सोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…

बॉलिवूडमध्ये जर बस्तान बसवायचं असेल तर तुमचा कोणी गॉडफादर असावा लागतो नाहीतर जिंदगीभर स्ट्रगल करावा लागतो. एकतर आज घडीला बॉलिवूडमध्ये लाखो लोकं काम करतात त्यातले निम्मे स्ट्रगल करत बसतात. पण एखाद्याने दिलेल्या संधीचा फायदा उचलून किती मोठा स्टारडम कमावता येऊ शकतो याबद्दलचा आजचा किस्सा.

सोनू निगम या माणसाचा आवाज ऐकला नाही असा एकही माणूस भारतात नसेल. जवळपास बॉलिवूडमध्ये जितके संगीतकार झाले अशा सगळ्या संगीतकारांच्या हाताखाली सोनू निगमने गाणी गायलेली आहेत. आज सोनू निगम परदेशातसुद्धा शो करताना आपल्याला दिसतो.

पण सोनू निगमचं बॉलिवूडमधील हे स्टारडम उभं राहण्यात सचिन पिळगावकर यांचा मोठा वाटा आहे.

खुद्द गायक सोनू निगमसुद्धा हि गोष्ट कबुल करतो. सचिन पिळगावकर हे सोनू निगमच्या आयुष्यातले खरेखुरे महागुरू आहेत. एका कार्यक्रमात सोनू निगमने सचिन पिळगावकर यांचा त्याच्या जीवनात किती मोठा वाटा आहे याबद्दल सांगितलं होतं. सोनू निगम हा ज्यावेळी ८-१० वर्षाचा असेल तेव्हा तो एका मोठ्या सुपरस्टारला भेटला होता.

तो मोठा सुपरस्टार होते सचिन पिळगावकर.

पुढे दिल्लीहून सोनू निगम त्याच्या वडिलांसोबत गायक बनण्यासाठी मुंबईत आला होता त्यावेळी हॉटेलवर थांबून, आवरून सावरून जेव्हा त्यांनी पहिली थाप ज्या घरावर मारली ते घर सचिन पिळगावकरांचं होतं. गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये सोनू निगमच्या प्रशिक्षकसुद्धा सचिन पिळगावकर होते. सोनू निगमला त्याचा पहिला अवॉर्डसुद्धा सचिन पिळगावकरांकडून मिळाला होता.

सोनू निगमवर सचिन पिळगावकरांचं विशेष प्रेम होतं. सोनू निगमच्या लहानपणीच सचिन पिळगावकरांना त्याच्यात स्पार्क दिसला होता. सोनू निगमचं बॉलिवूडमध्ये येण्याआधी कुठलंही बॅकग्राउंड नव्हतं. अशा मुलाला सचिन पिळगावकरांनी विशेष मदत केली.

ज्यावेळी सोनू निगम बॉलिवूडमध्ये संगीतकारांचे आणि म्युझिक स्टुडिओचे उंबरठे झिजवत होता तेव्हा त्याला यश मिळत नव्हतं. वयाच्या १८ व्या वर्षांपासून सोनू निगम बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होता.

सचिन पिळगावकर त्यावेळी सोनू निगमला रात्री घरी बोलावून घेत असे आणि गायला लावत असे. सोनू निगमला आश्चर्य वाटायचं कि ना मी कुठल्या निर्मात्याचा मुलगा आहे ना कुठल्या दिग्दर्शकाचा मुलगा आहे ना माझी मोठी ओळख आहे तरी सचिन पिळगावकर इतका जीव का लावतात.

सचिन पिळगावकरांमुळेच सोनू निगमला परदेशवारी करता आली.

सचिन पिळगावकरांनी बहरीन या देशामध्ये सोनू निगमला घेऊन गेले होते. सचिन पिळगावकरांमुळेच एकाच सिनेमातले सगळे गाणे गाण्याचा मान सोनू निगमला मिळाला होता. त्यांच्याच खास आग्रहास्तव मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा सोनू निगमने गाणं गायलं. 

नवरा माझा नवसाचा या सिनेमामध्ये सोनू निगमने गायलेलं हिरवा निसर्ग हा भवतीने….हे गाणं खूप गाजलं होतं. याच सिनेमात पिळगावकरांमुळे सोनू निगमला अभिनयाची देखील संधी मिळाली.

गायकीतल्या अनेक रागांचा सराव सोनू निगम हा सचिन पिळगावकरांकडून शिकलेला आहे.

सचिन पिळगावकरांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात त्यांनी सोनू निगमबद्दल विशेष लिहिलेलं आहे. आजसुद्धा सोनू निगम सचिन पिळगावकरांना त्यांच्या स्टारडमचा मोठा आधार मानतो.

आज सोशल मीडियावर बरेच लोकं पिळगावकरांना ट्रोल करताना दिसतात पण सचिन पिळगावकर हे मजाकचा विषय मुळीच नाहीत, सोनू निगमसारखा स्टार त्यांनी घडवलाय हि काय साधी गोष्ट नाही. 

आजच्या युगात नवीन सिंगर लोकांचा मोठा ओढा आहे पण सोनू निगम आजसुद्धा त्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करून उभा आहे आणि याच सगळं क्रेडिट तो सचिन पिळगावकरांना देतो.

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. हरीश कोहळे says

    सच्च मत बोल भिडु

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज

    तुम्ही फेसबुकवर समोरासमोर यायला हवं तुम्हाला महाराष्ट्र खुप खुप खुप प्रेम करेल किंवा युट्युबवर दिलखुलास इतिहास मधील मतं मांडतात

Leave A Reply

Your email address will not be published.