सीआरपीफची नोकरी सोडून गँगस्टर झाला..पण पोलिसांनी शेवटी गेम केलाच

ज़माने भर में मिलते हे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता.        नोटों में भी लिपट कर, सोने में सिमटकर मरे हे कई,मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता.

असं म्हणत घर दार,पोरं बाळ सगळं मागे सोडून लाखो तरुण देशसेवेसाठी आर्मीमध्ये भरती होतात.  जीव गेला तरी बेहत्तर पण एकदा देशाच्या रक्षणासाठी उभा राहिलं की मग मागे हटायचं नाही असा लढाऊ बाणा ठेवूनच देशाच्या संरक्षणासाठी हे जवान अहोरात्र सीमेवर पहारा देत असतात.

राजस्थानचा गँगस्टर राजू फौजी मात्र याला अपवाद होता.

घरचं अठरा विश्व दारिद्र्य संपवण्यासाठी राजू CRPF मध्ये भरती झाला.

झोपडीचा बंगला करायचा, गावात बुलेटवरनं  ऐटीत रपेट मारायची,चुलत्याच्या नाकावर टिच्चून जमीन घ्यायची अशी स्वप्न पाहत राजू CRPFची खडतर ट्रिंनिंग पूर्ण करत होता. 

आता नोकरीला लागल्यानंतर राजुच्या आर्थिक परिस्थितीत थोडा तोडा बदल होत होता.सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी लागली म्हणून घरच्यांनी त्याचं लग्नही करवून दिलं होतं. बाहेरून पाहिलं तर एखाद्या  जंटलमनसारखं राजूचं आयुष्य निवांत चाललं होतं. 

मात्र राजुची हाव बदलांपेक्षा कित्येक पटीनं वाढत होती. झटपट पैसे कमवायची इच्छा असलेल्या राजूला सैन्यातील खडतर नोकरी पण करायची नव्हती. 

मग शेवटी सैन्यातून पळून जाऊन त्यानं आपलं गाव गाठलं.

गावाला आल्यानंतर असा एक प्रसंग घडला की राजूला त्याच्या झटपट पैसा कमवण्याचा मार्ग मिळून गेला.काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेली त्याची वाहिनी लव्हरसोबत पळून गेली होती.

रागानं लालबुंद झालेल्या राजूनं त्या प्रियकरालाआणि वहिनीला जंग जंग पछाडून पकडलं आणि दिवसाढवळ्या अख्या गावासमोर त्याचं नाक कापलं.

इतक्या वर्ष साठलेली भडास त्यानं या वाहिनीच्या प्रियकरावर काढली होती. त्याच्या या कृत्यानं गावात आता त्याची दहशत निर्माण झाली होती. आपल्या नावाची झालेली दहशत राजूला आता भारी वाटू लागली होती.

आता एवढं डेअरिंग करणाऱ्या फौजीला आपल्या टोळीमध्ये सामावून घेण्यासाठी त्याला गँगस्टर राजुला ऑफर देऊ लागले होते. अश्याच एका टोळीचा हात धरत राजूनं गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करायचं ठरवलं.  गुन्हेगारी विश्वात राजूनं पाहिलं काम घेतलं स्मगलींगच.

सीमावर्ती राज्य असणाऱ्या राजस्थानात राजूनं अफू, शस्त्रात्रे यांची तस्करी चालू केली.

लवकरच या धंदयांतून राजुला पाहिजे होता तसा पैसा येऊ लागला. मात्र राजुची भूख एवढ्याने मिटणारी नव्हती. त्यांनं आता खंडणी आणि अपहरणही चालू केली. लवकरच वॉन्टेडच्या लिस्टमध्ये राजू फौजीचं नाव झळकू लागला होतं.

राजू मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. उत्तर भारतातल्या सगळ्यात मोठा गँगस्टर गॅंग असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीबरोबर त्यानं आता काम चालू केलं होतं.

 हद्द तेव्हा झाली जेव्हा राजू फौजीनं दोन पोलीस  हवलदारांची हत्या केली.

राजस्थान सरकारवर यामुळं चोहोबाजूनं टीका होत होती. सरकारनं राजू फौजीवर आता एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं. मात्र तरीही राजू फौजी पोलीसांना गुंगारा देत राहिलाच. राजू फौजी कधीच मोबाइल वापरत नव्हता त्यामुळं पोलिसांना त्याला ट्रेस ही करता येत नव्हतं. मात्र कायद्याला जास्त वेळ गुंगारा राजु फौजीला जास्त शक्य नव्हतं. शेवटी पोलिसांनी त्याला गाठलंच. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत राजू फौजी जबर जखमी झालंय आणि आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.