स्लेजिंग करणाऱ्या पार्थिव पटेलची स्टीव्ह वॉने पार इज्जत काढली होती..

क्रिकेट तसा जेंटलमनचा खेळ म्हणून ओळखला जातो पण सोबतच यात रंगत वाढावी म्हणून ग्रांउडवर  विरोधी संघाच्या प्लेअरची स्लेजिंग .करत असतात. या स्लेजिंग प्रकरणामुळे अनेक मोठे वादही आपल्याला पाहायला मिळतात. भारत पाकिस्तान यांच्यादरम्यान चालणारी स्लेजिंग तर आपल्याला माहितीच आहे. पण आज असा एक किस्सा ज्यात शेळीने उंटाचा मुका घेतला म्हणजे आपल्या पार्थिव पटेलने स्टीव्ह वॉ ची स्लेजिंग केली खरी पण स्टीव्ह वॉने दिलेलं उत्तर एकदम जिव्हारी लागावं असं होतं.

वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघात पदार्पण केलं. दुसरा सचिन होतो कि काय अशा वलग्नासुद्धा लोकांकडून सुरु झालेल्या. भारतीय संघात तेव्हा विकेटकिपरची उणीव होती ती पार्थिव पटेलने भरून काढली. २००४ ची हि गोष्ट जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला होता. सिडनी टेस्टमध्ये हि घटना घडली आणि नंतर १५-१६ वर्षानंतर पार्थिव पटेलने हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. 

दिग्गज फलंदाज असलेल्या स्टीव्ह वॉची हि  होती कारण या नंतर तो क्रिकेटला रामराम ठोकणार होता. हि मॅच काहीही करून आपल्याला जिंकायची आहे या धोरणाने ऑस्ट्रलियन टीम खेळत होती कारण त्यांना स्टीव्ह वॉ ला विजयी निरोप दयायचा होता. स्टीव्ह वॉ सुद्धा आपली शेवटची मॅच ऐतिहासिक व्हावी म्हणून जीव तोडून खेळत होता.

पण ऑस्ट्रेलियाची या मॅचमध्ये हवा भारताच्या बॉलिंगने काढून टाकली होती. सुरवातीच्या महत्वाच्या विकेट्स पडायला लागल्या नंतर मॅच वाचवण्यासाठी स्टीव्ह वॉ मैदानात आला आणि चिकाटीने खेळू लागला. हि मॅच ऑस्ट्रेलिया हरायला नाही पाहिजे म्हणून स्टीव्ह वॉ ड्रॉ करण्याकडे मॅच ओढत होता. याच दरम्यान काहीतरी थ्रिल व्हाव म्हणून पार्थिव पटेलला स्टीव्ह वॉ ला चिडवण्याची लहर आली.

स्टीव्ह वॉ खेळत असताना स्टम्पमागून पार्थिव पटेल बोलला कि,

कमॉन स्टीव्ह संन्यास घेण्याच्या अगोदर अजून एक स्लॉग स्लिप मारून दाखव.

पार्थिव पटेल हे दिसायला तेव्हा कॉलेजचं पोरगं होतं आणि अशा पोरानं आपल्याला टोमणे मारणं हे काय स्टीव्ह वॉ ला पटलं नाही. ते रागानं पण शांत डोक्यानं पार्थिव पटेलला म्हणालं

हे बघ मित्रा मोठ्या खेळाडूंविषयी सन्मान व्यक्त करायला शिक. कारण जेव्हा तू पाळण्यात होता ना तेव्हा मी १८ वर्षे अगोदर क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.

एव्हडं खतरनाक उत्तर ऐकून पार्थिव पटेल गप्पच बसला, उगाच आपण एवढ्या मोठ्या माणसाला बोललो असं त्याला फील झालं. त्यानंतर तो स्टीव्ह वॉ ला एकही शब्द बोलला नाही. स्टीव्ह वॉ ने दुसऱ्या इनिंगमध्ये ८० धावांची खेळी केली आणि मॅच ड्रॉ केली.

पण पार्थिव पटेल पुढे हि गोष्ट विसरला नाही. २०१८-१९ मध्ये सब्स्टीट्युट फिल्डर म्हणून आलेला स्टीव्ह वॉ चा मुलगा ऑस्टिन वॉ पार्थिव पटेलला दिसला आणि पार्थिव त्याला जाऊन म्हणला जेव्हा तू चड्डीत होता ना तेव्हा मी टेस्ट डेब्यू केला होता. आणि अशा प्रकारे दुधाची तहान ताकावर पार्थिव पटेलने भागवली. स्टीव्ह वॉ ला उत्तर देता आलं नाही म्हणून पार्थिवने त्याच्या पोराला ऐकून दाखवलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.