घरच्यांनी लव्ह मॅरेजला होकार देण्यासाठी हे उपाय करा.

भारतात असणारी संस्कृती आणि रूढी परंपरा यांमुळे भारताची एक वेगळी ओळख आहे. अजून देखील आपल्या देशात मुले आपल्या आई वडिलांच्या आज्ञे बाहेर काहीच करू शकत नाहीत. काहीही करायचं म्हणल तर घरातल्यांची परवानगी घ्यावीच लागते आणि कधी कधी समजूत ही काढावी लागते.

आज देखील भारतात लव्ह मॅरेज करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मानले जाते. प्रत्येक आई वडिलांची हीच इच्छा असते कि त्यांच्या मुलीने किंवा मुलाने लव्ह मॅरेज न करता त्यांच्या आवडीचा मुलगा किंवा मुलीशी लग्न करावे, असे झाल्यास त्यांना त्यांच्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटत असतो.

पण अडचण येते ती लव्ह मॅरेज करू इच्छिणाऱ्या मुलांची. तर आज आम्ही तुम्हाला तुमची लव्ह तुमच्या आई वडलांनी मान्य करण्यासाठी काय करावे हे सांगणार आहोत. म्हणजेच तुमच्या आई वडिलांची लव्ह मेरेज करण्यासाठी तुम्ही सहज समजूत काढू शकाल.

आपल्या जवळच्या लोकांना सांगा.

अगदी सुरवातीला तुम्ही तुमच्या प्रेमाविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगितले पाहिजे, ही व्यक्ती तुमच्या घरातल्यांच्या ही तितकीच जवळची असली पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यातच जर तुम्ही तुमचे चुलत भाऊ, बहीण किंवा घरातील काकी, मामी या लोकांना विश्वासात घेऊन सांगितल तर तुमच्यासाठी अधिक योग्य होइल. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलाना याबाबत बोलाल तेव्हा हे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील.

मित्र म्हणून ओळख करून द्या. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या पार्टनरची ओळख करून देताना, सरळ सरळ बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड म्हणून करून देऊ नका आधी त्यांची ओळख मित्र किंवा मैत्रीण म्हणून करून द्या. तुमच्या घरातल्या कार्यक्रमांमध्ये किंवा इतर ठिकाणी घेऊन जा जेणेकरून ओळख वाढेल. तुमच्या पार्टनरला घरातल्या लोकांना काय आवडत काय नाही हे नीट समजून सांगा. जेणेकरून तुमचा पार्टनर तुमच्या घरातल्या लोकाना आवडणार नाही असे काही वागणार नाही.

सयम बाळगा आणि वाट पहा. 

अनेक वेळा अस होत कि पहिल्या भेटीत आपले आई वडील आपले प्रेम नाकारतात. अशावेळी आपले काही होणारच नाही असा विचार करून उगाच गडबड करू नका आणि पॅनिक होऊ नका. अशा वेळी संयम बाळगा आणि वाट बघा नक्कीच तुम्हाला घरातल्यांकडून अपेक्षित निर्णय मिळेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.