श्रीदेवीची हरवलेली बहिण प्रभादेवी, जी एकच दिवस आली आणि पुन्हा गायब झाली.

90’s चा एरा सुरू झालेला. या काळात मोठ्या प्रमाणात रुपेरी, चंदेरी मॅग्झीनच्या विक्री होत होत्या. अशा काळात स्पर्धा पण वाढली होती. आपल्या टिकून रहायचं असेल तर चमचमीत असलं पाहीजे हे एकच सुत्र मिडीयाने बाळगलं होतं. 

पण चमचमीत पणाच्या या नादात काहीतरी स्फोटक द्यावं असा विचार एका मॅग्झीनने केला. त्या मॅग्झीनच नाव होतं सिने ब्लिटस्. 

या मॅग्झीनमध्ये श्रीदेवीची बहिण प्रभादेवीचा फोटो छापण्यात आला आणि अस सांगण्यात आलं की, हि बहिण लहानपणीच श्रीदेवीपासून दुरावली होती. जी खूप काळानंतर सापडली !!! 

झालं नसलेले फोन घेवून फोनाफोनी चालू झाली. लोक एकमेकांकडे चौकशी करु लागले. काही जणांनी चान्स जायला नको म्हणून लागलीच प्रभादेवीला लग्नाची मागणी घातली. फिल्म इंडस्ट्रीतल्या कोणालाच नेमकं प्रकरण काय ते कळत नव्हतं. 

या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीदेवीच्या घरातल्यांचे देखील हालहाल झाले. ते देखील डोक्याला ताण देवून खरच अस काय झालेला का याचा विचार करु लागले. पण या सगळ्या घडामोडीत श्रीदेवी तोंडातून शब्द काढायला तयार नव्हती. नंतर खुलासा करण्यात आला ती प्रभादेवी नाही तर ते आहेत, 

अभिनेते अनुपम खेर !!! 

च्या गावात अनुपम खेर.. डिक्टो श्रीदेवी दिसतय की म्हणून तेव्हा देखील महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटल्या. लोकांनी वाह वाह केलं. प्रपोज मारणाऱ्यांनी ह्याला काय अर्थाय म्हणत नाक मुरडली. पण संबध भारत एक एप्रिलला गंडला याचं सुख वेगळच होतं. 

हे फोटो काढले होते ते गौतम राजाध्यक्ष यांनी आणि मेकअप केला होता तो मिकी कॉन्ट्रक्टर यांनी. पहिल्यापासून हि बातमी गुप्त ठेवून संपुर्ण भारताचा एप्रिल फुल करण्याची योजना आखण्यात आली होती. फक्त श्रीदेवी आणि शुट करणाऱ्या निवडक लोकांनाच यांची माहिती होती…

हे सगळं करण्यात आलं होतं ते एक एप्रिलचा मुहूर्त साधून. कारण काय तर भारताला फसवुया…

आत्ता झालं का ? यामुळे सगळा भारत फसला खरा पण यासाठी असल्या गंडीव फसीव गोष्टीची आपल्याला गरज नसते. एक लाखाची जपानी गादी विकत घेणारे, अडीचशे रुपायत मोबाईल फोन घेणारे, कासवावर पाऊस पाडणारे आपण रोजच्या आयुष्यात फसतच असतोय की (अय पंधरा लाखाचा विषय कुणी काढलां बे) त्यात इतके कष्ट घेवून फसवणाऱ्यांचा खरच सन्मान करायला हवा.

पुढे काय झालं तर काहीच नाही…

आत्ता अनुपम खेर यांना बघितल्यावर श्रीदेवी आठवु नका इतकच. चपलाचा प्रसाद खायला लागल. 

हे ही वाचा –