स्टॅलिनची मुलगी जी भारताची सून होती.

सोव्हियत संघाचा सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू 1953 साली झाला. त्याच्या मृत्यूनंतर सर्वात चांगली गोष्ट झाली ती म्हणजे त्याच्या त्रासातून अनेकांची सुटका झाली. त्याचे सहकारी, मंत्री इतकेच काय तर त्याच्या घरातले लोक देखील त्याच्या त्रासातून वाचू शकले नव्हते. पण त्याच्या मृत्यूनंतर सर्वात जास्त समाधानी झाले असेल ती स्टॅलिनची मुलगी स्वेतलाना.

स्वेतलाना स्टॅलिनची मुलगी होती. तिच्या आईला खुद्द स्टॅलिनेच मारल्याची चर्चा होती. पण हा खून होता, आत्महत्या होती की अजून दूसरं कोणतं कारण होतं याबद्दल एक प्रकारचं गुढच असल्याचं सांगण्यात येतं. एक गोष्ट मात्र पक्की होती की स्टॅलिनच्या या मुलीला आई वडिलांच प्रेम कधीच मिळालं नाही.

स्वेतलाना बद्दल सांगायचं झालं तर ती तिची तीन लग्न झाली होती. तिच्या सोबत तिची दोन मुलं असायची पण स्टॅलिन नावाची ओळख स्टॅलिनच्या पश्चात देखील तिचा पाठलाग सोडत नव्हती. म्हणूनच स्टॅलिन हे आडनाव सोडून आहेच आडनाव अलिलुयेवा धारणं केलं होतं.

घर चालवण्यासाठी ती एका ठिकाणी ट्रान्सलेटर आणि शिक्षिका म्हणून काम करत होती. 1960 च्या सुमारात तिने आपल्या आयुष्यातील गुपिते देखील लिहण्यास सुरवात केली आणि याच गुपितांमध्ये होती तिची भारताच्या राजकुमार सोबतच आयुष्य लिहलं.

भारतातले हे राजकुमार आणि त्यांच प्रेमप्रकरण फक्त या दोघांपुरतच मर्यादित राहिलं नाही, दोघांच्या या लव्हस्टोरीमध्ये दोन्ही देशांचे संबध देखील ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ऑक्टोंबर 1963 साली टॉनसिल्सच्या ऑपरेशनच्या संदर्भातून ती कन्तोसेवो हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती. इथेच तिला भारताच्या राजपरिवाराशी संबधित असणाऱ्या राजकुमार ब्रिजेश सिंह यांची ओळख झाली. पहिल्याच भेटीत त्यांची चांगली मैत्री झाली आणि पुढे हिच मैत्री प्रेमाच्या टप्यावर गेली.

घर चालवण्यासाठी ती ट्रान्सलेटर आणि शिक्षिका म्हणून काम करू लागली. १९६० च्या सुरवातीला तिच्या आयुष्यातील गुपिते देखील ती लिहू लागली होती. ऑक्टोबर १९६३ साली ती टोनसिल्सच्या ऑपरेशन साठी कन्तोसेवो हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. तिथेच तिची ओळख भारतातील राजकुमार ब्रिजेश सिंह यांच्याशी झाली. ते सध्याच्या प्रयागराज अर्थात तेव्हाच्या आल्हाबाद शहराजवळील कालाकांकर राज्याच्या राजघराण्यातले सदस्य होते. ते ब्रोनकायटीस आणि फुफुसाच्या आजाराने त्रस्त होते.

ते दोघे एकत्र फिरू लागले. काहीच दिवसात अखंड प्रेमात बुडाले. इतके की दोघांना एकमेकांच्या शिवायच रहाणं अशक्य होतं. अशातच ब्रिजेश कुमार यांना अचानक भारतात परत येणं भाग होतं. ते भारतात परत आले पण स्वेतलाना सोबत असणारे संबध त्यांना भारतात शांत बसून देत नव्हते. अखेर ते पुन्हा रशियाला गेले आणि स्वेतलाना सोबत लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण या गोष्टींची मान्यता रशियाची राज्यव्यवस्था देणं अशक्य होतं. त्या काळात कोणत्याही परदेशी युवकासोबत लग्न करण्यासाठी शासनाची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यातही स्वेतलाना ही स्टॅलिनची मुलगी होती. 

अखेर स्वेतलाना धाडस केलं आणि ती थेट सोवियत संघाचे पंतप्रधान अलेक्सेई कोसिगीन यांना भेटली. लहान असताना ती ज्या ठिकाणी अगदी आरामात खेळत असायची त्याच खोलीत लग्न करण्यासाठी परवानगी मागत होती. काहीही झाले तरी रशियाच्या सरकारने परदेशी नागरिकासोबत तिचे लग्न होणार नाही याची काळजी घेतली. मात्र ब्रिजेश सिंह देखील चिकट होते. ते रशियामध्येच राहीले. एका वर्षानंतर त्यांचा स्वेतलाना जवळ असतानाच मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी स्वेतलाना जवळ ब्रिजेशसिंह यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. त्यांची इच्छा होती की त्यांच्या अस्थींच विसर्जन गंगा नदीतच व्हावं. त्यांची अंतीम इच्छा पुर्ण करण्यासाठी स्वेतलानाने भारतात येण्याचा निर्णय घेतला.

