पोराचं जिओसाठी कौतुक करताय, पण बाप तर भारताची माती थेट अरबांना विकत होता !!!
रिलायन्स ने करलों दुनिया मुठ्ठी मैं हे शब्दश: करुन दाखवलय.
तस मुंबईत करुन दाखवलय म्हणणारी माणसं दोनच. एक शिवसेना आणि दूसरी रिलायन्स. पैकी शिवसेनेनं करुन दाखवलं का नाही याचा डेटा घोळ घालणारा ठरू पण शकतो पण रिलायन्सचा डेटा शंभर टक्के अस्सल सोनं आहे हे रिलायन्सचं आजचं स्वरुप पाहता मान्यचं करावाच लागतो.
कालच्या दिवशी रिलायन्सचे सर्वेसर्वो मुकेश धिरूभाय अंबानींनी जिओ टिव्हीची ऐतिहासिक घोषणा केली. ऐतिहासिक यासाठी कि कमी पैशात तुफान मज्जा हे समीकरण त्यांनी टिव्हीमध्ये पण जपलं. साहजिक आपल्या माध्यमांमधून मुकेशभाय अंबानी यांचा कौतुक सोहळा चालू झाला. मुकेश अंबानी यांची घौडदौड सुरू आहे यात शंका घेण्यासारखं देखील काहीच कारण नाही पण पण पण….
मुकेश अंबानी यांचे वडिल धिरूभाय अंबानी यांचे किस्से असे आहेत की जे वाचल्यानंतर अस वाटतं की बाप बाप होंता हैं !!!
धिरुभाई अंबानींचा जन्म जुनागढचा. तेच जुनागढ जे भारतात आणि पाकिस्तानात दोन्हीकडं रहायला उत्सुक नव्हतं. धिरूभाई तिथच लहानचे कळते झाले. पुढं ते अबर राष्ट्रात गेले. एका कंपनीत क्लार्क म्हणून. ती कंपनी शेल कंपनीसोबत व्यवहार करायची. धिरूभाई मार्केटिंगची काम पहायचे. तिथच अरब देशातला व्यापार धिरूभाईंच्या लक्षात येवू लागला.
धिरूभाई मुंबईत आले. भारताचा माल अरब देशात पाठवू लागले. मसाले, हळद, कापड वगैरे वगैरे. अरबांना जे हवं असायचं तो सगळा माल त्यांच्याकडे असायचा. धारूभाईं त्या काळात भारताची माती देखील एक्स्पोर्ट करत असत. कारण काय तर एका शेखला दुबईत गुलाबाचा मळा फुलवायचा होता. या मळ्यासाठी लागणारी माती ते पुरवत. कारण काय तर धिरूभाईंकडे कोणत्याच गोष्टीला नाही अस उत्तर नव्हतं.
१९६७ ला कंपनी स्थापन झाली. कंपनीत पैसा शुन्य. धिरूभाई पक्के बनिया आहेत अस वातावरण त्यांनी निर्माण केलच होतं पण त्यांच्या आयड्यांमुळे अनेकांचा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. १९७७ ला रिलायन्स पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. कंपनीचे शेअर बाजारात आले.पण ते लाखभर रुपयेचा असणारा हा शेअर घेण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं.
कंपनीतर्फे नॉयलॉन इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट केला जावू लागला. तेव्हा नॉयलॉन इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करणारी हि एकमेव कंपनी होती. साहजिक अंबानी नावाचा ब्रॅण्ड वाढू लागला. याच काळात अंबानी काळाबाजार करतो अशा बातम्या येवू लागल्या. त्यावर धिरूभाई अंबानीच उत्तर असायचं ज्यांनी माझ्यासोबत व्यवहार केला नाही अशाच लोकांनी माझ्यावर टिका करा…
1982 मध्ये रिलायन्स कंपनीने पॉलिस्टर धागे तयार करण्याचा निर्णय घेतला. ते डाई मिथाइल टेरिथैलेट पासून हे धागे बनवणार होते. त्याच वेळी त्यांच्या सोबत स्पर्धा करणारी कंपनी ओर्के सिल्क मिल्स पण पोलिस्टर चिप्स पासून धागे बनवण्याच्या तयारीत होती. अचानक सरकारने पॉलिस्टर चिप्सना बंदी केली. धीरुभाईंचा मार्ग जास्तच सुखकर झाला.
१९८० साली झालेल्या एका पार्टीचा उल्लेख रिलायन्सच्या उभा राहण्याची साक्ष देणारा आहे. या पार्टीचा उल्लेख टाईम्स मॅग्झीनने केला होता. लोकसभेच्या विजयानंतर या पार्टीत इंदिरा गांधी सहभागी झाल्याच सांगितल जात. जॉईन्ट सेक्रेटरी आर.के. धवन आणि अंबानी यांच्या जवळीकतेचे अनेक किस्से सांगितले जातात. विरोधक नेहमीच रिलायन्सने कसा सरकारचा फायदा घेतला याचे दाखले देतात.
मात्र याबाबत धीरूभाई म्हणत असत, कोणतीही आयडिया पहिला सरकारला विकावी लागते मग ग्राहकांना. आत्ता लायसन्स राजमध्ये धिरूभाईंनी नेमका कसा फायदा घेतला यांचे किस्से तर भरपूर आहेत. कधी काळं तर कधी पांढर दिसणाऱ्या या कंपनीला त्याच्या सक्सेस बद्दल श्रेय दिलच पाहीजे.