साऊथच्या सुपरहिरोची ॲक्शन कॉमेडी वाटते? त्याने थेट प्रोड्युसरलाच खरोखर गोळी हाणलेली…

साऊथच्या चित्रपटांकडे बघण्याचा आपल्या लोकांचा दृष्टिकोन आता जरी बदलला असला तरी त्यात असलेली भरमसाठ ऍक्शन आणि त्यांची वेगळ्या स्टाईलची हाणामारी बघण्यात आपल्याला जास्त रस असतो.

मासचं पाय फिरवून वावटळ उठवणं असो किंवा ब्रम्हानंदमला आजवर पडलेल्या चापटी मोजणं असो, अल्लू अर्जुनाचा swag असो वा धनुषचा डान्स असो

अशा अनेक कारणाने आपण दाक्षिणात्य चित्रपट बघतो. रजनीकांत सरांचा विषय वेगळाय या सगळ्यांपेक्षा त्याबद्दल नंतर कधीतरी….

आज आपण अशा एका साऊथ अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया कि ज्याच्या चित्रपटावर सगळ्यात जास्त मीम बनवले जातात, त्याच्या एकंदरीत चित्रपटात असे सीन असतात कि ज्यावर आपल्याला विश्वास ठेवावा कि नाही असं होत. ऍक्शन सीन मध्ये नसलेलं लॉजिक, म्हणजे चित्रपटात एकदम सिरीयस मोडवर यांचा ऍक्शन सीन सुरु असतो पण त्याचं सादरीकरण इतकं कॉमेडी असतं कि हसू आल्याशिवाय राहत नाही.

नंदामुरी बालकृष्णा ज्यांना आपण NBK म्हणून ओळखतो तर त्यांचे काही डायहार्ड फॅन त्यांना बलैय्या बाबू म्हणून ओळखतात. दिग्गज दिग्दर्शक, मोठं राजकीय प्रस्थ असलेले सिनियर एनटीआर यांचे ते चिरंजीव आहेत.

download 8

जितके ते चित्रपटात ईललॉजिकल ऍक्शन करतात तितकंच ते त्यांच्या रियल आयुष्यात कधी सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांच्या कानफटात लगावतात तर कधी सेटवर असिस्टंट डायरेक्टरला चोप देतात. चित्रपटाची स्टोरी ऐकवायला घरी आलेल्या डायरेक्टर आणि लेखकावर गोळ्या सुद्धा त्यांनी झाडलेल्या आहे.

बालकृष्णा यांचा चाहतावर्ग आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणावर विखुरला गेलेला आहे पण खेडोपाड्यात त्यांची क्रेझ मात्र अजूनही कमी झालेली नाही. हिच ग्रामीण भागातली चाहते मंडळी त्यांना कायम सपोर्ट करत असतात. बालकृष्णा फक्त एक ऍक्टर नाही तर राजकीय नेतेसुद्धा आहे.  त्यांच्या काही घोषनासुद्धा खतरनाक आहेत अर्थात या घोषणा त्यांच्या चाहत्या वर्गानेच बनवल्या आहेत.

हैद्राबाद सिकंदराबाद बलैय्या बाबू जिंदाबाद, बाईक लोन कार लोन बलैय्या बाबू सायक्लोन इतके डायहार्ड फॅन आहेत याचा अंदाज आला असेलच.

सुरवातीच्या काळातच मोठमोठे डायलॉग, भयंकर ऍक्शन सीन्स याच्या जोरावर बालकृष्णा जास्तच लोकप्रिय होऊ लागले. लोकप्रियतेचा परिणाम इतका वाढला कि मेगा स्टार असलेल्या चिरंजीवीला सुद्धा त्यांनी कॉम्पिटिशन दिली होती.

maxresdefault 3

वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांना मुख्य प्रवाहात राहून चांगले चित्रपट करता आलेलं नाही. त्यांचा एक फॉर्मुला ठरलेला होता तो म्हणजे त्यांना वाटायचं कि ,आपल्या चित्रपटात एक दोन खतरनाक ऍक्शन सिन,  भरघोस गुंडांसोबत तुफान हाणामारी आणि हिरोईनसोबत दोन तीन भारी गाणी यावर चित्रपट चालेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे अशा प्रकारचे चित्रपट चालले.

बालकृष्णा यांची एक सवय होती कि ते फक्त दिग्दर्शक जे म्हणेल ते करायचे इतर कुणाचाही सल्ला ते घेत नव्हते. याच कारणामुळे दिग्दर्शक लोकांनी त्यांच्याकडून काहीच्या काही सिन करून घेतले. ईललॉजिक सीन इतके केले कि तेलगू सिनेमात बालकृष्णा यांना लोकांनी ट्रोल करायला सुरवात केली त्यावेळी आपण केलेले चित्रपट खरंच काहीही होते अशी कबुली त्यांनी दिली होती.

या भयानक सीन्सची चर्चा करायची झाली तर , चित्रपटात ते डोळ्यातून आगीचे गोळे सोडतात, दोन्ही हाताने समुद्राचं पाणी अडवतात, मंगळसूत्र तोडायचं सोडून जेलचा दरवाजा उखडून काढतात. बोटाच्या इशाऱ्याने रेल्वेची दिशा बदलतात अशा प्रकारचे समाज माध्यमांवर त्यांचे बरेच व्हिडीओ आहेत.

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी NTR कथानायडु आणि NTR महानायडु अशा दोन चित्रपटांची निर्मिती केली.

आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी सगळ्यात जास्त तेरा वेळा डबल रोल असलेल्या भूमिका साकार केल्या आहेत तर एकदा ट्रिपल रोल सुद्धा त्यांनी केला आहे.

त्यांचा स्वभाव हा कधी तडकाफडकी तर कधी एकदम डाऊन टू अर्थ असा दिसतो. त्यांच्या विधानांमुळे ते कायम कॉंट्रोव्हर्सी मध्ये सापडलेले दिसतात.  वडीलांच्या तेलगू देसम पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवून ते तिथे आमदारही बनले होते.

maxresdefault 2

एकदा २००४ साली त्यांनी त्यांच्या घरी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी  साउथचे मोठे प्रोड्युसर बी. सुरेश आणि त्यांचे असिस्टंट सत्यनारायण चौधरी याना बोलावलं होत पण काही कारणाने ते भडकले आणि त्यांनी त्या दोघांवर बंदूक चालवली. जखमी झाल्याने त्यां दोघांना हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं. मीडियाने हि बातमी चांगलीच लावून धरली परंतु राजकीय नेटवर्क मजबूत असल्याने हि बातमी जास्त काळ टिकाव धरू शकली नाही.

सोशल मीडियावर बालकृष्णाच्या नावाने अनेक ग्रुप चालतात. त्याच्या साठाव्या वाढदिवशी त्याच्या जगभरातल्या चाहत्या लोकांनी १० तारखेला १० वाजून १० मिनिटांनी एकाच वेळी केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.अजूनही चित्रपटात तो मुख्य नायकाची भूमिका करतो. त्याचा आगामी चित्रपट BB३ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.