सोनू सूदला मदत मागणाऱ्यांनी ट्विट डिलीट करण्यामागे नेमकं गौडबंगाल काय आहे?

सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात बॉलिवूड मधला व्हिलन सोनू सूद हिरो बनून आला. मुंबईत व इतर अनेक ठिकाणी अडकलेल्या युपी बिहारच्या कामगारांना घरी पाठवण्याच काम त्यानं केलं.

सुरवातीला सोनू सुदच प्रचंड कौतुक झालं.

ट्विटर वर त्याच्याकडे हजारो जणांनी मदत मागितली आणि सोनूने झटक्यात रिप्लाय करून मदत सुद्धा पोहचवली.

मात्र गेल्या काही दिवसात एक विचित्र प्रकार समोर आला, सोनू सूदकडे मदत मागणाऱ्या अनेकांचे ट्विट रातोरात डिलीट झाल्याचं समोर आलं.

ज्या सोशल मीडियावर सोनू सूदची हवा होती तिथं त्याच्यावर टीका सुरू झाली.

सर्वसामान्यांनाही हा सोनू सूदचा पब्लिसिटी स्टंट होता की काय हा प्रश्न पडला. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी तर या सगळ्या मागे भाजपचा हात आहे असा थेट आरोप केला.

सोनू सूदने देखील ट्विट करून खोटी मदत मागू नका, खोटे अकाउंट वरून मेसेज करू नका असे आवाहन केले.

 

सध्याच्या डिजिटल युगात अनेकजण फेक अकाउंट बनवून सोशल मीडियावर असे उद्योग करताना दिसतात. मग खरच सोनू सूदने हा प्रकार केला आहे का? युपीच्या बलिया या गावी राहणाऱ्या अजयेंद्र त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने या बाबत रिसर्च केला आणि लल्लनटॉप व इतर माध्यमांना शेअर केला.

 त्यांच्या मते सोनू सूद च्या अकाउंट वरून डिलीट झालेल्या ट्विटमधील प्रत्येकजण फेक नाही.

याच उदाहरण म्हणजे 18 मे ला सोनूला ट्विट केलेला अनमोल यादव.

आता पाहिलं तर त्याच ट्विट डिलीट झालेलं आहे. पण त्याच्या अकाउंट वर जाऊन पाहिलं तर सकृतदर्शनी अनमोल यादव हा खरा व्यक्ती आहे. तो २०१२ पासून ट्विटर चालवतो. पण आता त्याने स्वतःचे प्रोफाइल प्रायव्हेट केल्या मुळे आपल्याला त्याचे ट्विट दिसत नाहीत. यामुळेच सोनूला त्याने पाठवलेला ट्विट गायब आहे.

काही ठिकाणी असंही झालं आहे की मदत मागणाऱ्याने मदत मिळल्यावर आपला ट्विट डिलीट करून टाकला.

उदाहरणार्थ शुभम साहू

याने मदत मागितलेला ट्विट डिलीट केला आहे मात्र त्यानंतर सोनू सूद ला धन्यवाद दिलेला ट्विट अजूनही आहे. पण त्याच ट्विटर अकाउंट ऍक्टिव्ह नाही. त्याने फक्त दोन ट्विट केलेत तेही रँडम आहेत.

रिसर्च करणाऱ्याच्या मते अनेकांनी आपला मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर ट्विटमध्ये शेअर केला होता, अशा व्यक्तींनी मदत मिळाल्यावर ते ट्विट डिलीट करून टाकले.

उदाहरणार्थ साद अहमद.

या साद अहमदने २५ मे रोजी सोनूला मदत मागितली होती. त्यात त्याने आपला आधार नंबर जोडला होता पण एका महेश जाधव नावाच्या युजरने त्याला त्याच दिवशी ट्विट डिलीट करायचा सल्ला दिला. साद अहमदने मदत मागितल्याचा ट्विट डिलीट केला आहे.

साद अहमदचे ट्विटर अकाउंट पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे.

तो 2015 पासून ट्विटर वापरतो आणि आता जरी पाहिलं तर योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करणारे ट्विट त्याच्या अकाउंट वर दिसतात.

अजून एक उदाहरण आहे खुशी झा हिचे.

तिने सोनूला पाठवलेल्या ट्विट मध्ये तिचा फोन नंबर दिला होता. सोनू ने तिला मदत देखील पाठवली.

पुढे गावी गेल्यावर खुशीने सोनूला परत मेसेज केला आहे की माझं ट्विट तुमच्या साईडहुन सुद्धा डिलीट करा कारण अनेक जण मला फोन करून त्रास देत आहेत.

खुशी च ट्विटरवर एप्रिल 2016 पासून अकाउंट आहे आणि सध्या तीच्या प्रोफाइलवर 2-3च ट्विट दिसतात.

ही झाली ठळक उदाहरणे. रिसर्च करणाऱ्यानी ट्विट डिलीट करणाऱ्या अनेकांना फोन लावला. काहींनी मोबाईल नंबरच कारण सांगितलं, काहींना सोनूची मदत मिळाली नाही पण कुठल्या तरी एनजीओने मदत केली म्हणून ट्विट डिलीट केले असंही सांगितलं.

अनेकदा असंही लक्षात आलं आहे की बरेचजण सोनू सूद ट्विटर वरून मदत पाठवतोय हे कळल्यावर ट्विटर अकाउंट उघडले होते. मदत मिळाल्यावर त्यांनी ते अकाउंट बंद करून टाकले. अशांचेही ट्विट डिलीट झालेले दिसत आहेत.

हे झालं डिलीट झालेल्या ट्विट बद्दल पण अजूनही असे शेकडो ट्विट्स आहेत त्यात स्थलांतरित कामगारांनी आपले नंबर देऊन मदत मागितली आहे व ट्विट डिलीट केलेला नाही. हा रिसर्च करणाऱ्यांनी त्या कामगारांना फोन लावला तर त्यांनी सोनू सूदने मदत केली असच सांगितलं.

एकूण प्रकरणात सोनू सुदची यात चूक आहे असं वाटत नाही.

पण तरीही प्रश्न बाकी राहतात की या कामगारांना ट्विटर अकाउंट कोणी उघडून दिले. जे काही फेक ट्विट्स आहेत ते का बनले?

ही उत्तरे मिळाल्याशिवाय कोणताही अनुमान काढणे चुकीचे ठरेल.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.