तो १ जानेवारीचा कटू दिवस.. अख्खा देश सोनईच्या तिहेरी हत्याकांडामुळे हादरला होता…

१ जानेवारी म्हणजे नवं वर्ष, नवा संकल्प, नवी स्वप्न आणि नवा ध्यास असतो. लोक नवनवे संकल्प करण्यात व्यस्त असतात. वृत्तपत्र म्हणू नका टीव्ही चॅनेल्स म्हणू नका सगळीकडेच कसं नवीन वर्षच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतो.

पण…२०१३ हे वर्ष याला अपवाद ठरलं होतं.

त्या दिवशी वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सनी एकच गहजब माजवला होता. १ जानेवारी २०१३ ला आपल्या कॅमेरामॅनसह भारतभरातील माध्यम प्रतिनिधी वार्तांकन करायला अहमदनगरच्या नेवासा जवळच्या सोनईजवळ पोहोचले होते. जिथे तिथे फक्त एकच चर्चा सुरू होती…सोनई हत्याकांडाची

सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण केल्यामुळे सचिन घारू आणि त्याच्या दोन दलित मित्रांची सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं १ जानेवारी २००३ रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.

हे तिहेरी हत्याकांड घडलं होत कारण…

सोनईच्या गणेशवाडी शिवारातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ती मुलगी. ही मुलगी नेवासा फाट्यावर असलेल्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. या संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

तिच्या प्रेमप्रकारणाबाबत कोणीतरी तिच्या घरात चुगली केली. घरी समजल्यानंतर प्रकरणान गंभीर वळण घेतल. त्या मुलीच्या घरच्यांनी सचिनला समज देण्यासाठी बोलावलं. जेव्हा सचिन आला तेव्हा त्याला तिच्या घरच्यांनी सांगितलं की, पोरीपासून लांब रहायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील.

थोडे दिवस गेले पण तसं काही घडलंच नाही. उलट सचिनचे मित्र संदीप राज धनवार, राहुल कंडारे त्याला प्रेमप्रकरणात मदत करायला लागले. याची माहिती तिच्या घरच्यांना समजली. मग घरच्यांनी या तिघांचा काटा काढायचं ठरवलं, त्याप्रमाणे थंड डोक्याने प्लॅन केला.

या खुनाच्या कटात मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्यांचा सहभाग होता.

कटाप्रमाणे या कुटुंबियांनी संदीप राज धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू हे तिघे काम करत असलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये एक निरोप धाडला.

स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे म्हणून तिघांना विठ्ठलवाडी इथं तिघांना बोलावून घेतलं. जसे का हे तिघे आले पोरीच्या घरच्यांनी डाव साधला.

पहिल्यांदा संदीप राजू थनवारला पकडलं. संदीप हा अंगाखांद्यान धिप्पाड असल्यान त्याला संपविणे इतक सोप नसल्याचं पाहून सर्व आरोपींनी एकत्र येत संदीपला तो ज्या सेफ्टी टँकमध्ये काम करत होता त्याच टँकच्या पाण्यामध्ये त्याच डोक खाली आणि पाय वर करून पाण्यात बुडवून ठार केलं.

हा प्रकार पाहून राहूल उर्फ तिलक राजू कंडारे हा जीवाच्या भीतीन शेतातून जिकड वाट मिळेल तिकड पळत सुटला. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. तो सापडत नाही असं दिसल्यावर त्याला ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून जखमी केल. वर्मी घाव बसलेल्या राहूल कंडारेने अवघ्या काही क्षणातच प्राण सोडला.

आरोपींच्या मनात संदीप आणि राहुल यांच्यापेक्षा सचिन धारू याच्या विषयी राग जास्त होता. त्यामुळे सचिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण, त्याचाही पाठलाग करून पकडण्यात आल. ज्या ठिकाणी सचिनला पकडले त्या ठिकाणाजवळील शेत गट नंबर २९८/२ मधील शेतातील खड्डयात नेवून वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये सचिनला जिवंत टाकून त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून व दोन्ही हात खांद्यापासून कापून वेगळे केले. नंतर जिवंतपणे त्याची मान अडकित्त्यामध्ये घालून ती धडापासून वेगळी करून क्रूरपणे त्यास ठार मारले.

आरोपींनी निर्दयपणे व थंड डोक्याने परंतु अतिशय नियोजनबद्धपणे हे हत्याकांड केले.

हत्याकांड झालं.. आता आरोपींनी पुरावे नष्ट करायला सुरुवात केली.

आरोपींनी या हत्याकांडाचा सुगावा लागू नये, कोणताही पुरावा आपल्या विरुद्ध सापडू नये याची काळजी घेतली. त्यात त्यांनी सचिन धारू याचे कापलेले दोन्ही हात व पायाचे तुकडे करून शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये टाकले. त्याचे धड, मुंडके आणि राहुल कंडारे याचे प्रेत तिथूनच जवळच असलेल्या शेत गट नंबर २९३ मधील शेतातील कोरड्या ४० फूट खोलीच्या विहिरीमध्ये नेऊन खड्डा करून पुरले.

तिहेरी हत्याकांड घडवून आणतांना सर्व आरोपींच्या अंगावर मयतांचे रक्त सांडले होते. त्याचा पुरावा मिळू नये म्हणून सर्वच आरोपींनी स्वत:च्या अंगावरील रक्ताने भरलेले कपडे शेतातच जाळून टाकून पुरावा नष्ट केला. संदीप थनवार याचा मृतदेह मात्र त्यांनी तसाच सेफ्टी टँकमध्ये ठेवला व त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची खबर सोनई पोलिसांना दिली.

पुढे हत्याकांड उघडकीस आल्यावर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे खून केल्याचा जबाब दिला. शिवाय जे केले त्याची खंत नसून शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी जबाबात म्हटले होते. ही घटना घडल्यानंतर २० दिवसानंतर हे हत्याकांड माध्यमाने उचलून धरले. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा तपास योग्य रीतीने होण्यासाठी आदेश दिले होते.

हत्याकांडात मारला गेलेला सचिन घारू याची आई कलाबाई घारू हिने म्हंटलेलं एक वाक्य१ जानेवारीला सर्व न्यूज चॅनेल्सवर झळकल होत.

पोरीसंगं प्रेम करून माझ्या पोरानं कोणता गुन्हा केला, ते दोघं लगीन करणार होते, पण सचिनला मारून टाकलं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.