याआधी एकदा पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती.
भारतातल्या ४० पेक्षा जास्त पत्रकारांवर पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे पाळत ठेवण्यात येत होती अशी माहिती समोर आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली…
पण याच पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने एका पत्रकाराची हत्या केली गेली होती.
त्याचं नाव जमाल खाशोगी… अमेरिकेसाठी काम करणारा पत्रकार ! पण याच पत्रकाराची हत्या झाली २०१८ मध्ये. कारण काय तर तो त्याच्या लिखाणांतून सौदी अरेबियाच्या सरकारवर टीका करायचा, एकदा तो इस्तंबूलमधील सौदीच्या वाणिज्य दूतावासात गेला होता आणि तिथेच त्याची हत्या करण्यात आली.
सौदीचे एक प्रख्यात पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती, त्यांनी अफगाणिस्तानावर सोव्हिएत आक्रमण तसंच अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचा उदय यासह अनेक सौदीच्या महत्वाच्या बातम्या कवर केल्या होत्या.
ते सौदी राजघराण्याशी त्यांचे जवळचे सबंध होते आणि त्यांनी सरकारचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले.
परंतु तो 2017 मध्ये अमेरिकेत वास्तव्यास गेला. तेथून त्याने वॉशिंग्टन पोस्टमध्ये सदर लिहियाला सुरुवात केली, ज्यात त्याने किंग सलमानचा मुलगा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणजेच सौदी अरेबियाच्या डी फॅक्टो शासक यांच्या धोरणांवर सतत टीका केली.
जमाल खाशोगी याच्या सौदीच्या वाणिज्य दूतावासात हत्या होण्याआधी कमीतकमी एक महिना आधी खाशोगी यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांसह त्याच्या जवळ असणाऱ्या दोन महिलांना पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आले होते.
सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांच्या लेखात त्यांनी म्हणले आहे कि, राजपुत्राच्या देखरेखीखाली होणाऱ्या मतभेदांमुळे उघड कारवाईत आपल्याला अटक होण्याची भीती त्यांनी बोलून दाखवली होती. त्यातच २०१८ मध्ये आपला घटस्फोट झाला आहे, असे सांगून सौदीचे काही कागदपत्र मिळविण्यासाठी खशोगगी हे २८ सप्टेंबर २०१८ रोजी इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावास मध्ये तो आला, तिथून काही कागदपत्रे घेऊन त्याला त्याच्या तुर्कीमध्ये असणाऱ्या हॅटिस सेंगीझशी लग्न करायचं होतं. त्याला अपेक्षित कागदपत्रे २ ऑक्टोबर ला मिळतील असं सांगण्यात आलं.
२ ऑक्टोबर ला ते तिथेच परत आले परंतु त्यानंतर ते बेपत्ता झाले.
२ ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी १ च्या सुमारास खाशोगी इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासाच्या गेट च्या आत गेले आणि नंतर गायब झाले. खाशोगी हयात नाहीत याची खात्री तुर्कीच्या अधिकाऱ्यांना व्हायला वेळ लागला नाही. सौदी अरेबियाला १८ दिवस लागले हे मान्य करायला कि खागोशी यांची हत्या झाली आहे.
त्यांचा अद्यापही मृतदेह सापडला नाही.
त्यानंतर तपासात जमाल खाशोगीचा आणि त्याची पहिली आणि दुसरी पत्नी हॅटिस केंजिझ आणि हॅनन एलाटर यांच्या दोघींचे फोन तपासले. त्यापैकी त्याच्या आणि पत्नीच्या मोबाईल मध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्या. खाशोगीचा आणखी एक जवळच्या सहकाऱ्याच्या मोबाईल मध्ये देखील गडबड आढळली. खाशोगी यांच्या हत्येच्या तपासाशी थेट संबंध ठेवलेल्या दोन तुर्की अधिका-यांचे फोन नंबर लीक झालेल्या यादीत होते.
फॉरेंसिक विभागाने विश्लेषण दिले ,पेगासस स्पायवेअर द्वारे मोबाईल hack केला आहे.
त्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी स्वत:च पत्रकार खाशोगी याला पकडा नाही तर ठार मारा असा आदेश दिला होता. कारण तो राजघराण्यावर टीका करणारा होता.
खागोशी यांचा मोबाईल hack करण्यासाठी मदत केली ती पेगाससने, पेगासस हे इस्त्रायलच्या NSO ग्रुपने बनवलेलं स्पायवेअर आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या-ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आली आहे त्यांची एक यादीच सध्या लीक झाली आहे. त्याने जगभरातील बहुतेक ५०,००० व्यक्तींचे मोबाईल hack झाले केले आहेत.
“खाशोगी यांच्या हत्येशी आमच्या तंत्रज्ञानाचा काहीही सबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलेय. या स्पायवेअर द्वारे आम्ही संशयास्पद माहिती ऐकणे, परीक्षण करणे, मागोवा घेणे किंवा संग्रहित करणे असल्या गोष्टी आम्ही करतो”.
त्याच्या हत्येच्या खूप दिवसानंतर म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी सौदी सरकारने कबूल केले की खाशोगी यांचे दुतावासाच्या आतच मृत्यू झाला आहे.