सोनिया गांधींचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नान मोठा राजकीय मुद्दा बनला होता

अलीकडच्या काळात कॉंग्रेस सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळतंय असं बोललं जातं ह्या तर्काला सुसंगत असे तगडे उदाहरणं आपण इतिहासातही पाहू शकता आणि अगदी वर्तमानकाळातही ..

त्यातल्या त्यात २०१४ मध्ये कॉंग्रेस पडल्यानंतर त्यांना उमजले असणार कि, आता सारखं -सारखं अल्पसंख्यांकाना कुरवाळत बसण्यात पॉईंट नाही तर आता थोडफार बहुसंख्यांककडे देखील झुकलं पाहिजे म्हणून राहुल गांधीनी २०१७ च्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्वावर भर दिला होता.

हिंदुंची मतं मिळावी म्हणून राहुल गांधींनी गुजरात मधील  २०१७ मध्ये तब्बल १९ पेक्षा अधिक मंदिरांना भेट दिली होती.

प्रियांका गांधीचं बोलायचं झालं तर, २०१९ मध्ये त्यांना जेंव्हा कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती तेंव्हा त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात स्नान करून या कामाची सुरुवात करणार अशी घोषणा केली होती.

आता आपण इतिहासातील उदाहरणं बघूया..

इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये ‘आम्ही हिंदुचे रक्षण करतो’ म्हणुन काश्मीरची विधानसभा निवडणूक  लढवली होती तर राजीव गांधींनी सुद्धा बाबरी मशीदमधील रामलल्लाच्या मंदिराचे कुलूप उघडायला परवानगी दिली होती.

१९५४ मध्ये पंतप्रधान असतांना जवाहरलाल नेहरू यांनी देखील प्रयागराज येथे कुंभ येथे पवित्र स्नान घेतले होते.

अजून महत्वाचं उदाहरण आहे ते सोनिया गांधी यांच्या बद्दल,

सोनिया या अनिच्छेने का होईना राजकारणात आल्या खऱ्या पण त्यानंतरचा मार्ग त्यांच्यासाठी काही सोपा नव्हता. सोनिया यांच्या विदेशी असण्यामुळे त्यांना कितीतरी प्रकारच्या वादाला आणि विरोधाला सामोरे जावे लागले हे आपण जाणतोच.

त्या कधीही उघडपणे आपल्या माहेरच्या कुटुंबाबद्दल बोलत नाहीत, ना कधी बालपणीच्या आठवणीबद्दल. उलट लग्न करून भारतात आल्या आणि हाच आपला देश म्हणून त्यांनी आजतागायत मानलं, याच देशाच्या परंपरागत आपण मिसळून गेलो आहोत हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं.आपण जन्माने कॅथलीक आहोत हे विसरून त्या येथील परंपरेला साजेशा हिंदुत्वावर त्यांची श्रद्धा वाढायला लागली.

स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षाच्या अध्यक्ष असतांना, २००१ मध्ये  सोनिया गांधीनी देखील कुंभमेळ्यात पवित्र स्नान केले होते

निश्चितच हि मोठी घटना होती पण तेंव्हा म्हणजेच वीस वर्षांपूर्वी सोशल मिडिया एवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे याची चर्चा हि काहीच काळ झाली तिही फार तर फार वर्तमानपत्र आणि बातम्यांमध्ये..

२००१ मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी अलाहाबाद येथे पवित्र धार्मिक स्थळाला त्यांनी भेट दिली आणि त्रिवेणी च्या वाहत्या पाण्यात त्या उतरतात, मंत्र पठण करतात, शंखध्वनीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या गंगा पूजा, गणपती पूजा, कुल देवता पूजा तसेच त्रिवेणीची पूजा करतात. या पूजा केल्याची त्यांचे अनेक फोटोही  प्रसारित झाले होते.

त्यांच्या या कृतीतून त्यांच्यावर परदेशी असण्यावर वेळोवेळी बोट ठेवणाऱ्या संघाला त्यांनी उत्तर दिले.

हे पवित्र स्नान करण्यासाठी त्या ज्यांच्या प्रभावाखाली आल्या होत्या त्याचे श्रेय मुळात जातं ते, दिग्विजय सिंह यांना. कुंभमेळा परिसरातील त्यांनी सोनिया गांधी यांची भेट द्वारकापीठ शंकाराचार्य, स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि  डॉ. द्वारिकापीठ शकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची भेट घडवून आणली होती.

सोनिया यांच्या सल्लागार एम.एल फोतेदार आणि सुरेश पचौरी यांनी देखील कुंभमेळ्याच्या स्नानाच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि सोनिया यासाठी तयार झाल्या. 

परंतु सोनिया यांचे कुंभमेळ्यातील स्नान हि कृती साधारण नव्हती तर हा तेंव्हा मोठा राजकीय मुद्दा बनला होता. तेंव्हा भाजप ची सत्ता होती, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते.

सोनिया यांनी हे निव्वळ पॉलिटिकल गेम खेळल्याचे आरोप सत्ताधारयांनी केले.

परंतु यावर कॉंग्रेसच्या नेते प्रमोद तिवारी यांनी यावर उत्तर हि दिले होते कि, “सोनियाजी जे काही करत आहेत ती त्यांची कौटुंबिक परंपरा कायम राखत आहेत. याधीही पं. नेहरू हे देखील कुंभमेळ्यास भेट द्यायचे, इंदिराजींनी देखील आनंदमाई च्या मेळ्याला भेट दिली होती त्यामुळे यात राजकीय वळण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”.

संदर्भ : सोनिया गांधी, हाविएर मोरो

हे ही वाच भिडू. 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.