कोळशाच्या खाणीतून सुरवात केलेल्या माणसाने जगातली फेमस क्रॉम्प्टन कंपनी विकत घेतली होती

यशोगाथा वाचन हि एक गोष्ट आणि स्वतःची यशोगाथा तयार करणे हि एक गोष्ट. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत स्वतःची ओळख बनवणे हि साळग्यात मोठी गोष्ट मानली जाते. आजचा किस्सा अशाच एका व्यक्तीचा आहे ज्याने एकदम शून्यातून सुरवात केली आणि आपल्या ग्रुपच्या नावाने थेट विद्यापीठ उभं केलं.

थापर ग्रुप हे सगळ्यात मोठ्या इंडस्ट्रीयल पैकी एक आहे. तर या थापर ग्रुपची सुरवात कशी झाली ते जाणून घेऊया. करमचंद थापर यांनी सगळ्यात आधी थापर ग्रुप उभा केला पण हा थापर ग्रुप इतका मोठा होण्यामागे त्यांचे अपार कष्ट आहेत. 

मूळचे पंजाबचे असलेले करमचंद थापर हे सुरवातीला कोलकात्यामध्ये कोळशाच्या खाणीत व्यापारी म्हणून काम करत होते, हीच त्यांच्या कारकिर्दीची काय ती सुरवात असेल. हळूहळू त्यांना कोळसा खाणीत पैसा दिसू लागला, मग यातून मोठ्या लोकांसोबत त्यांनी ओळख वाढली. पुढे करमचंद थापर यांनी थापर अँड ब्रोस लोमिटेड [ कोल सेल्स ] हि कंपनी उभी केली.

तरुणपणात त्यांनी कोळशाच्या खाणीत केलेल्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होताच. यातून त्यांनी १९१९ मध्ये झारिया या कोळशाच्या क्षेत्राजवळ आपला स्वतःचा कोळसा व्यापार सुरु केला. या क्षेत्रात मूरत असतानाच करमचंद थापर यांना कळलं कि जिथं खाणी आहेत ते कोळशाच्या व्यवसायाचं केंद्र नसतं, त्याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात दुसरं केंद्र असतं.

कलकत्त्यामध्ये मोठ्या युरोपियन व्यापाऱ्यांच्या खाणी आहेत आणि सगळ्या कोळशाच्या खाणी आणि कंपन्या त्यांच्याशी संबंधित आहेत असा विचार करून ते  १९२० मध्ये कोलकातामध्ये जाऊन पोहचले. कोलकातामध्ये तेव्हा कोळशाचा व्यापार ऐन भरात होता. तेव्हाच करमचंद थापर यांनी कोलकात्याच्या बाहेर कोळसा वितरण करण्याचा व्यापार सुरु केला.

स्वतःला व्यापारी लीड ठेवून करमचंद थापर यांनी एक नेता म्हणून गुंतवणूकदार आणि कंत्राटदारांचे विविध गट तयार केले आणि त्यांना एकत्र करून कोळसा वितरणामध्ये सामावून घेतलं. यातून त्यांनी लोकांमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली. इथून ते लोकांमध्ये लोकप्रिय होण्यास सुरवात झाली होती.

त्यांचा व्यापार आता सुरळीत सुरु झाला होता, नफा आणि ओळख दोन्हीही वाढत चाललं होतं.

करमचंद थापर यांनी फक्त कोळश्यावर लक्ष केंद्रित केलं नाही तर कागद, वस्त्रोउद्योग, रसायने, साखर आणि याबरोबरच बँकिंग [ ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ] आणि विमा [ युनायटेड इंडियन इंश्युरन्स ] यांसारख्या क्षेत्रातही काम केलं.

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेडबरोबर पेपर मॅन्युफॅक्चरिंग कारण्याससुद्धा थापर ग्रुपने सुरवात केली.

१९२९ मध्ये थापर ग्रुपची करमचंद थापर अँड ब्रदर्स लिमिटेडची प्रमुख कंपनी स्थापन करण्यात आली. या काळात थापर समूहाने अनेक लहान मोठ्या कंपन्या थापर ग्रुपमध्ये विलीन करून घेतल्या आणि कंपनीचा दबदबा वाढवला.

यातच होती इंग्लंडची क्रॉम्प्टन.

१८७८ साली स्थापन झालेली जगात गाजलेली इंग्रज इलेक्ट्रिकल कंपनी. १९४७ साली देश स्वातंत्र्य होण्याच्या काळात करणचंद थापर यांनी विकत घेतली. काही वर्षांनी त्याच नाव बदललं आणि ठेवलं क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज.

 

१९५६ साली करमचंद थापर यांनी थापर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था सुरु केली. १९८५ शाळांमध्ये या संस्थेला डीम्ड विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आणि त्याचं नाव थापर युनिव्हर्सिटी ठेवण्यात आलं.

१९६३ मध्ये थापर समूहाचे संस्थापक करमचंद थापर यांचं निधन झालं. त्यांच्या चार मुलांनी हे सगळं काम वाटून  घेतलं. इंद्रमोहन थापर, ब्रिजमोहन थापर, ललित मोहन थापर आणि मान मोहन थापर यांपैकी तिसरा मुलगा ललित याला व्यवसायाचा प्रमुख म्हणून निवडण्यात आलं. पुढे व्यवसाय वाढीस लागल्याने या चारही मुलांच्या वाट्याला एक एक विभाग देण्यात आला.

इथं अजून एक इंटरेस्टिंग विषय म्हणजे आपल्या घरात आणि भारतभरात प्रसिद्ध असलेले क्रॉम्पटन कंपनीचे फॅन हे थापर समूहाने बनवलेले असतात. यातून ते दरवर्षी लाखोंची उलाढाल करतात. बऱ्याच बेरोजगार लोकांना थापर समूहाने रोजगार देऊ केला. थापर युनिव्हर्सिटी हि आजही लोकप्रिय युनीव्हर्सीटी आहे. 

गेल्याच वर्षी थापर यांच्या नातवाने हि कंपनी मुरुगन ग्रुपला ७०० कोटींना विकली मात्र आजही आपल्या घराघरात चमकणारे बल्ब, आपले फॅन्स हे एका कोळसा खाणीत काम करणाऱ्या माणसाने बनवले आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.