चला गेम ऑफ थ्रोन्स समजून घ्या : स्टार्टर पॅक क्रमांक १

सालाबादप्रमाणे (यावेळेस दोन वर्षांनी) गेम ऑफ थ्रोन्स चा टीजर आला आहे आणि त्यावरच्या चर्चेचा लोळ
जगातल्या कुठल्याही सायक्लॉन पेक्षा जास्त आहे.

कारणही तसंच आहे, एक तर दोन वर्षांनी नवा सीजन येत आहे आणि महत्वाचं म्हणजे हा भला मोठा खेळखंडोबा आता संपणार आहे.

तर दोन-तीन महिन्यापासून तुमचे मित्र, मैत्रिणीपासून ते फेसबुक ते जे काय असतील नसतील त्या सोशल मीडियावर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या जागरना मुळे कंटाळला असालच आणि वर तुमचीही उत्सुकता ताणली जात असेल हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? कोण तो जॉन स्नो आणि ड्रॅगन ची आई(?), व्हाईट वॉकर म्हणजे कोण? (जॉनी वॉकर चा भाऊ?) इत्यादी इत्यादी.

पण आता येणार ८ वा सीजन, मग आधीचे ७ सीजन बघण्यात कोण वेळ घालवेल?

तर बोल भिडू मध्ये आम्ही यावर चर्चा केली आणि झालेल्या चर्चेत असं ठरलं कि आपल्या बापुड्या रशीक प्रेक्षकांसाठी गेम ऑफ थ्रोन्स चा क्रॅश कोर्स द्यायचा मग तुम्हीपण चार चौघात मीपण गेम ऑफ थ्रोन्स बघतो म्हणून कॉलर ताठ करून चर्चेत भाग घेऊ शकता.

आम्ही तुम्हाला एक क्रमश: सिरीज घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला कळेल, रिकॅप, म्हणजेच,

‘आधीच्या सर्व सीजन्स मध्ये काय काय झालं?’

सिजन बाय सिजन काय झालं हे कळण्याआधी ह्यातील मुख्य पात्रे आणि काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या
पाहिजे. साधारण गेम ऑफ थ्रोन्स युनिव्हर्सची कल्पना.

गेम ऑफ थ्रोन्स हे वेस्टरॉस नावाचा मुख्य एरिया आणि काही आजूबाजूचे भाग यामध्ये मुख्यतः घडते. वेस्टेरॉस
मध्ये आहेत हाऊसेस म्हणजेच राजघराणी, ह्या सगळ्या हाऊसेस चा मिळून होतो किंग्डम आणि तिथं आहे
राजगद्दी म्हणजेच “आयर्न थ्रोन”. आणि तिथं कोण बसणार ह्यावर चाललेल्या कुरघोड्या म्हणजेच गेम ऑफ
थ्रोन्स!

आणि या किंग्डमच्या बाहेर आहेत फ्री स्टेटस, फ्री फोक, व्हाईट वॉल्कर, इत्यादी.

तर या वेस्टेरॉस मधील मुख्य हाऊसेस खालीलप्रमाणे,

हाऊस स्टार्क. 

इथला लॉर्ड आहे नेड स्टार्क. हाऊस स्टार्क चं घर विंटरफेल, ते आहे पूर्ण किंगडमच्या नॉर्थला. हे आहे सगळ्यात
महत्वाचं, लाडकं आणि एकदम सज्जन लोकांचं हाऊस. त्यांचं सीजील म्हणजेच चिन्ह आहे डायर वुल्फ (मोठा
आडदांड कोल्हा). नेड आणि त्याची बायको कॅटलीनला आहेत ४ मुलं. रॉब (स्टार्क घराण्याचा युवराज), सांसा, आर्या, ब्रॅन, रिकन. आणि एक बास्टर्ड म्हणजेच अनौरस अपत्य जॉन स्नो.

अनौरस अपत्याला बापाचं आडनाव लावता येत नाही म्हणून अशा अपत्यांना अशी वेगवेगळी आडनावे आहेत. ह्या राज्याच्या शेवटाला आहे ‘द वॉल’ जी बनवली आहे बर्फाने कारण त्याच्या पलीकडे आहेत व्हाईट वॉकर्स. व्हाईट वॉकर म्हणजे आर्मी ऑफ डेड (मुडद्यांची फौज).

