दोन-तीन झोपड्या आणि शेती असणाऱ्या जागेवर हॉलिवूड उभारण्याची गोष्ट

१८८९ चा काळ. म्हणजे १९ व्या शतकाचा शेवट आणि २० व्या शतकाचा उंबरठा. बल्बचा शोध लावून जगात प्रसिद्ध झालेल्या एडिसन यांनी आणखी एक शोध लावला. हा शोध अमेरिकन चित्रपट संस्कृतीवर दूरगामी परिणाम करणाऱ्या किनैटोस्कोपचा होता.

याचा युरोपमध्ये देखील मोठा प्रभाव होता; परदेशातील या प्रभावामुळे एडिसनने या डिव्हाइसवर आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविले.

एक डोळा बंद करुन चित्रीत केलेले एका डोळ्याने पहायचे हे याचे तंत्र. या चित्र प्रदर्शन करणाऱ्या तंत्राचा शोध लावल्यानंतर १८९३ साली त्यांनी आपला पहिला ब्लॅक मारिया स्टुडिओ उभा केला. आणि इथूनच चित्रिकरणावरतीही त्यांची एकाधिकारशाही तयार झाली.

याच एकाधिकारशाहीने नकळत अमेरिका आणि जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत चित्रपट इंडस्ट्रीज् असलेल्या हॉलिवूडचा पाया रचला गेला. तो ही अपघातानेच….

खरतर ‘हॉलिवूड’ हे इंडस्ट्रीजचे नाव खूप नंतर मिळाले. आधी ते अमेरिकेतील कॅलिफॉर्निया राज्यातील लॉस एन्जलिस या प्रांतातील उपनगराचे नाव. ‘फादर ऑफ हॉलिवूड’ अशी ओळख असलेले एच. जे. व्हेटली यांनी या शहराची पायाभरणी केली. पुर्वी या प्रदेशाला ‘काऊएन्गा व्हॅली या नावानं ओळखलं जात होतं.

१८५३ पर्यंत तर इथं अवघ्या दोन-तीन झोपड्या आणि शेती होती. हळूहळू हे उपनगर प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारुपाला आलं. बारा महिने स्वच्छ सुर्य प्रकाश, हिरवीगार शेती, समुद्रकिनारा असं सगळं वातावरण इथं होतं.

व्हेटली हे एक रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून अमेरिकेत सुप्रसिद्ध होते. १०० पेक्षा जास्त शहरे वसवण्याचा रेकॉर्ड त्यावेळी त्यांच्या नावावर होतं. एक दिवस व्हेटली हनिमूनसाठी ‘काऊएन्गा व्हॅली’मध्ये आले होते. बिजनेसमन माणसाचं एक वैशिष्ट्य असत की ते कुठे ही गेले तरी फक्त बिझनेसचा विचार चालू असतो. हनिमूनला गेले काय किंवा आणखी कुठे….

इथल्या डोंगरांवर उभं राहून त्यांनी प्रदेशाच बारकाईनं निरीक्षण केलं आणि इथं पण आपण शहर वसवू शकतो अशी कल्पना त्यांच्या मनात आली.

असे मिळाले ‘हॉलिवूड’ नाव 

व्हेटली जेव्हा आपला हनिमून साजरा करत होते, तेव्हाही त्यांच्या डोक्यात बिझनेसच्या गोष्टी सुरु होत्या. त्याच वेळी त्यांच्या समोरुन एक लाकूड वाहतुक करणारा ट्रक जात होता. व्हेटली यांनी या जागेबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल त्याला अधिक विचारलं, असता त्यानं मोडक्या-तोडक्या इंग्रजीमध्ये ‘I am Hauling wood’ म्हणजे मी लाकूड वाहून नेत असल्याचं सांगितलं न् इथचं त्या जागेला लाकूड खेचून किंवा वाहून नेण्याची जागा यावरून ‘हॉलिवूडलँड’ नाव मिळालं.

पुढे व्हेटली यांनी इथली जवळपास ४८० एकर जमिन खरेदी केली आणि स्थानिक व्यापारी इव्हर वीड यांच्या मदतीने ती साईट डेव्हलप करण्यास सुरवात केली. हॉलिवूडलँड असं नावं देवून १९०० सालापर्यंत इथे एक मोठं मार्केट उभं केलं.

व्हेटलींनी ही जागा प्रमोट करण्यासाठी अमाप पैसा खर्च केला. लोकांच्या सोईसाठी बँक उभारल्या. रोड तयार केले. यातुनच त्यांनी दुसऱ्या टोकाला म्हणजे न्युयॉर्क येथील अनेक चित्रपट निर्मीतमध्ये रस असलेल्यांना आकर्षित केलं.

निर्मात्यांना देखील एडिसन यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी ही ऑफर चांगली वाटली आणि त्यांनी आपले बस्तान तिकडं बसवलं.

निर्माता आणि दिग्दर्शक डेव्हिड वॉर गिफ्रित हे १९१० मध्ये बॉयोग्राफ या चित्रपट संस्थेसाठी ‘इन ओल्ड कॅलिफोर्निया’ या शॉर्ट फिल्मसाठी लोकेशन्श शोधत असताना त्यांना हॉलिवूडलैंड येथील लोकेशन्स आवडलं आणि या शहरात सुरु झाला चित्रपटनिर्मीतीचा प्रवास….

पुढे जावून हॉलिवूड या जागेचं चित्रपटासाठी असलेलं महत्व लक्षात घेवून मार्केटिंगच्या दृष्टीनं १९२३ साली इथल्या एका उंच डोंगरावर ‘हॉलिवूडलँड’ असं नाव लिहीलं. १९४९ मध्ये या जागेला आणि पुर्ण अमेरिकेच्या फिल्म इंडस्ट्रीला हॉलिवूड हे नाव दिले गेलं.

आज इथले चित्रपट निर्मीतीचे मार्केट जवळच असलेल्या बुर्बेंक आणि वेस्टसाईड इथं असलं तरी हॉलिवूडचे महत्व आजतागयत अभंग आहे. आज इथे वर्षाला जवळपास ६०० दर्जेदार चित्रपटांची निर्मीत होते. १९२९ साली हॉलिवूडचा अकादमी पुरस्कार म्हणून ओळखला जाणार ऑस्कर पुरस्काची सुरवात इथून झाली.

भारतात ज्या प्रमाणे हैदराबादची रामोजी फिल्म सिटी. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीची राजधानी आहे, अगदी तशीच जगाची चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी राजधानी म्हणून हॉलिवूडला ओळखलं जातं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.