स्टीव्ह जॉब्सने जेव्हा पहिला आयपॉड चक्क फिशटॅंक मध्ये फेकून दिला होता..

ऐकून तुम्हाला वाटेल हा स्टीव्ह जॉब्स वेडा होता की काय..आपल्याच कंपनीचा पहिलाच आयपॉड फिशटॅंक मध्ये कोण फेकून देतो ? तो एवढा श्रीमंत आहे कि, आयपॉड पाण्यात फेकून दिला तरी त्याला काहीही फरक पडणार नव्हता. पण मुद्दा पैशांचा नव्हता तर प्रश्न होता कि त्याच्या कंपनीचा पहिला वाहिला आयपॉड मध्ये काय दोष असू शकतात हे सिद्ध करण्यासाठी त्याने कसलाही विचार न करता इतकी मेहनत घेतलेले उपकरण पाण्यात फेकून दिले होते.

आज, आयपॉडचे अनेक व्हर्जन आले आहेत. जे आजही मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्टीव्ह जॉब्स हे नेहेमीच याच गोष्टीवर विश्वास ठेवायचे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी अधिक महत्वाची असते. म्हणून त्याला नेहमीच Apple चे प्रॉडक्ट्स कमी आणि दर्जेदार बनवायची होते. आणि स्टीव्ह जॉब्स चा हाच नियम कंपनीने आजतागायत पाळला आहे.

हा नियम तो किती काटेकोरपणे पाळायचा याच बाबतीतचा एक किस्सा फार इंटरेस्टिंग आहे.

किस्सा तेंव्हाचा आहे जेंव्हा Apple कंपनीचा पहिला वहिला आयपॉड म्युजिक प्लेअर तयार झाला होता.

पहिल्याच आयपॉडवर या इंजिनिअरच्या टीमने कित्येक काळ मेहनत घेतली, संशोधन केलं, प्रोटोटाइप पूर्ण केले आणि शेवटी  आयपॉड तयार करून झाल्यावर पहिला नमुना स्टीव्ह जॉब्ससमोर प्रेझेंट केला थोडक्यात बॉस च्या मंजुरीसाठी हे तयार झालेलं उपकरण सादर केलं.

पण स्टीव्ह हट्ट होता कि हे प्रोडक्ट शक्य तितकं लहानात लहान असावं.

त्यांनी स्टीव्हला सांगितले की त्याची जास्तीत जास्त जाडी १९.८ मिमी आहे. स्टीव्ह निराश झाला. त्याला अपेक्षित अशी कमी जाडी त्या नवीन आयपॉडला नव्हती.  जॉब्सने ते नवीन आयपॉडसोबत खेळला,   त्याची छाननी केली, त्याचे वजन बघून आणखी जाडी कमी करा असे सांगून स्टीव्हने तो नमुना नाकारला. त्याने सांगितलं कि, त्या आयपॉडच्या आत किंचितही रिकामा गॅप ठेवला जाऊ नये. 

इंजिनिअर्सने त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला की आणखी कॉम्प्रेशन म्हणजेच यापेक्षा पातळ उपकरण बनविणे शक्यच नाही. आणि आता अजून नवा आयपॉड तयार करायचा असेल तर  नव्याने शोध लावावा लागेल. 

जॉब्स क्षणभर शांत बसला. शेवटी तो उठून उभा राहिला, ऑफिस मध्ये असलेल्या फिशटॅंककडे चालत गेला आणि त्यात तो आयपॉड फिशटॅंकमध्ये टाकला. तो आयपॉड त्या टॅंकच्या अगदी तळाला गेला आणि त्यातून बुडबुडे निघू लागले. आणि तो म्हणाला कि,

“ते हवेचे बुडबुडे आहेत,” म्हणजे तिथे जागा आहे. ती लहान करा.”

स्टीव्ह जॉब्स हा असा बॉस होता जो त्याच्या अपेक्षेत असलेल्या गोष्टी तो त्याच्या इंजिनिअर्स कडून करवूनच घ्यायचा. स्टीव्ह जॉब्स गॅप सिद्ध करण्यासाठी त्यांनी तो कसलाही विचार न करता तो पाण्यात फेकून दिला.

त्यांची कृती म्हणजे Apple च्या इंजिनिअर्ससाठी एक धडाच होता. कंपनीचा हा पहिला आयपॉड १९.८  मिमी पातळ होता. काही वर्षांनंतर, Apple चा सर्वात अलीकडील आयपॉड फक्त ६.१ मिमी पातळ आहे.

त्याच्या कृतीचा असा अर्थ कधीच नव्हता कि, त्याला त्याच्या इंजिनिअर्सच्या मेहनतीची किंमत नव्हती.

स्टीव्ह ला नेहेमीच वाटायचं कि, प्रत्येक व्यक्तीमध्ये किंव्हा कोणत्याही सेवेमध्ये सुधारणेला नेहमीच वाव असतो असा दृढ विश्वास होता. त्याला माहित होते की या विश्वात कोणतीही परिपूर्ण गोष्ट अस्तित्वात नसते तर ती बनवावी लागते. म्हणून तो नेहेमीच त्याच्या टीमला प्रत्येक उत्पादनामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याचा आग्रह धरायचा कारण त्याला नेहमी असाधारण उत्पादने बनवायची होती.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.