बंगाली बाबूने अमेरिकेत पहिला स्ट्रीपक्लब सुरू केला जिथं बाप्ये नाचलेलं बघायला बाया यायच्या.

सुबह होने ना दें, साथ खोने ना दें
एक दूसरे को हम सोने ना दे
तू मेरा हीरो तू मेरा हीरो

हे गाणं ऐकलं की देसी बॉईज पिक्चरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तो पिक्चर आठवला म्हणजे एकदम प्लेबॉय क्लब आठवला असेल ना. या प्लेबॉय क्लबला मेन्स स्ट्रीपर्स क्लब पण म्हणतात, बरं का…

आता हा पिक्चर २०११ मध्ये आला. तेव्हा कुठं अर्ध्या जनतेला मेल स्ट्रीपर्स म्हणजेच प्ले बॉईज माहीत झाले असतील. मग तुम्हाला वाटलं असेल हा शोध आत्ताच लागला असावा. पण नाही असं नाहीये ते..

एका बंगाली बाबूने १९७९ मध्ये चिप अँड डेल नावाचा स्ट्रीप क्लब काढला होता. जिथं पुरुष इरॉटिक डान्स करायचे आणि बायका बघायला जायच्या. आहे किनई गंमत. पण पुढं याच बंगाली बाबूने सुपारी देऊन आपल्या कोरिओग्राफरचा खून केला आणि पुढे जेलमध्ये आत्महत्या केली.

नक्की काय झालं होतं त्याचीच ही गोष्ट.

तर तुमच्यातल्या काही वाचकांनी ह्या चिप अँड डेल नावच मेन्स स्ट्रीप डान्स क्लब माहीत असेल. नसला तरी काही फरक पडत नाही, आणि तसं ही तो क्लब अमेरिकेतच होता म्हणा. आपण आपली गोष्ट वाचूया.

हे क्लब त्यावेळच नॉर्थ अमेरिकेतल सगळ्यात फेमस क्लब होत. १९७९ मध्ये या क्लब मध्ये गडी नाचवायला आणि बायांना आपलं ग्राहक बनवायला या क्लबच्या मालकाने सुरुवात केली.

या मालकच नाव होत, सोमेन उर्फ स्टीव्ह बॅनर्जी. सोमेनचा जन्म १९४६ मध्ये मुंबईत झाला. साठच्या दशकाच्या आसपास तो अमेरिकेला गेला. आता या सोमेनला बाया नाचवण्याचा जाम शौक होता. कारण त्यातून अफाट पैसा मिळायचा.

मग यान अमेरिकेत जे जे क्लब बंद पडायच्या मार्गावर आहेत, ते विकत घ्यायला सुरुवात केली. आणि फिमेल एक्झॉटिक डान्सर्स ठेवायला सुरुवात केली. त्याच्या काही क्लब मध्ये तर त्यान बायकांची कुस्ती चिखलात लढवली. खरी कुस्ती म्हणता येणार नाही त्याला. आपली मजेमजेतली कुस्ती असायची ती.

त्यानं १९७९ मध्ये आपल्या एका क्लबच नामकरण केलं चिप अँड डेल्स. आणि तिथं पुरुष डान्सर्स नाचायला ठेवले.

अमेरिकेतला तो पहिला असा क्लब होता जिथं बायका पुरुषांना नाचताना बघायला जायच्या. त्याची ही कन्सेप्ट खूपच पॉप्युलर झाली. आता आपल्या इथल्या सारख्या अमेरिकेतल्या बाया लाजाळू नाहीत. त्या मस्त पैकी सॅटरडे नाईट एन्जॉय करायला या क्लब मध्ये जायच्या, आणि अमाप पैसा उधळून यायच्या.

याचा परिणाम असा झाला की सोमेन थोडयाच दिवसात मालामाल झाला. तो नॉर्थ अमेरिकेतल्या श्रीमंतांमध्ये गणला जाऊ लागला. पण सोमेन लाईमलाईट पासून नेहमीच लांब राहायचा.

त्याला भरधाव गाड्या, मोठमोठाल्या गढ्या, जमीनजुमला, बाया आवडायच्या. जस एखाद्या श्रीमंत थाटवाल्या पुरुषाला आवडेल अगदी तसंच. पण हा सोमेन तसा इर्षेबाज पण होता. त्याच्यावर अमेरिकेतले त्याच्या क्लबच्या तोडीस तोड चाललेल्या क्लबला जाळल्याच्या दोन केसी सुद्धा पडल्या होत्या.

या चिप अँड डेल्स क्लबच्या यशामाग एक रहस्य होत. ते म्हणजे निक डे’नोईया.

हा निक एमी अवॉर्ड विनिंग डायरेक्टर होता, जो चिप अँड डिल्सचा कोरियोग्राफर पण होता. या निकच आणि सोमेनच चांगलंच सूत जुळलं होत. पण १९८७ मध्ये त्या दोघांचं वाजलं, ज्याचा परिणाम सोमेनने निकचा खून केला.

त्याच झालं असं होतं की, सोमेनने निकला न विचारताच त्याच्या काँट्रॅक्ट मध्ये बदल केला. ज्याचा परिणाम निकने सोमेनला कोर्टात खेचलं. पुढं सोमेनने रे कोलोन याला हायर केलं. हा रे एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर होता ज्याने न्युयॉर्क मध्ये निकवर गोळी झाडली.

जेव्हा या खुनाचा तपास पोलिसांनी सुरू केला तेव्हा सस्पेक्ट म्हणून पोलिसांनी पहिल्यांदा सोमेनलाच धरला. पण सबळ पुरावे मिळाले नाहीत आणि सोमेन सुटला.

१९९० मध्ये सोमेनने परत रे शी संपर्क साधला. आणि त्याने यावेळी ३ माणसांना उडवण्याची सुपारी दिली. यात चिप अँड डेल्सचा जुना कोरियोग्राफर माईक फ्युलिंगटान आणि २ जुने डान्सर्स होते. या तिघांनी पण सोमेनचा क्लब सोडला होता आणि त्याच्याच रेस मध्ये नवीन क्लब या तिघांनी सुरू केला होता. त्यामुळं सोमेनचा तिळपापड झाला होता.

यावेळी रे ने स्वतः या माणसांना उडवण्याऐवजी नव्या माणसाला हायर केलं. हा माणूस एफबीआयचा इन्फॉर्मर होता. आणि तेव्हापासूनच सोमेनचा डाऊन फॉल सुरू झाला अस म्हणायला हरकत नाही. १९९३ मध्ये सोमेनला अटक करण्यात आली. ऐशोआरामत राहिलेल्या सोमेनला जेलच राहणीमान काय सहन होईना म्हणून त्याने २३ ऑक्टोबर १९९४ ला राहत्या जेलमध्ये फास लावून घेतला.

या सोमेनच्या आयुष्यावर सलमान खान पिक्चर बनवणार होता. पुढं त्याच काय झालं हे कुणालाच माहीत नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.