ‘लॅरी पेज’ आणि ‘ब्रिन सर्जी’ या स्टँनफोर्ड विद्यापीठातील २ विद्यार्थ्यांनी मिळून केली होती.

backrub

स्थापनेपूर्वी  जवळपास वर्षभर हे सर्च इंजिन ‘बॅकरब’ या  नावाने ओळखलं जात असे. कारण त्यावेळी हे सर्च इंजिन ‘बॅक लिंक्स’च्या आधारावर काम करत होतं. स्टँनफोर्ड विद्यापीठाच्या सर्व्हरवरच ‘बॅकरब’ कार्यरत होतं.

१९९७ साली संस्थापकांना वाटलं की ‘बॅकरब’ हे नाव तितकंस चांगलं नाही. त्यामुळे या ‘सर्च इंजिन’साठी नवीन नावाचा ‘सर्च’ सुरु झाला. मोठ्या प्रमाणात काथ्याकूट झाल्यानंतर स्टँनफोर्ड विद्यापीठातच शिकत असलेल्या सीन अँडरसन या विद्यार्थ्याने एक नाव सुचवलं. अँडरसनने सुचवलेलं हे नाव होतं ‘गुगोलप्लेक्स’

स्पेलिंग मिस्टेकमुळे मिळालं ‘गुगल’ हे नाव 

‘गुगोलप्लेक्स’ हे नाव शॉर्ट करून ‘गुगोल’ हे नाव स्वीकारण्याचा निर्णय झाला. एकदा निर्णय पक्का झाल्यानंतर अँडरसनने चेक केलं की डोमेननेम उपलब्ध आहे की नाही. पण झालं असं की चेक करताना अँडरसनने स्पेलिंगमध्ये मिस्टेक केली आणि टाकलं ‘गुगल’

अँडरसनने चुकून ‘गुगल’ असं स्पेलिंग टाकलं होतं पण तेच नाव लॅरी पेज यांना अधिक आवडलं आणि सर्च इंजिनने ‘गुगल’ हे नाव धारण केलं.

rajan seth
राजन सेठ

जी-मेल ही गुगलची अत्यंत लोकप्रिय ई-मेल सेवा. १ एप्रिल २००४ पासून जी-मेलची सुरुवात करण्यात आली. ही सेवा आणि गुगलचे इतरही अॅप डेव्हलप करण्यात राजन सेठ या भारतीय माणसाचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळेच ते ‘फादर ऑफ गुगल अॅप्स’ म्हणून देखील ओळखले जातात.

तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल पण १९९९ साली गुगलने स्वतःला विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं होतं. ‘एक्साईट’ नावाच्या कंपनीकडे १ डॉलरमध्ये गुगल विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र कंपनीच्या सीइओने हा प्रस्ताव नाकारला आणि हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. आज ‘गुगल’चं बाजारमूल्य काय आहे ते जरा ‘गुगल’ करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हालाही सांगा.

जाता जाता – तुमच्या मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर ‘गुगल सर्च’मध्ये जाऊन askew सर्च करा आणि काय गंमत होते बघा.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.