आपल्याला जे आणि जसं पाहीजे असतं त्याचाच बिझेनस होवू शकतो हे बोटवाल्याला कळालं
२०१६ मध्ये सगळ्या अगोदर अँपल ने एअर पॉड्स मार्केट मध्ये आणले. क्रिकेटर, अभिनेते यांच्या कानात एक वेगळ्या प्रकारचे हेडफोन दिसू लागले होते. त्यामुळे आपसूकच त्यांच्या चाहत्यांमध्ये यावर चर्चा झडत होती. त्याचदरम्यान इकडे बाजारात जिओने एंट्री केली.
भारताच्या इंटरनेट जगतात धुमाकूळ सुरु झाला. इंटरटेंमेंट मार्केटला बूस्ट मिळालं. इंटरनेट कॅफेत जाऊन गाणी डाऊनलोड करून ते ऐकण्याचा जमाना गेला होता.
भारतीयांचा स्क्रीन टाइम वाढला होता. तर दुसरीकडे मोबाईल कंपन्यांनी ठरवून मोबाईल सोबत हेडफोन देणे बंद केले होते. त्यात भर म्हणजे काही मोबाईल कंपन्यांनी फोनला वायर हेडफोन्स बसवता येणार नाही याची सोय केली. यामुळे वायरलेस हेडफोनची क्रेज आणि गरज वाढत चालली होती.
अँपलचे हेडफोन तुम्हाला आम्हाला परवडणारे नव्हते. यामुळे यावर काम करणाऱ्यांना मोठा स्कोप होता. हे बोटचा संस्थापक असणाऱ्या अमन गुप्ताच्या लक्षात आले.
स्कलक्कँडी, मिवी, नॉईस आणि बोट सारख्या ब्रँडचे हेडफोन सामन्यांना परडवणारे होते.
२०१७- २०१८ नंतर मग यात मोठं मोठ्या कंपन्यांची एन्ट्री झाली. त्यावेळी अँपल आणि बोसच भारी होते. या कंपन्यांचे सगळ्यात स्वस्त हेडफोनची किंमत होरी १५ हजार. मग हे दोन्ही कंपन्यांच्या हेडफोन घेता येत नाही म्हणून माणसं JBL चे हेडफोन घ्यायचे. त्याची किमंत काही कमी नव्हती. त्याला पण १० ते १५ हजार खर्च करावे लागायचे. त्यानंतर सिनेजरचा नंबर लागायचा. त्याची किंमतिची रेंज होती ५ ते १० हजार.
वरचं सगळं गणित बघितलं की एक लक्षात येईल. कामगार, विद्यार्थीं या वर्गाला यातील एकही ब्रँड परडवणारा नव्हता. १ ते ५ हजारांमध्ये चांगले वायरलेस हेडफोन बाजारात उपलब्धच नव्हते. आणि अँपलमुळे तर पॉड्स सारख्या हेडफोनची क्रेज निर्माण झाली होती.
बोट सोबत इतरही हेडफोन ब्रँड होते जे सामन्यांना परवडणारे हेडफोन बनवत होते. मात्र, बोटकडे असे काय होते की ज्यामुळे ते सगळ्यात जास्त सक्सेसफुल ठरले.
पहिले म्हणजे त्यांनी काळ्या किंवा पांढऱ्या रंगात येणारे हेडफोन वेगळ्या वेगळ्या कलर द्यायला सुरुवात केली. तरुणांच्या पसंतीला ही गोष्ट आली.
१० पैकी ९ लोकांना दोन हेडफोनच्या आवाजातील फरक कळत नाही. त्यामुळे आपण घातलेले हेडफोन कशा प्रकारे दिसतात याकडे सगळ्याचे लक्ष असतं. हेडफोन चांगले कशे दिसतील यावर बोटने अधिक फोकस केले.
२०१८ मध्ये क्रिकेटर हार्दिक पंड्या आपल्या करियरच्या टॉप वर होता. तरुणांमध्ये त्याची चांगलीच क्रेज होती. तो युथ आयोकॉन बनला होता. बोटने हार्दिक पंड्याला आपला मेन ब्रँड अॅम्बेसिडर केले. बोट तरुणांमध्ये फेमस होण्याचे हे एक मुख्य कारण आहे.
बोटने हेडफोन गरजे पेक्षा लाईफ स्टाईल म्हणून बाजारात उतरवलं. तुमच्या शर्ट, टीशर्ट सारखे हेडफोनचे कलर मिळू लागले होते.
बोटचा सगळ्यात स्वस्त हेडफोन हा २९९ रुपयांना मिळतो. कमी किमतीत चांगले हेडफोन मिळत असल्याने कामगार, विद्यार्थ्यां आपसूकच बोटकडे वळले. या कॅटेगिरी मध्ये बोट अधिक फेमस आहे.
सध्याच्या तरुणानं मध्ये क्रेज असणारे हार्दिक पंड्या, गुरु रंधवा, कार्तिक आर्यन, शिखर धवन, ऋषभ पंत, नेहा कक्कर हे बोटचे ब्रँड अॅम्बेसिडर होते.
हेडफोन बरोबर स्मार्ट वॉच मध्ये बोट पुढे आलं. कमी किंमतीत अधिक फिचर इथंही हेच स्टॅटर्जी वापरली आणि कमी दिवसात नाव काढलं.
अँपलची कॉपी करतो म्हणून अमन गुप्तावर अनेकजण टिका करायचे. मात्र, अमनने त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. आता तर मार्केट मध्ये विकल्या जाणारे हेडफोन्स पैकी ३५ टक्के एकट्या बोटचा हिस्सा आहे. नवीन मार्केट, तरुणानं केलेलं फोकस, लाईफ स्टाईल म्हणून जाहिरात यामुळे आजच्या घडीला बोट कंपनी १५ हजार कोटींची झाली आहे.
हे ही वाच भिडू
- ‘मेरे पास माँ है’ ची सक्सेसफुल स्टॅटर्जी वापरली आणि बोर्नविटा मार्केटमध्ये सेट झालं
- भावकीच्या भांडणातून ‘आदिदास’ आणि ‘प्युमा’ ब्रँडचा जन्म झाला.
- बाटलीत पाणी विकणार.! लोकांनी येड्यात काढलेलं पण आजही ४० टक्के मार्केट त्यांचच आहे..