या वॉलचं संरक्षण करतात धाडसी क्रो’ज (पूर्ण काळे कपडे घातलेले कार्यकर्ते म्हणून त्यांना क्रो म्हणत असावेत). व्हाईट वॉकर सोडून ‘फ्री फोक्स’ सुद्धा राहतात तिकडे. फ्री फोक्स का तर ते कोणत्या राज्याला मानत नाहीत की कोणत्या किंगडम ला. जॉन स्नो ला ह्या वॉलवर पाठवून दिला आहे का तर आई (सावत्र) कॅटलीनला तो आवडत नाही म्हणून. पण ह्या जॉनचं आपल्या भावंडांवर खूप प्रेम आहे खासकरून रॉब आणि आर्या वर.

हाऊस लॅनिस्टर. 

हे सगळ्यात इरसाल हाऊस. मुख्य पात्रे जी फक्त इरसाल नाहीत तर नमुने सुद्धा आहेत ती इथे राहतात. कॅस्टली
रॉक इथे राहणाऱ्या लॅनिस्टर्सचं सीजील आहे दोन पायावर उभा सिंह. ह्यांचा लॉर्ड आहे टायविन एक नंबर बेरकी
माणूस आणि त्याला आहेत तीन मुले, सरसी आणि जेमी जे जुळे भाऊ बहीण आहेत आणि शेवटचा इरसाल, रंगेल,
बुटुकला आणि सगळ्यांचा लाडका टिरियन.

सरसी आणि जेमी ह्या भावंडंचं एकमेकांवर जरा जास्तच प्रेम आहे.जास्त म्हणजे इंसेस्ट (कुटुंबातल्या कुटुंबात झेंगाट) वालं प्रेम (होय इथं असलं पण आहे). ही सरसी आहे ‘किंग’ रॉबर्ट बराथीयन ची बायको आणि तिला आहेत तीन मुले, जोफ्री, टोमन आणि मुलगी मार्सेला.

ही मुले रॉबर्ट ची नसून सरसी आणि जेमीची आहेत (होय हे झेंगाट वरच्या लेवलचं आहे). जेमी ज्याला सर ही पदवी मिळाली आहे त्याच्या धडाडी आणि शॉर्यात्मक लढवय्येगिरीमूळे. शेवटचा टिरियन जो नुसता बाई आणि बाटली मध्ये मदहोश असतो आणि वाढीव डायलॉग मारतो,

आय ड्रिंक वाईन अँड आय नो द थिंग्स

जे खऱ्या अर्थाने सत्य आहे. हा टिरियन विचित्र तोंडाचा आणि बुटका आहे आणि त्याच्या जन्मवेळी त्याची आई मेली म्हणून राजा टायविन त्याला आपलं पोरगं मानत नाही आणि त्याचा तिरस्कार करतो.

हाऊस टारगेरीयन.

ड्रॅगन्स, ड्रॅगन ची सुंदर आई, इत्यादी काय ऐकलं असेल तर ते ह्या हाऊसचं. ड्रॅगनस्टोन हे त्यांचं राज्यं पण रॉबर्ट
बराथियनने किंग एगॉन सह सर्व शिल्लक टार्गेरियन्सना संपवून सत्ता मिळवली. यामधून शिल्लक राहिले फक्त
दोन, डेनिरीस(जी नंतर ड्रॅगन ची आई झाली आणि सर्व फॅन्स जिच्या नावाने *मरतात तीच ती) आणि तिचा भाऊ
विसेरिअस ज्यांना उत्तरेकडच्या फ्री स्टेट मध्ये नेण्यात आले.

हाऊस टारगेरीयनवाले लोक सर्वात सुंदर, चंदेरी केसांचे आणि पांढरेखट्ट आहेत. ह्यांच्या रक्तात ड्रॅगन ना वश करण्याची आणि त्यांना राईड करण्याची ताकत आहे. तसेच आग आणि एक्सट्रीम उष्णेतेपासून सुद्धा ह्यांना काही होत नाही. तर हे असले गुण ह्यांच्या रक्तात आहेत म्हणून बऱ्याचदा ह्यांच्यात सुद्धा “इन्सेस्ट” चे प्रकार झाले आहेत जेणेकरून प्युअर वंश पुढे वाढवला जाईल.

तर सत्तेचे मूळ हकदार (असं त्यांना तरी वाटतं) सध्या बाहेर फेकले गेले आहेत. ह्यांचं सिजील आहे तीन तोंडाचा ड्रॅगन.

हाऊस बराथियन.

हाऊस बराथियन बद्दल ह्या युनिव्हर्स मध्ये जास्त माहिती नाही पण वेळेवेळी ह्यांचा उल्लेख येत राहतो त्यामुळेच
किंग रॉबर्ट बराथियन सोडून विशेष माहिती नाही. पण सगळ्या खेळखंडोब्याला सुरुवात इथूनच होते.

