तृतीयपंथीयांच्या एका दिवसाच्या लग्नामागे आहे महाभारतातील ही कथा.

तृतीयपंथीय,किन्नर किंवा हिजडा म्हंटल कि समाज त्याकडे नेहमी तिरस्काराने आणि वेगळेपणाने बघत आला आहे. त्यांना नेहमी खालच्या दर्जाची आणि वाईट वागणूक देऊन त्यांचा सर्रास अपमान केला जातो.

ते आहेत तस त्यांना समाज आजही स्वीकारायला तयार नाहीये. कोणी त्यांना कामावर घेत नाही त्यामुळे काम मिळवणे हे त्यांच्यासाठी खूप कठीण असते. त्यामुळे दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्याकडे नसतो म्हणून  त्यांना सेक्स वर्कर म्हणून किव्हा भीक मागून आपलं जीवन चालवावं लागत.

पण समाजाने कधी समजून घेण्याचा प्रयत्न न केलेल्या तृतीयपंथीयांना फक्त एकमेकांचाच आधार असतो.

त्यांच्या स्वतःच्या काही प्रथा आणि स्वतःची अशी एक “जमात सिस्टीम” असते.  यात एक तृतीयपंथीय दुसऱ्या तृतीयपंथीला दत्तक घेतले जाते. त्यात समलिंगी पुरुषाला आपला मुलगा आणि समलैंगिक स्त्रियांना आपली मुलगी म्हणून दत्तक घेतात. त्यांनी आपल्या सारखं जागू नये यासाठी त्यांना चांगलं भविष्य देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचा गुरु हा त्यांचा नवरा असतो.

त्यांच्या काही प्रथां पैकी एक म्हणजे कुवगम उत्सव. हा तृतीयपंथांसाठी भारतातला सर्वात मोठा उत्सव असतो. हा उत्सव अर्जुनाचा मुलगा अरावण याची आठवण म्हणून साजरा केला जातो.

अरावन हा अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा मुलगा होतं. अर्जुनाला द्रौपदी आणि युधिष्ठिर यांचा एकांतवास भंग केला म्हणून एक वर्ष वनवासाची शिक्षा झालेली असते. तेव्हा फिरत असताना अर्जुनाची गाठ नागलोकातील राजकन्या उलुपीशी होते. या नागकन्या उलुपीपासून झालेला अर्जुनाचा पुत्र म्हणजे अरावण किंवा इरावण. महाभारतातील कुरूक्षेत्रावरील युद्ध सुरु झाले तेव्हा अरावण पांडवांना जाऊन मिळाला. त्याने युद्धात खूप पराक्रम गाजवला.

असं सांगितलं जात कि पांडवांना युद्ध जिंकण्यासाठी कालीमातेच्या चरणी एका योध्याचा नरबळी द्यावा लागणार होता. हा त्याग करण्यासाठी अर्जुनाचा मुलगा अरावण पुढे आला. पण त्याची एक शेवटची इच्छा होती की त्याला मरण्या आधी लग्न करायचं होत. 

पण अरावण मेल्यानंतर विधवा म्हणून जगावं लागणार असल्यामुळे कोणीच त्याच्याशी लग्न करायला तयार होत नव्हत. विधवांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा त्याच्याशी लग्न करायला नकार दिला होता. म्हणून कृष्णाने मोहिनीच रूप धारण करून त्याच्याशी लग्न करतो.

त्यामुळेच ज्या तृतीयपंथीयांना समाज लग्नाची मान्यता देत नाही ते हा उत्सव साजरा करतात आणि अरावणच्या त्यागाची आठवण म्हणून त्याच्याशी एका रात्रीसाठी लग्न करतात. 

भारतातील कुवगाम हे असं गाव आहे जिथे काहीच दिवस का होईना पण त्यांना ते जसे आहेत तसे जगात येत. कुवगाम . १८ दिवसाच्या या उत्सवाला कुवगाम मध्ये भारतातून आणि विदेशातून एक लाखाच्या आसपास तृतीयपंथीय इथे येतात.

तमिळ नववर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून अठरा दिवस हा उत्सव कुवगम या गावात साजरा केला जातो. हा भारतातील तृतीयपंथीयांकडून साजरा केला जाणारा सगळ्यात मोठा उत्सव आहे. या उत्सवात देशाभरातून लाखो तृतीयपंथीय एकत्र येतात. पूर्ण उत्सव त्यांची गाणी नृत्य यांनी सजलेला असतो. १८ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये वेगवेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात.

त्यांच्यासाठी मिस युनिव्हर्स सारखा प्रसिद्धीचा आणि प्रतिष्ठेचा असा मिस कुवगम हा इव्हेन्ट असतो.

Transgenders celebrate the Koovagam festival held in India.

हे सारे तृतीयपंथीय नव्या नवरदेवी सारखे नटतात. सरकारी कार्यालयातून मंगळसूत्र घेतले जाते. त्याला “ताळी” अस म्हणतात. त्यानंतर रात्री मंदिराच्या आजूबाजूला लहान लहान अग्निकुंड पेटवले जातात. आणि तृतीयपंथीय अरावनच्या नावाच मंगळसूत्र घालून लग्न करतात.

त्यानंतर सर्वजनी एका रात्रीसाठी अरावणच्या नवरी होतात. त्यानंतर रात्रभर हलगी, ढोल आणि तिथल्या लोकल वाद्यानवर नाचून लग्न सेलीब्रेट केल जात. त्यांच्यामते अरावणशी लग्न करणं हे त्याच्यासाठी खूप स्पेशल असत. कारण त्यांच्या मते तो त्यांना जगण शिकवत असतो. ज्याच्यामुळे ते आपलं जगणं मॅनेज करत असतात. उत्सवाच्या काळात कुवगम मध्ये मोठ्याप्रमाणात देह विक्री होते.

दुसरा दिवस अरावणाचा त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचा मुखवटा असलेला प्रचंड मोठा पुतळा बनवला जातो. त्या दिवशी सकाळी एकत्र येतात. कापूर टाकून मोठी आग लावली जाते. रांगोळ्या काढल्या जातात. खूप सारे नारळ ठेवले जातात. नाचत “कुमी” हे गाणं म्हंटल जात. आणि लग्नाचा शेवटचा क्षण साजरा केला जातो.

Koovagam 6

त्यानंतर अरावणची मिरवणूक काढून त्याचा त्याग केला जातो. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून घेतली जातात. बांगड्या फोडल्या जातात. भांगेतला सिंदूर पुसला जातो. आणि एका रात्रीसाठी सुहागन झालेल्या तृतीयपंथीयांना विधवा केले जाते.

मोहिनी विधवा झाल्यानंतर तिने जसा आपल्या पतीसाठी आक्रोष केला होतं . तसाच आक्रोष करत छातीवर हात आपटत रडतात. आणि या उत्सवाच्या काळात मिळाल स्वातंत्र्य, प्रेम, आपुलकी सगळ काही सोडून आपल्या पूर्वीच्या जीवनात जातात. या वरून अस दिसून येत कि त्यांना कधीच एक नवरी म्हणून प्रेम मिळणार नाही पण त्यांना हे दुःख नेहमी असेल जे एका विधवेला नेहमी जाणवत असत.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.