नेहरूंच्या विरोधानंतरही अशा प्रकारे सोमनाथ मंदिराचे पुर्ननिर्माण करण्यात आले होते.

ऑक्टोंबर १९४७ मध्ये जूनागढ संस्थान भारतात सामिल होताच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणाची घोषणा केली होती. सरदार पटेल यांच्या अकस्मित निधनानंतर त्यांच हे स्वप्न के.एम. मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालं होतं. 

के.एम. मुन्शी एक राजकिय विचारवंत, सक्रिय राजकारणी, भारतीय संस्कृती आणि सभ्येतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोध असताना देखील सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणाचे काम पुर्ण करण्यात आले. 

मुन्शी यांनी १९२२ मध्ये लिहल होतं की, 

“सोमनाथ मंदिराचे भग्न अवशेष पाहीले की मनाला पिडा होते. मंदिराची विटंबना, ते जाळले जाणं आणि त्याची मोडतोड केल्यानंतरही भारतीय सभ्यता म्हणून आपण ते सहन केल आहे. ते लिहतात की त्या मोडलेल्या तुकड्यावरून चालत असताना मला लाज वाटत होती.” 

जूनागडच्या नवाबाने सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणास नकार दिला होता. मात्र ऑक्टोंबर १९४७ रोजी जूनागड संस्थान भारतात सामिल झाले आणि त्याचवेळी आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत सरदार पटेल यांनी घोषणा केली की, 

नवीन वर्षांच्या सुरवातीस सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणास सुरवात करण्यात येईल. त्यासाठी सौराष्ट्रातील या लोकांनी पुर्णपणे जबाबदारी उचलण गरजेच आहे. हे एक पवित्र काम असून सर्वानी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. 

सरदार पटेल यांच्या या निर्णयाचा विरोध केला तो तत्कालीन शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी. ते मंदिराच्या पुर्ननिर्माणाच्या विरोधात होते. त्यांच्या मते मंदिराचे भग्न अवशेष पुरात्त्तव सर्वेक्षण च्या ताब्यात द्यायला हवेत. एक इतिहासिक ठेवा म्हणून हे अवशेष जपून ठेवता येईल. 

पण सरदार पटेल यांनी घोषणा करत असतानाच आपला निर्णय ठाम ठेवला होता. त्यांनी अबुल कलाम यांना एक नोट पाठवली. त्यामध्ये सरदार पटेल म्हणाले, सोमनाथ च्या मंदिरासोबत हिंदूंची भावना व्यापक आहे. सध्याच्या वातावरणात मंदिराचे पुर्ननिर्माण केल्यानंतर सर्वजण संतुष्ट होती. इतिहास पाहता या मंदिरासोबत हिंदू समाजाची प्रतिष्ठा देखील जोडली गेली आहे. 

Screenshot 2019 05 28 at 6.01.56 PM

त्यानंतर मंदिराच्या पुर्ननिर्माणासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले. 

१५ डिसेंबर १९५० रोजी सरदार पटेल यांचे निधन झाले., तत्पुर्वीच मंदिराच्या पुर्ननिर्माणासाठी सहमती देणाऱ्या महात्मा गांधी यांची देखील हत्या करण्यात आली होती.  यानंतरच्या काळात मंदिर पुर्ननिर्माणाबाबतीत आघाडीवर असणाऱ्या मुंशी आणि वी.एन. गाडगीळ यांच्याबद्गल नेहरूंच्या मनात कटूता निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येत.

याच दरम्यान मुंशी यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे मंदिराचे काम पुर्णत्वाकडे नेलं आणि मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रण दिले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या दरम्यान मुंशी यांना बोलावून घेतलं व त्यांना म्हणाले, 

मला हे अजिबात आवडलं नाही की आपण सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणासाठी काम करत आहात. हा हिंदू पुररुत्थानवाद आहे. 

त्या भेटीनंतर मुंन्शी यांनी २४ एप्रिल १९५१ रोजी नेहरूंना एक पत्र लिहले. हे पत्र खुले झाल्यामुळेच नेहरूंच्या मंदिर पुर्ननिर्माणाबाबतच्या भावना, सोमनाथ मंदिरास असणारा विरोध समोर येवू शकला. हे पत्र मुन्शी यांचे आत्मचरित्र पिलग्रिमेज टू फ्रिडम या पुस्तकात देखील छापण्यात आले आहे. 

त्यामध्ये मुन्शी लिहतात. 

WMP मंत्रालयाच्या स्थायी समितीने १३ डिसेंबर १९४७ रोजी गाडगीळांच्या या प्रस्तावास मंजूरी दिली होती. भारत सरकार मंदिराच्या मुळ स्वरुपाची पुर्ननिर्मीती करेल व त्याचसोबत मंदिर परिसरातील एक वर्ग किलोमीटरचा परिसर देखील सुशोभिकरण करण्यात येईल. या प्रस्तावाची व मंजूरीची नोंद बैठकीच्या नोंदीमध्ये देखील करण्यात आली आहे. या नंतर भारत सरकार मार्फत वास्तुकारांना प्रभास चा दौरा करण्यास सांगण्यात आला होता. त्यांनी तो दौरा करून एक विस्तृत रिपोर्ट दिला होता.

या नंतर महात्मा गांधीसोबत पुर्ननिर्माणाबाबत चर्चा करण्यात आली होती तेव्हा महात्मा गांधींनी मंदिरास भारत सरकारने पैसे न देता लोकांच्या सहकार्यातून पैसे गोळा करुन ते वापरण्यात यावेत असा विचार मांडला होता. त्यांची सूचना मान्य करत हा पैसा लोकांमधून गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

भारत सरकारने फक्त मंदिराच्या पुर्ननिर्माणाबाबतीचा सुरवातीचा निर्णय न घेता तो यासाठी एक विस्तृत योजना तयार केली. त्यासाठी एक समिती देखील गठित करण्यात आली. आपणास ठावूक असावं भारत सरकारच मंदिराच्या पुर्ननिर्माणासोबत कशाप्रकारे जोडले गेले आहे. 

आपण काल हिंदू पुनरुत्थानवादचा उल्लेख केला. आपल्या भूतकाळाविषयी आस्था मला वर्तमान काळात काम करण्यासाठी आणि भविष्याकडे पाहण्याची शक्ती देते अस मला वाटतं. माझ्या स्वातंत्र्याचं तो पर्यन्त मूल्य नाही जोपर्यन्त हे स्वातंत्र भगवत गितेपासून मला वंचित ठेवतं असेल. या मंदिराचे पुर्ननिर्माण झाल्यास आपल्या जनतेत धर्माबद्गल पवित्रताच निर्माण होईल. आणि हि पवित्रताच आपणास नव्या स्वतंत्रास आवश्यक ठरेल. 

त्यानंतर नागरी विकास आणि पुर्नवसन मंत्री गाडगीळ यांनी देखील नेहरूंचे आरोप चुकीचे ठरवले होते. सोमनाथ मंदिराच्या पुर्ननिर्माणाचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीतच घेण्यात आल्याच व त्यासाठी सरकारने १ लाख रुपये खर्च केल्याच सांगण्यात आलं. नेहरूच्या विरोधानंतरही राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.