संतोष मानेची “खूनी बस” जी चालवायला ड्रायव्हर घाबरतात…! 

तारिख होती २५ जानेवारी २०१२. सकाळची वेळ होती.

स्वारगेटवर नेहमीसारखी गर्दी होती. स्वारगेटवर पुणे-सातारा-पुणे बस लागली होती. स्वारगेट आगाराची हि बस. सकाळची वेळ असल्याने पुण्यात तशी तुर्रळक गर्दी होती. अशाच रिकाम्या असणाऱ्या त्या बसमध्ये संतोष माने चढला. संतोष माने हे नाव त्यावेळी स्वारगेट आगारातील ड्रायव्हर सोडले तर कोणाला माहिती असण्याच कारण नव्हतं. 

संतोष मानेने आपल्याजवळच्या मास्टर की ने बस चालू केली.

हडपसर रस्त्याच्या बाजूला असलेल्या गेटमधून बस बाहेर काढली आणि सुसाट वेगाने बस गोळीबार मैदान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेवून गेला. रस्त्यावर येतील ती वहाने, पायी चालणारे लोक, दुचाकीवर असणाऱ्या लोकांना चिरडत हि बस धावू लागली आणि एकच गोंधळ उडाला. बस पुढं जायची आणि मागून लोक पळायचे. रस्त्यावर चक्काचूर झालेल्या गाड्या, जखमी लोकं आणि छिन्नविच्छिन झालेले मृतदेह.

एका क्षणात पुण्यातल्या गर्दीच्या रस्त्यांनी कधीच पाहिलं नव्हत अस दृश्य पाहीलं. 

बस लष्करी भागात घुसली. काहीतरी अघडीत घटतय याची कल्पना येताच तिथल्या जवानांनी बसच्या चाकांवर गोळीबार केला. पण बस थांबली नाही. पूलगेट वरुन लष्करी भागात तून कासेवाडी मार्गाने बस सेव्हन लव्हज चौकात आली. तिथून मुकंदनगर रस्त्याने तो थेट लक्ष्मीनारायण चौकात आला. तोपर्यन्त संतोष मानेला अडणवण्याचे शक्य ते प्रयत्न चालू झाले होते. याच चौकात पोलीसांनी PMT ची एक बस आडवी लावली. संतोष माने तिथे देखील अडकला नाही. मित्रमंडळ चौकातून तो सारसबाग चौकात गेला. तिथून सिंहगड रोडला लागला. संतोष माने आज किती जणांना बळी घेवून थांबणार होता याची कल्पना देखील होत नव्हती. अशातच रिक्षाला बस धडकून थांबली.

डिव्हायडर तोडून बस परत फिरत होती तोच एक तरुण आत शिरला आणि संतोष मानेच्या नरडीला धरूनच त्याने बाहेर ओढलं. बस थांबली. संतोष मानेला अटक झाली. 

या अपघातात एकूण ९ जणांना जीव गमवावा लागला. ३७ लोक जखमी झाले. २७ हून अधिक वाहनांचा चक्काचूर झाला. सकाळची वेळ होती म्हणून नाहीतर याहून कितीतरी पट अधिक लोकांनी जीव गमवावा लागला असता. 

पुढे संतोष मानेवर केस पडली. त्यांच जे काही झालं ते आपण टिव्हीवर पाहीले, पेपरात वाचलं. 

पण त्या बसच काय..? 

त्या बसचा नंबर होता, MH14 BT 1532 

हि बस पुण्यातून कोल्हापूरच्या संभाजीनगर बस डेपोला पाठवण्यात आली.

गेल्या सात वर्षांपासून ती बस संभाजीनगर डेपो मध्येच होती. किरकोळ प्रकार सोडला तर या बसमुळे अपघात झाल्याच उदाहरण नाहीच. पण दोन महिन्यांपुर्वी एक घटना घडली, दोन महिन्यापुर्वी अचानक या बसचे ब्रेक फेल झाले. इंदिरा सागर लॉज जवळ असणाऱ्या सिग्नलवर चालू अवस्थेत बसचे ब्रेक फेल झाले आणि सिग्नलवर असणाऱ्या अनेकांना या बसने फरफडत नेले. सुदैवाने यात कोणाला आपला जीव गमवावा लागला नाही,

पण हि तिच बस असल्याची चर्चा सुरू झाली आणि बसची रवानगी राधानगरी आगारकडे करण्यात आली. 

राधानगरी आगारासाठी बस सुरू करण्यात आली. गेल्या रविवारी लक्ष्मीबाई माळी या ६४ वर्षीय महिलेला या बसची धडक बसली. त्या अपघातात तिला जीव गमवावा लागला. हा प्रसंग ताजाच. राधानगरी आगारात “संतोष मानेच्या बसची” चर्चा होतीच. या अपघाताने चर्चेने जोर पकडला.

आत्ता ड्रायव्हर देखील 1532 ला हात लावायला नको म्हणायला लागले. आज ती बस राधानगरी आगारातच आहे. ड्रायव्हर बस चालवायला नकार देत आहेत. त्याबद्दलची बातमी देखील दै. पुढारीतून प्रसिद्ध झाली आहे.

हे हि वाच भिडू. 

2 Comments
  1. बापू लोणकर says

    ती बस मी पकडली होती पो कॉ बापू लोणकर

  2. Balkrishna Lohote says

    बोल भिडू , गेल्या ११ वर्षात आपल्याला अनेकदा विनंती करूनहि एकदा ही आपण ६० / ७० च्या दशकांचा खरा महानायक असलेल्या परंतु मुंबईच्या इतिहासातून दुर्लक्षित राहिलेल्या जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांच्याबद्दल कधीच दोन शब्द लिहिले नाहीत . काय कारण असेल बरं ? सध्या जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांच जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे निदान आता तरी महाराष्ट्राच्या ह्या दुर्लक्षित महानायकाबद्दल काही तरी लिहा

Leave A Reply

Your email address will not be published.