दिवाळीत गिफ्ट आणि बोनस म्हणून वाटायलाय खरं पण सोन पापडी नक्की आली कुठून ?

दिवाळी आली ना की काही गोष्टी या पर्मनंट असतात म्हणजे लहान पोरांचं फटाक्यासाठी आणि कपड्यांसाठी रडणं आलं, पुस्तकं, कविता लिहीणार्या लोकांचं दिवाळी अंकाची जाहिरात करणं आलं, फेसबुकवर आणि व्हाट्सअपवर दिवाळी शुभेच्छांचे फॉरवर्ड्स पाठवणं आलं आता या सगळ्या पर्मनंट गोष्टी झाल्या असं वाटतं असेल पण एक सगळ्यात जास्त व्हायरल होणारी गोष्ट म्हणजे सोनपापडी. म्हणजे तसं बघितलं तर इतर वेळी सोनपापडी ही सगळ्याच लोकांना आवडती पण दिवाळीत तिच्याइतकी नकोशी दुसरी गोष्ट नसते.
आता नेमकं दिवाळीत ओव्हररेटेड होणारी सोनपापडी ही नक्की आली कुठून,कुठल्या राज्याची ती देण आहे जाणून घेऊया.
सोनपापडी म्हणजे तिचा एखादा तुकडा जरी तोंडात टाकला तरी ती विरघळत जाते पण तिचा इतिहास पण माहिती पाहिजे नुसते मीम शेअर करत बसण्यात पण मजा नाहीए. आता नेमकी सोनपापडी कुठून आली यांच्याविषयी बरीच मतमतांतरे आहेत. पण याचा उगम हा पश्चिम महाराष्ट्रात झाला असं सांगितलं जातं. पण पश्चिम महाराष्ट्रातून निर्माण झालेली सोनपापडी महाराष्ट्रात लोकप्रिय होण्याऐवजी उत्तर भारतात जास्त लोकप्रिय झाली. मग उत्तर भारतातून पुन्हा भारताच्या अनेक भागांमध्ये सोनपापडी प्रसिध्द होत गेली.
फक्त उत्तर भारत आणि पश्चिम महाराष्ट्रात नाही तर त्याहून पुढे पश्चिम बंगाल, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनपापडी बनवली जाते. साहजिकच त्याचा खप त्या त्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे.
सोनपापडी जगातल्या बऱ्याच फेमस मिठाईंशी मिळतीजुळती असल्याचं सांगितलं जातं ज्यात तुर्कीत प्रसिद्ध असलेला पिस्मानीया सामील आहे. तुर्कीमध्ये पिस्मानीया मिठाई सगळ्यात जास्त लोकप्रिय मानली जाते. पिस्मानीया हा पीठ, बटर,साखर आणि पिस्त्याचं गार्निशन करून बनवलं जातं तर इकडे सोनपापडीत बेसन, पिस्ता वैगरे टाकलं जातं.
असंही सांगितलं जातं की प्राचीन काळात पतीसा नावाची एक मिठाई होती त्याचीच बहीण म्हणजे सोनपापडी. सोनपापडीवर बॉलिवूडमध्ये गाणीसुद्धा बनलेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर अनेक कथा, दंतकथा सोनपापडीशी निगडित आहेत. पण उगम महाराष्ट्रातून असल्याचं सांगितलं जातं. आपल्याला काय जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाय कारण दिवाळी आल्यावर मेसेज आणि सोनपापड्याचे बॉक्स फॉरवर्ड करण्याशिवाय जास्त काम आपल्याकडे नाहीए.
हे ही वाच भिडू :