सोनू सूदला दोन वेळेस राज्यसभा सीट ची ऑफर आली होती.

आजकाल बॉलिवूड अभिनेता सोनू सूद  करचोरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर २० कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केला त्यामुळे आता सोनू सूद होणाऱ्या चौकशीला तर सामोरे जातोच आहे पण आज त्याने प्रथमच याबाबतीत खुलेपणाने बोलला आहे. त्यात त्याने एक पोस्ट शेअर करत बोलला कि, त्याच्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी असल्याचं तो म्हणाला आहे.

याच सगळ्या घडामोडी घडत असतांना त्यात त्याने NDTV ला मुलाखत दिली आहे.

या मुलाखतीत सोनूने आपण कोणत्याही कायद्याचं उल्लघन केलं नाही असा खुलासा केला आहे.  आयकर विभागाने माझी चार दिवस चौकशी केली असून त्यांच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिली असल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं आहे.

त्यानंतर मुलाखतीत त्याला एक प्रश्न केला गेला कि, सोनू सूद भविष्यात राजकारणात येऊ शकतो का?

तो म्हणला कि, मला बऱ्याचदा लोकं म्हणायचे कि, तुला राजकारणात तर जायचं नाही ना? तू राजकारणात जाण्यासाठी लायक नाहीस, राजकारणात पाऊल ठेवायचं असेल तर गेंड्याची कातडी लागत असते. तेंव्हा मी त्यांना म्हणायचो कि मी कुठं बोलून दाखवलं आहे कि मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे. मी जे काही चांगली कामे  करत आहे. लोकंच मला त्यासाठी आवाहन करायचे, मदत मागायचे कि, बॉस तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे आम्हाला.  त्यामुळे मी त्यांच्याकडे ओढला जायचो. मला शक्य ती मदत त्यांना करता यावी याचा प्रयत्न करतो. त्यात राजकीय महत्वाकांक्षा का दिसावी?  म्हणून मला वाटते की जेव्हा मी मानसिकदृष्ट्या त्यासाठी तयार होईल, तेव्हा मी गच्चीवर उभा राहून मोठ्याने म्हणेन की होय मी तयार आहे. माझा नेहेमीच प्रयत्न राहिला आहे कि, मी माझं बेस्ट देणार. १०० टक्के देणार”.

त्यानंतर त्याने दिलेलं एक उत्तर हे सर्वांच्या भुवया उंचावणारं होतं,

सोनू सूदने पुढे सांगितले की, त्याला काही पक्षांनी राज्यसभेची जागा ऑफर केली होती.

याआधी मी कधीही शेअर केले नाही कि, मला या अगोदर मला दोन वेळा राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे की तुम्ही या… हे करा, तुम्ही राज्यसभेवर जा, तुम्हाला एक मोठे व्यासपीठ मिळेल, तुम्ही चांगले काम करू शकाल. पण मी या राजकीय व्यासपीठासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो.

त्याने सांगितल्याप्रमाणे, सोनू सूद ला मागच्या ६ महिन्यांपूर्वी राज्यसभेचे तिकीट ऑफर केले होते. ऑफर करण्यात आलेले दोन्ही पक्ष वेगवेगळे होते. तेंव्हा सोनू सूद ने या दोन्ही पक्षाला विनम्रपणे नकार देत हि ऑफर नाकारली. आणि वरतून हे आभार देखील मानले कि या दोन्ही पक्षांनी यासाठी त्याला लायक समजले आहे.

तो असंही म्हणाला, कि मी त्या राजकीय पक्षांच्या त्या त्या सबंधित लोकांना बोललो, मी कधीही कोणाच्या विरोधात जाणीवपूर्वक बोलणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना याची मला पर्वा नाही. जर एखादा पक्ष किंव्हा नेता तुमच्यासाठी चांगलं काम करत असेल किंव्हा वाईट काम करत असेल त्यांना ते दाखवून देईल. जरी मी राजकारणात गेलो तरी, पहिल्याच दिवसापासून राजीनामा लिहून येईल. जर तुम्हाला माझं काम आवडत नसेल, तर मी परतणार. ज्या दिवशी मला वाटेल, ज्या दिवशी माझ्या मनात येईल त्या दिवशी मी येईल”.

 सगळे खुलासे केले मात्र सोनूने कोणत्या पक्षातून त्याला ऑफर मिळाली होती हे सांगणं मात्र टाळलं.

त्याच्या चौकशीतून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्याने सांगितल्याप्रमाणे आयकर विभागाच्या चौकशीत आवश्यक ती सर्व कागदपत्र पुरवली आहेत. असंही त्याने सांगितलं आहे कि, त्याला मदतीसाठीचे आलेले मेल्स पाहून आयकर विभागातील अधिकारी देखील थक्क झाले होते. 

हे हि वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.