आत्ता स्वेतलाना पुढे दूसरी समस्या होती, ती म्हणजे अस्थी घेवून भारतात येणं. प्रत्येक ठिकाणी ती स्टॅलिनची मुलगी असल्याची तिची ओळख डोके वर काढत होती. सोव्हिएत रशियात सरकारी कामाव्यतिरिक्त कोणत्याही देशात जाण्यास परवानगी नव्हती. साम्यवादी देशांबाबत हे धोरणं शिथील केल जात असे. तीने भारतात जाण्यासाठी परवानगी मागितल्यानंतर भारतात सती परंपरा असल्याचं कारण तिला देण्यात आलं. तर दूसरीकडे सिविएत रशियाला ती पश्चिमी देशात पळून जाण्याची भिती देखील सतावत होती. 

मात्र १९६४ साली रशियाचे पंतप्रधान म्हणून लियोनिद ब्रेजनेव यांची निवड झाली. त्यांची आणि स्वेतलानाची चांगली ओळख होती. या ओळखीचा फायदा घेवून तिने भारतात जाण्याची परवानगी मागितली. रशियाच्या पंतप्रधानांनी देखील ओळख लक्षात ठेवून तिला भारतात जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले.

साल १९६६, डिसेंबर. स्वेतलाना भारतात आली. 

भारत पाकिस्तान युद्ध होवून दोन वर्षांचा काळ झाला होता. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. भारतात अस्थिर वातावरण होतं तर जगाच्या राजकारणात देखील अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर कडवं आव्हान देवून उभा राहिले होते.

त्यावेळी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये ब्रिजेशसिंह यांचे भाचे दिनेशसिंह हे कॅबिनेट मंत्री होते. स्टॅलिनची मुलगी आणि ब्रिजेशसिंह यांचे असणारे संबध हे दिनेशसिंह यांच्या दृष्टिने राजकीय अडचणीत टाकणारे होते. स्वेतलाना दिल्लीत आली आणि ती थेट कालाकांकरला गेली. तिथे ब्रिजेशसिंह ज्या खोलीत रहात होते तिथेच राहू लागली. तिथे त्यांचे अस्थिविसर्जनाचे विधी पार पाडले. पण स्वेतलाना भारतातच कायमचे राहण्याच्या विचारात होती. ती कलाकांकरला सुमारे दोन महिने राहिली.

सोवियत संघ भारताने तिला पुन्हा रशियात पाठवून देण्याविषयी हालचाली सुरू केल्या.

इकडे दिनेशसिंह यांनी ब्रिजेशसिंह आणि स्वेतलानाच्या प्रेमाचा सन्मान करत त्यांना भारतातच राहून देण्याविषयी रशियाला विनंती करण्याची भूमिका घेतली. कलाकांकर इथे न राहता तिला दिल्लीत असणाऱ्या रशियाच्या दुतावासात ठेवण्याविषयी हालचाल करण्यात आली. स्वेतलाना आत्ता दिल्लीत असणाऱ्या रशियाच्या दुतावासत राहू लागली. रशियाकडून दबाव वाढू लागला. तिला आत्ता रशियाला घेवून जाणार याची कल्पना येताच ती मॉस्कोला जात असल्याचं सांगून दिल्लीत असणाऱ्या अमेरिकेच्या दूतावासात गेली. तिथे थांबूनच तिने अमेरिकेकडे व्हिसा देण्याची मागणी केली.

मग ती क्लाकांकर सोडून गेली आणि एका होस्टेलवर राहायला लागली. तिथून ती सोवियत संघाच्या दिलीतील दुत्वासात काही काळ राहील, पण तिथे गेल्यावर मॉस्कोला परत जाण्याचा तिच्यावर दबाव वाढत होता, त्यामुळे ती  एका सोवियत संघाच्या अधिकार्याला आपण मॉस्कोला जात असल्याचे सांगून अमेरिकेच्या दूतवासात गेली आणि तिथेच तिने अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा देण्याची मागणी केली.

अमेरिकेच्या दुतावासात शिरताच तिने आपली ओळख सांगितली. स्टॅलिनची मुलगी अमेरिकेकडे मदत मागते ही गोष्टच राजकीयदृष्ट्या रशियाला कमीपणा दाखवणारी होती. अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांना ही संधी सोडायची नव्हती. त्यांनी थेट अमेरिकेचे सुरक्षा मंत्री डीन रस्क यांना फोन करुन स्वेतलानाविषयी कळवलं. तिकडून निर्णय आला नाही तरी अमेरिकेचा व्हिसा तिला देवू मात्र ती अमेरिकेच जाईल यांची शक्यता देता येणार नाही अस दूतावासाकडून कळवण्यात आलं. 

अखेर तिची रवानगी अमेरिकेच्या पाठिंब्यावरच रोम देशात करण्यात आली. ती रोमला पोहचल्यानंतर रशिया आणि भारताचे संबध ताणले. भारतानेच तिला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा संशय घेतला गेला. अखेर कार ती रोममध्ये सहा महिने राहिली. तिथून ती स्विझर्लंडमध्ये पोहचली तिथल्या सरकारने तिला सहा महिने राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर ती अमेरिकेला गेली ती कायमची. 

Leave A Reply

Your email address will not be published.