एका रोगाला चक्क देवीचं नाव का मिळालं माहित आहे का ?

देवीचा रोग, चेचक, बडी माता, शितला आणि SMALL SPOX अशा अनेक नावाने ओळखला जाणारा हा रोग.

आपल्या जवळच नाव म्हणजे देवीचा रोग.

पण एखाद्या रोगाला देवीचा रोग अस नाव कस पडल याचा विचार कधी केलाय का ?

तसाही हा रोग समुळ नष्ट होवून चाळीस वर्षांचा काळ लोटल्याने असा विचार करण्याची गरज नसली तरीदेखील एक तुमचं बौद्धीक आम्ही मांडतोय. 

साथीच्या या रोगाला ‘देवीचा आजार’ असं संबोधण्यामागे लोकांची एक धारणा कारणीभूत आहे. मानवी शरीरात घडणाऱ्या कुठल्याही बदलास दैवी शक्तीच कारणीभूत असतात असा भारतात पूर्वी समज होता. त्यामुळे कुठलाही साथीचा रोग आला की ज्या कुठल्या गावात किंवा भागात या रोगाची साथ आली त्या भागावर देवीची अवकृपा झाली आहे.

देवीच्या अवकृपेमुळेच संबंधित ठिकाणचे लोक आजारी पडत आहेत, असं पूर्वी लोकांचा वाटत असे.

त्यामुळेच या रोगांना ‘देवीचा आजार’ असं म्हंटलं जात असे.

देवीच्या आजारासंदर्भात शितला मातेची एक कथा देखील सांगितली जाते असे. 

‘शितला माता’ ही आपल्याकडे दुर्गा देवीचा अवतार समजली जाते. या देवीच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात थंड पाण्याचा कलश असतो. जेव्हा एखाद्यावर शितला मातेचा प्रकोप होतो, त्यावेळी  ‘शितला माता’ स्वतःच त्या व्यक्तीच्या अंगात शिरून आपल्या उजव्या हातात असलेल्या झाडूने माता लोकांना आजारी पाडते.

देवीचा शिवाय प्रकोप शांत झाला की दुसऱ्या हातातील थंड पाण्याच्या कलशाच्या आधारे त्या व्यक्तीच्या शरीराला थंडावा प्राप्त करून देते.  त्यामुळे आजारी पडलेली व्यक्ती आपोआपच बरी होते, असे देखील समजण्यात येत असे.

आजाराच्या काळात साक्षात माताच आजारी व्यक्तीच्या अंगात संचार करत असल्याने या रोगावर वैद्यकीय उपचार घेणे देखील पाप मानले जात असे.

साथीच्या आजारात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता असते. ही उष्णता कमी होण्यासाठी रुग्णाच्या शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. त्यामुळेच याकाळात रुग्णाला ‘शितला माते’ची पूजा करण्याचा सल्ला दिला जात असे. त्यामुळे ‘शितला माता’ खुश होऊन आजारी व्यक्तीला लवकरात लवकर बरं करते, असा देखील लोकांचा समज होता.

शितला मातेच्या पूजेसाठी ‘शितला सप्तमी’ नावाचा सण देखील साजरा केला जातो.

या सणाच्या दिवशी लोक घरात अन्न शिजवत नाहीत. आदल्या दिवशी बनवलेलं अन्नच लोक या दिवशी खातात. याच मुख्य कारण असं की ‘शितला माते’ला थंडावा अधिक प्रिय आहे.

हे ही वाच भिडू