या बाबांनी दिलेला लाल धागा सोनिया गांधी कायम आपल्या हातात बांधतात…

सुरुवातीपासूनच कॉंग्रेस देखील हिंदुत्ववाद स्वीकारतो असं बोललं जातं, या बोलण्याला तसेच सुसंगत असे उदाहरणं आपण इतिहासातही पाहू शकता आणि अगदी वर्तमानकाळातही ..

सोनिया राजकारणात आल्या परंतु त्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या राजकारणाला बळी गेल्या होत्या.

सोनिया मुळच्या इटालिअन आहेत, विदेशी आहेत म्हणून त्यांना कितीतरी प्रकारच्या वादाला आणि विरोधाला सामोरे जावे लागले हे आपण पाहतच आलो आहोत.

कदाचित याच राजकारणामुळे ते उघडपणे त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल, त्यांच्या माहेरच्या कुटुंबाबद्दल बोलत नाहीत. लग्न करून भारतात आल्यापासून त्यांनी भारतालाच आपला देश मानलं आणि या देशाच्या मातीत, संस्कृतीत परंपरागत मिसळून गेल्या. याची उदाहरणं वेळोवेळी दिसतील.

त्या जन्माने जरी कॅथलीक असतील तरी त्या भारतीय परंपरेला साजेशा हिंदुत्वावर त्यांची श्रद्धा आहे.

स्वतःला सेक्युलर म्हणवून घेत असल्या तरी त्या हे कधीही अमान्य करणार नाही कि,

त्यांनी देखील  आपल्या सासूबाईंप्रमाणे पूजा-अर्चा घडवल्या होत्या. तसेच त्यांनी २००१ मध्ये कुंभमेळ्यात पवित्र स्नान देखील केले होते. कदाचित कौटुंबिक परंपरा कायम राखत त्या स्वतःच कधी धार्मिक झाल्या त्यांनाच कळले नसेल.

संसदेत भाजप जेंव्हा जेंव्हा सोनिया यांच्यावर विदेशी मुळांवर हल्ले करीत तेंव्हा तेंव्हा त्या हिंदुत्वाचा आधार घेत असत. त्यांना एक धार्मिक गुरूचा खूप आधार वाटायचा. ते गुरु म्हणजे नवी दिल्लीतल्या रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी गोकुळानंद हे होते. त्यांना सोनिया मोठे बंधू मानायच्या.

गोकुळानंद यांनी बंधुभावाची खुण म्हणून दिलेला एक लाल धागा त्या नेहेमीच आपल्या मनगटावर बांधत असायच्या. त्यांच्या सासूबाईंसारख्या सोनिया देखील धार्मिक बनत गेल्या होत्या.

सोनिया यांची त्या लाल धाग्यावर खूप श्रद्धा आहे.

सोनिया घरात काही सण समारंभ असले कि त्या त्यांच्या घराण्याच्या पुरोहितांना वाराणसीहून बोलवून घ्यायच्या. घरातल्या धार्मिक संस्काराचं अधिष्ठान त्या कार्यक्रमाला देतात.

जेंव्हा प्रियांका गांधींना मुलगा झाला तेंव्हा देखील त्यांनी आपल्या नातवाच्या नामकरण समारंभाला त्याचं गुरुजींना बोलवले.

१९९७  साली गुजरातमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ले झाले आणि त्यात अनेक मिशनरी मृत्युमुखी पडले पडले होते. हे मिशनरी हिंदूंच्या धर्मांतराला फूस देत होते असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. तेंव्हा आपल्या धर्मावरून काहीतरी गोंधळ होणार हे सोनीया जाणून होत्या.

त्या वादग्रस्त वातावरणात  सोनिया गांधींचे सल्लागार त्यांना सुचवतात देखील की, लोकं तुम्हाला या मुद्द्यावरून भडकवण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही अज्जिबात बळी पडू नका.

ख्रिश्चन लोकांची बाजू घेऊन तुम्ही पुढे यावं असा त्यांचा एकंदरीत डाव आहे पण तुम्ही यात फसू नका.

सल्लागारांचं ऐकल्या आणि त्या शांत राहिल्या. मात्र त्यांचं हे गप्प राहणं देखील विरोधकांना खपत नव्हते. त्यांचा मेन उद्देश साध्य होत नाही मग ते शेवटी त्यांच्यावरच्या टीकेचा रोख बदलला.

“ही बाई कॅथलिक धर्मापासून इतकी लांब का राहते? तिला स्वतःच्या धर्माबद्दल एवढा न्यूनगंड का वाटतो?”

तेंव्हाही त्या शांतच राहणं योग्य समजलं होतं.  सोनियांच्या लक्षात येऊन जाते की, आपण काहीही केलं, आपण काहीही बोललं तरीही आपलं इटालियन ‘मूळ’ हे आपल्याला लागलेला कायमचा डाग आहे हे त्या समजून जगतात.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.