राहुल गांधींच्या हट्टामुळे सोनिया पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत.

१४ मे २००४ हिंदुस्थान मध्ये एक मोठा मथळा छापून येतो ….”अविश्वसनीय धक्का”

तिकडे इटली मध्ये व्हिया बेलिनी येथे राहणाऱ्या सोनिया गांधींच्या आई पॉलाला स्थानिक पत्रकाराकडून बातमी मिळते कि,

तिची लेक भारतात निवडून आली आहे

सरकार निवडून आलं आता संसदेतल्या प्रमुखपदासाठी पक्ष सोनीयाचं नाव देणार, या घोषणेनंतर सोनियाच पंतप्रधान होणार असं सगळा देशच गृहीत धरतो. विरोधी नेते चेकाळतात, परदेशी स्त्री ने सत्ता गाजवावी हे देशाचे दुर्दैव, कुणी म्हणतं हा देशाचा अपमान आहे.

तर त्याच पक्षातले नेते म्हणतात, “सोनिया पंतप्रधान झाल्या तरआम्ही शपथविधीच्या सोहळ्यावर बहिष्कार घालू”.

त्यांनी मनोमन विचार केला आणि निर्णय पक्का केला. देशामध्ये फूट पडण्यास मी कारणीभूत व्हावं, असं मला वाटत नाही त्यामुळे मी पक्षाध्यक्षा म्हणून काम पाहीन आणि डॉ.मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान पद स्वीकारतील. देशासाठी हे क्रांतिकारी पाऊल असेल.

निवडणूक जिंकूनही महत्वाच्या पदावर गांधी घराण्यातली व्यक्ती नाही हे बाबच लोकांना विलक्षण वाटत होती, परंतु …

सोनिया यांच्या पंतप्रधान पद नाकारण्याच्या निर्णयामागे राहुल गांधी जबाबदार आहेत म्हणलं तर खरं वाटेल का ?

तर हो २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारलं तेही राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून,

असा एक खळबळजनक दावा माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांनी २०१४ मध्ये केला होता. त्याचं म्हणणं होतं कि, सोनिया यांनी त्यांच्या अंतरात्माच्या आवाजावरून त्यांनी हा निर्णय नव्हता घेतला तर त्यांनी  राहुल गांधींच्या सांगण्यावरून हे पद नाकारले होते.

राहुल गांधींना भीती होती कि, सोनिया पंतप्रधान झाल्या तर सोनियांनाही वडील राजीव गांधींप्रमाणे ठार मारले जाईल.

‘हेडलाइन्स टुडे’ ला दिलेल्या एका मुलाखतीत माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी दावा केला की, सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये पंतप्रधान होण्यास नकार दिला होता कारण राहुल यांना सोनिया यांच्या जीवाला काही बरं-वाईट होऊ नये म्हणून त्यांनी सोनिया पंतप्रधान बनू नये म्हणून हरएक प्रकारे प्रयत्न केला होता.

इतकेच नाही तर राहुल यांनी सोनियांना २४ तासांत ‘नाही’ म्हणण्याची डेडलाईन दिली होती.

नटवर सिंह यांनी हे हि सांगितले कि, ज्या बैठकीत सोनिया यांनी पंतप्रधान पद घ्यायचं कि नाही यावर सर्व चर्चा चालू होती तिथे मनमोहनसिंग आणि प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या.

नटवर सिंह यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले आणि सोनिया आणि प्रियांका यांनी त्यांना ७ मे ला घरी बोलवून विनंती केली कि, त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले त्या पंतप्रधान पद न स्वीकारण्याचे सर्व उल्लेख त्यांनी काढून टाकावे, जे कि त्यांचे पुस्तक १ ऑगस्टला प्रकाशित होणार होते आणि झालेही.

त्याच्या काही दिवसानंतर सोनिया यांनी नटवर सिंह यांची भेट घेतली आणि आपुलकीने आलिंगन दिले आणि आपण जे काही वागलो त्याबद्दल माफ करा अशी विनंतीही केली. आणि सिंह यांना अशा बऱ्याच घडामोडी सांगितल्या ज्या त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनाही सांगितल्या नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.