OYO ला लव्ह हॉटेल्सच्या मार्केटमध्ये हा भिडू जोरदार फाईट देतोय

OYOनुसतं नाव जरी काढलं तुमच्यापैकी अनेक जण खुद्कन हसले असतील. आता तुम्हाला पण माहितेय खरंच मनापासून हसून खुश होण्याची गोष्ट आहे कारण अनेकांचं आयुष्य OYOमुळं खुललंय. पण OYOकाय लव्ह हॉटेल म्हणून चालू झालं नव्हत तर लोकांना सोयीस्करपाने आणि तरीही स्वस्तात हॉटेल्स मिळावेत म्हणून सुरु झालं होतं.

जाऊद्या आपण आपल्या लव्ह हॉटेल्सच्या मुद्यावर येऊ. तर कपल्ससाठी प्रायव्हसी बरोबर एकांत ही देतात. तशी ही कॉन्सेप्ट बरीच जुनी आहे. जपानमध्ये तर हे सुमारे ३० वर्षांपासून आहे.

दुसऱ्या महायुद्धांनंतर जपानमध्ये अनेक जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते तेव्हा यंग कपल्ससाठी ही लव्ह हॉटेल्स वरदान ठेवली होती.

आज जपानमध्ये लव्ह हॉटेल्सची $४० बिलिअन्सची इंडस्ट्री आहे.

आता येऊ भारतात. तर भारतातातील पितृसत्ताक समाज आणि त्यामुळं येणारी तरुण प्रेमीयुगलांवर बंधन, त्यांची प्रायव्हसी मिळवण्यासाठी चालणारी धडपड हे सगळ्यांना दिसत होती पण त्याची बिझनेस आयडिया होत नव्हती.

हॉटेल्स बुकिंग अँप वेगळ्या कारणांसाठीच सुरु झाली मात्र या यंग कपल्सनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला.

आणि त्यातलाच एक स्टार्टअप आता जोरदार चालतंय ते म्हणजे स्टे अंकल.

२०१६ मध्ये संचित शेट्टी याने कपल्सला कमी काळासाठी लागणरे  हॉटेल्स बुक करून देण्यासाठी या स्टे अंकल वेबसाईटची सुरवात केली.

त्यांच्या आयडियाबरोबरच एक गोष्ट हिट झाली ती म्हणजे या स्टर्टअपचं नाव. स्टे अंकल ह्यातलं अंकल हे नाव सोसायटीमध्ये  मान-मर्यादा, मॉरल्स हि सांभाळणं आमचीच जबाबदारी  अश्या आवेशात वागणाऱ्या ‘काका’ लोकांना उद्देशून असल्याचं कंपनीचे फाउंडर सांगतात.
मात्र भारतात असा बिझनेस करणं सोपी गोष्ट नव्हती.

पहिल्या जवळपास २० हॉटेल्सनि त्यांच्या या बिझनेस आयडियाला नाकारलं आणि शेवटी ग्रेटर कैलाश मधल्या २१व्या हॉटेल्सनं होकार दिला आणि बिझनेस सुरु झाला.

हॉटेल्सच्या मालकांनी आपल्या व्यवसायत भागीदार व्हावं आणि त्यांना या बिझनेस मॉडेलबद्दल ‘संवेदनशील’ करण्यासाठी सेठी यांच्या टीम सुरवातीला बरीच एनर्जी खर्च करावी लागली. विशेषतः आंतरधर्मीय अविवाहित कपल्सला हॉटेल्स मध्ये बुकिंग देण्याबबाबत.
शेवटी मग जात आणि धर्म यात हस्तक्षेप करणे हा तहा आपला व्यवसाय नाही आपलं काम आहे हॉटेल रेंटवर देणं हे सांगण्यात हे स्टार्टअप यशस्वी झालं.

तिथून मग त्यांच्या व्यवसायाची गाडी सुसाट निघाली. सुरवातीला स्टे अंकल समाजावर ‘भ्रष्ट प्रभाव’ टाकत आहे असं म्हणत या स्टार्टअपला संस्कृतीरक्षकांकडून अनेक धमक्याही आल्या मात्र हळू हळू त्याही थंडावल्या.

आता कंपनीचं नेक्स्ट टारगेट होतं LGBT समुदायाच्या लोकांना हॉटेल रूम्स उपलब्ध करून देणं. सुरवातीला हे ही जड गेलं मात्र हॉटेलवल्यानं ‘इट्स बिझनेस’ असं सांगण्यात स्टार्टअप यशस्वी झालंच.

लव्ह हॉटेल बिझनेसमधील नवनवीन ‘गरजा’ ओळखून स्टे अंकल आपलं मार्केट वाढवतंय. त्यातलाच एक आहे त्यांचं ‘लव्ह किट’. हॉटेलमध्ये जे वेलकम किट देतात त्यात ह्यांनी थोडं मॉडिफिकेशन केलंय. या लव्ह किटमध्ये काँडोम्स, इंटिमेट वॉश पाऊच ,एक लुब्रिकेंटचा पाऊच आणि एक चॉकलेट रूम बुक करणाऱ्यांना दिल्या जातात. 

आज ४० शहरांमध्ये १८०० ,५-स्टार, ४-स्टार आणि ३-स्टार हॉटेल्ससह या स्टार्ट-अपची घोडदौड जोरात चालू आहे. त्यामुळं भिडू ‘गरज’ ही शोधाची जननी आहे फक्त ती ओळखता आली पाहिजे.

हे ही वाच भिडू :

 

   

Leave A Reply

Your email address will not be published.