ह्या रॉबर्टने किंग एगॉन विरुद्ध उठाव करून राज्य मिळवलेलं आहे त्यांना हुसकावून लावलं आहे इत्यादी. आणि सरसी सोबत लग्न केलं आहे पण मुलं त्याची नाहीत इत्यादी माहिती आपण वर मिळवली आहे. रॉबर्ट ला दोन भाऊ, स्टॅनिस
आणि रेनली जो “गे” आहे. ह्यांचं सिजील आहे राजमुकुट धारी स्टॅग (रॉयल स्टॅग म्हणू शकता :P).

हाऊस ग्रेजॉय. 

लॅनिस्टर्स नंतर बेरकीपनात ग्रेजॉय वाल्यांचा नंबर लागतो. आयर्न आयलँड वर स्थित ह्या हाऊसचा लॉर्ड आहे
बेलन. बेलनला आहेत दोन मुले, थिऑन आणि यारा. ह्यांचा एक भाऊ पण आहे युरोन. ग्रेजॉय घराण्याने बरेच
कुटाने केले आहेत आणि नंतर राज्य किंगच्या अटॅक पासून सांभाळण्यासाठी थिऑन ला विंटरफेल मध्ये लॉर्ड नेड
स्टार्क कडे वॉर्ड म्हणून दिलं आहे. ह्यांचं सिजील आहे गोल्डन क्रॅकन म्हणजेच मोठा ऑक्टोपस टाईप प्राणी.

तर असे अजून बरेच हाऊसेस आहेत, सगळे मिळून २०. तर वरील मुख्य हाऊसेस सोडून काही उल्लेखनीय हाऊसेस
पुढीलप्रमाणे,

हाऊस टायरेल.

श्रीमंत आणि भरभराटीवाले हाऊस टायरेल. सुब्बता असून हे कुठे युद्ध वैगेरे च्या भानगडीत नं
पडता खोबरं तिकडं चांगभलं म्हणतात.

हाऊस एरीन. 

नेड स्टार्क च्या साडूचं हे राज्य. लॉर्ड जॉन एरीन हा किंग ऑफ द हॅन्ड होता त्याचा खून झाला आहे.
किंग ऑफ द हॅन्ड म्हणजे किंग चा विश्वासू, किंग नंतर पूर्ण किंग्डम मध्ये हा सर्वात पॉवरफुल कार्यकर्ता.

जॉन लाआहे एक ना धड बाळ म्हणता येईल ना मोठा असा मुलगा रॉबिन. तो अजूनही आईच्या कुशीत आईचं दूध पीत
मोठा (?) होत आहे. त्याची आई लायसा हि कॅटलीनची सक्खी बहीण. ह्यांचं सिजील आहे चंद्र आणि त्यासमोर
उडता गरुड.

काही गेम ऑफ थ्रोन्स मधल्या संज्ञा ज्या मध्येच बोलणी करावी लागतात. थ्रोन्सचा ज्वर चढला कि तुम्हीपण
अशाच भाषेत बोलू लागता. 

माय लॉर्ड : प्रत्येक राज्याच्या लॉर्ड ला माय लॉर्ड म्हणावं लागतं.

माय लेडी : लॉर्ड ची बायको माय लेडी (शब्दशः नाही, खुश होऊन जाऊ नये).

किंग ऑफ सेव्हन किंग्डम : सगळ्या हाऊसेस चा राजा.

सर : शूरवीर योद्धे ज्यांनी हि पदवी मिळवली आहे.

इथून पुढच्या भागात आपण सीजन बाय सीजन काय काय झालं ह्याची कल्पना देऊ आणि तुम्हाला येत्या शेवटच्या
सीजन साठी तयार करू. भेटू पुढच्या भागात.

ता.क. गेम ऑफ थ्रोन्सचा ज्वर चढण्यासाठी दिलं आहे ह्याचं थीम सॉंग, ह्याची दररोज पारायणे करा म्हणजे
तुम्हीपण त्या मूड मध्ये घुसाल.

हे ही वाच भिडू.

7 Comments
 1. अमर says

  लै भारी रे भाऊ पण थोडं मोठं द्या की

 2. vaibhav says

  house chi info detatna vestros chya map madhil exact location highlight karun sangiltla tar bara hoil , every character chi olkh Karun deatana sobat tyacha photo asel tar pudhe samjyat soppa hoil .
  lekh khup chan ahe .

 3. No one says

  Awesome dude….I just lv ur writing skill with gavthi tadka ..lv u bhai????????????????

 4. Yogesh Kekane says

  खतरनाक लिखाण केलंय

 5. Nitin Dhanawade says

  नेक्स्ट भाग रिलीज करा

Leave A Reply

Your email address will not be published.