वर्ल्ड म्युझिकवर दहशत आणि जस्टिन बिबरचं मार्केट डाऊन करणारी बीटीएस व त्यांची आर्मी

म्युझिक बँड आणि त्यांच्यात चालणाऱ्या रायवलरी हे आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. You tube वर जास्तीत जास्त व्हीव्ज आणि like कसे मिळतील या हिशोबाने गाणी बनवली जातात. म्हणजे परदेशात सिनेमातील गाण्यांपेक्षा म्युझिक बँडच्या गाण्याला जास्त उचलून धरलं जातं.

१९७०-८० च्या दशकापासून किंवा त्याहून जास्त काळापासून बँड हे आनंद देण्याचं साधन बनलं होतं. आजचा किस्सा अशाच एका बँडचा आहे ज्याने आपल्या म्युझिकने सगळ्या जगात आपल्या नावाचा डंका वाजवला.

बीटीएस ( BTS ) या बँडचं नाव तर अस्सल म्युझिक आणि world wide गाणी ऐकणाऱ्या लोकांनी नक्कीच ऐकलं असेल. परदेशातली गोष्ट सोडा आपल्या भारतातच बघा. अर्ध्या लोकांना या बँडचा काय विषय आहे हे सुद्धा माहिती नाहीए तरीसुद्धा तरुणाईमध्ये आणि त्यातल्या त्यात विशेषतः मुलींमध्ये हा बीटीएस बँड प्रचंड लोकप्रिय आहे. भारतात आणि जगभरातल्या क्लब मध्ये या बीटीएसने धुरळा उडवला आहे. पण नक्की हा बीटीएस  काय प्रकार आहे जाणून घेऊया.

बीटीएस म्हणजे बँगटन सेयोदेन . याचा कोरियन अर्थ म्हणजे पडल्यानंतर पुन्हा उठून उडणे.

साऊथ कोरियाचा ७ लोकांचा हा बँड म्हणजे बीटीएस आर्मी. या बँड ने कोरियन पॉप म्युझिकला सोन्याचे दिवस आणले. इतकंच नाही तर या बँडला times magzine ने जगातल्या २५ विशेष लोकांमध्ये स्थान दिलं होतं.

हा बँड २०१०-११ च्या काळात निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. बिग हिंट एंटरटेनमेंट च्या माध्यमातून झालेल्या ऑडिशन मधून या बँडची निर्मिती झाली. २०१२ ला हा बँड पूर्ण झाला आणि २०१३ साली या बँडने म्युझिक क्षेत्रात पदार्पण केलं. 2 kool 4 skool आणि नो मोर ड्रीम या गाण्याने बीटीएस आर्मीने म्युझिक क्षेत्रात धुमाकूळ घालायला सुरवात केली. हळूहळू साऊथ कोरियामध्ये हा बँड विलक्षण लोकप्रिय झाला.

या बीटीएसमध्ये 7 जण आहे. किम नामजून (Rm रॅप मॉंस्टर ) म्हणून त्याला ओळखलं जातं आणि या बँडचा म्होरक्या म्हणून सुद्धा तो प्रसिद्ध आहे. किम सीओकजिन (जीन) , मिन युंगी (suga), व्ही, जे होप, जिमीन, जिऑन जंगकुक अशी सगळी ही २३-२४ वर्षाची ही मंडळी आहे. या सात जणांमुळे या बँडचा दबदबा जगभर आहे.

जगभरात आपल्या कार्यक्रमाचे दौरे हा बीटीएस बँड करत असतो. सिंगापूर पासून ते कॅलिफोर्निया पर्यंत ही बीटीएस टीम आपली गाणी लोकांना ऐकवत असते. बीटीएसच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते जास्तीत जास्त आत्महत्या, महिला सशक्तीकरण, मानसिक त्रास,ड्रग्ज अशा गोष्टींवर गाणी बनवतात आणि त्यातून तरुणाईला संदेश सुद्धा देऊन जातात.

बीटीएसचे भक्त असणाऱ्यांना बीटीएस आर्मी असं म्हटलं जातं.

बीटीएसच्या डीएनए या अल्बमने सगळे रेकॉर्ड तोडले होते इतका प्रचंड प्रतिसाद या अल्बमला लोकांनी दिला होता. जस्टीन बिबर, सेरेना गोल्मझ  या सगळ्यांची हवा या बँडने टाईट केली होती. बीटीएसची गाणी ऐकणारी मंडळी स्वतःला बीटीएस आर्मीचा एक भाग समजतात.

सगळ्यात जास्त ऐकली जाणारी गाणी ही सोशल मीडियावर बीटीएसचीच आहेत. एकाच दिवसात बीटीएसच्या गाण्यांना ३००M व्हीव्ज येतात यावरून बीटीएसची लोकप्रियता लक्षात येते. स्वतःला जसं आहे तस स्वीकार करायला शिका असा या बँडचा उद्देश आहे.

टाइम्स मॅगेझिनवर झळकल्यानंतर बीटीएस मात्र आधीपेक्षा जास्तच फेमस झालं. बीटीएस आर्मीने संगीत क्षेत्रात अशी एक लाट आणली ज्यात इतर सगळे बँड वाहून गेले. सगळीकडे पार्टी आणि क्लब मध्ये फक्त बीटीएसची गाणी वाजवली जातात.

मात्र भारतात अलीकडच्या काळात बीटीएस आर्मीच प्रमाण अधिक वाढलं आहे. विशेषतः मुलींमध्ये या बँडची भयंकर क्रेझ आहे. स्पॉटीफाय आणि इतर म्युझिक ऍपवर बीटीएस बादशहा बनून राज्य करत आहे.

व्हिव्ज आणि लाईकचे सगळे रेकॉर्ड मोडून बीटीएसने नाद खुळा कार्यक्रम केला आहे….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.