नवसाच कॉईन रोमला टाकण्यापेक्षा नरेंद्र मोदी पुण्यातल्या बाबू गेनू गणपतीला आले असते तर ?

आपल्या देशात किती पण भारी गोष्ट असू दया ना भिडू, आपल्याला आकर्षण असतंय परदेशी गोष्टींचं. म्हणजे बघा हां.. आपला घरात किती पण सोन्याचा घास असू दया ना, आपल्याला आवडणार दुसऱ्यांच्याचं घरचं ताट. आता हे ताट फक्त आपल्या सारख्यांनाच आवडतंय असं पण नाही. तर आपल्या देशाचे पंतप्रधान पण यो मोहमायेतून सुटले नाहीत.

आता असं का म्हणतोय आम्ही ?

तर मोदींचा एका तळ्यात कॉईन फ़ेकतानाचा फोटो जाम व्हायरल व्हायला लागलाय. यामध्ये एक फाउंटन पण दिसतोय बघा. आता हा व्हायरल होणारा फोटो नक्की विषय काय म्हणून आम्ही शोधलं तर, आम्हाला समजलं की, हा फोटो रोम मध्ये भरलेल्या G20 परिषदेच्या राष्ट्रप्रमुखांचा आहे. सगळेच फाऊंटनकडं पाठ दाखवून त्यात कॉईन फेकत होते. हे इटलीच्या रोम शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्याच नाव आहे ट्रेवी फाउंटन. या ट्रेवी फाउंटन मध्ये पैसे टाकले की नवस पूर्ण होतात म्हणे. 

आता वरच्या दोन गोष्टींचा संबंध काय म्हणून विचारलं तर आम्ही सांगू की, मोदींना नवस करायला आणि तळ्यात पैसे टाकायला एवढ लांब जायची गरज नव्हती. इथं पुण्यात आले असते तरी त्यांचं काम झालं असत..हां, आता त्यांना असलं पैसे टाकून नवस करायला गणपतीच्या सणातच यावं लागलं असतं ती गोष्ट वेगळी. अजून सुद्धा  समजलं नसेल तर, 

भिडूंनो पुण्यातला हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती ‘नवसाचा गणपती’ म्हणूनच ओळखला जातो. ‘नवसाच्या’ या गणपतीची कथा रंजक आहेच. पण असं म्हणतात की, तिथं मंडपात जे तळ उभारलेलं असत, त्यात नवस करून कॉईन टाकतात. 

आता लागला का रेफरन्स ? म्हणजे आपला सोन्याचा घास सोडून कशाला दुसऱ्यांची ताट हुडकायची ? असो आता ह्या तळ्यात मोदींनी कॉइन टाकलाय म्हणल्यावर त्याचा इतिहास पण सांगून टाकतो. कसंय ना काही काही विषय सांगायचा राह्यला नाही पाहिजे. म्हणूनच 

ट्रेवी फाउंटनचा इतिहास.. 

जे लोक आर्टचे दिवाने आहेत ना त्यांनी एकदा तरी रोमला भेट द्यायला पाहिजे, बरं का ? म्हणजे एवढ्या कलाकृती आहेत ना या शहरात, विचारूच नका. पण तुम्ही सगळं रोम फिरलात आणि तरी सुद्धा एका कलाकृतीला भेट दिली नाही तर ती रोमची ट्रिप वाया गेली म्हणून समजा. आता तुम्हाला समजलंच असेल मला ट्रेवी फाऊंटन बद्दल बोलायचंय. म्हणजे चौकातला फाऊंटन म्हणटलात तरी वावगं ठरू नये असा फाऊंटन.

साईजच्या बाबतीत बोलायचं झालं, तर हा फाऊंटन एकदम ह्यूज आहे. २६. ३ मीटर उंच आणि ४९. ५ मीटर लांब एवढा ह्यूज बघा. हा त्या शहरातला सगळ्यात मोठा बरॉक फाऊंटन आहे. आता बरॉकचा अर्थ पण सांगितला पाहिजे, नाही का ?

तर बरॉक म्हणजे एक प्रकारचा हा आर्टफॉर्म आहे. इ. स. सन १६०० च्या दरम्यान हा बरॉक फाऊंटन विकसित करण्यात आला. बरॉक आर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला पेंटिंग, मूर्तिकला, संगीत यांचा मिलाफ मिळतो. आता जेव्हा या आर्ट फॉर्मचा विषय येतो तेव्हा पहिलं नाव घ्यावं लागत ते म्हणजे, मायकल अँजीलो याच. रोमच्या सिस्टीन चॅपेलच जे छत बनवलंय ते याच महाशयांनी.

हा फाऊंटन लगेचच बनला नाही आणि सुरुवातीच्या काळात तर तो फाऊंटन अजिबातच फेमस नव्हता. उलट त्या कलाकृतीवर रोमचे १६२९ सालातले आठवे पोप नाराज होते. त्याच मत होत की, या फाऊंटन मध्ये कुठंच ड्रामा दिसत नाही. त्यांच्या नाराजीमुळे त्या रोमच्या राजानं मोठे मोठे आर्टिस्ट बोलावले. आणि विचारलं, बाबांनो कोण उचलणार हे शिवधनुष्य ? यावर जियान लॉरेंजो बेरनीनी नावाचा एक कलाकार पुढं आला. आणि म्हंटला, हम लेंगे यह जिम्मा..

कामाची सुरुवात तर अगदी जोरशे, वाजत गाजत झाली. खरं फायनल टच बघितल्यावर त्यात विशेष असं काही वाटलंच नाही. एव्हाना पोप पण सारखं सारखं नाराज होऊन वैतागलं. आणि आपली नाराजी गुंडाळून ठेवली.

आता लैच स्लो व्हायला लागलय बरं का, आपण स्टोरी जरर्रर्रर्रर्ररा फास्ट फॉरवर्ड करूया बघा. 

तर आता आपण १६२९ नंतर डायरेक्ट १७३० च्या काळात आलोय. आता पोप आहेत क्लीमेंट  XII. त्यांनी तर फाऊंटनला भारी सजवायला स्पर्धाच जाहीर केली. हि स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तीलाच त्या फाऊंटनला सुंदर करण्याचं काम मिळणार होत. यात जिंकले ओलेसांड्रो गैलिली. पण यामुळं संबंध रोमवासीय नाराज झाले. कारण ओलेसांड्रो गैलिली फ्लोरेंस शहराचे रहिवासी होते. 

(त्या रोमवासीयांना पण आपल्या शहरात परप्रांतीयाने येऊन बिल्डिंगा दुरुस्तीच्या नोकरी करू नये असंच वाटत असणार.)

 मग तेव्हा असं म्हंटल गेलं की, आपल्या शहराचा इतका भव्य फाऊंटन दुसऱ्या शहराच्या डिझायनरने बनवावा हे रोमन लोकांना सहन झालं नव्हतं. फाऊंटन बनवण्याच काम रोमच्या निकोला साल्वी या रोमवासीयाला देण्यात आलं. आणि प्रकरण निकाली निघाल.

त्यानंतर या साल्वीने काम सुरु केलं. त्यानं या थीमच नाव ठेवलं, ‘टेमिंग ऑफ द वॉटर’. १७३२ मध्ये काम सुरु झालं. या कामात ते इतके गढून गेले कि, १७५१ मध्ये ते वारलेच. प्रोजेक्ट परत अर्धवट राहिला. त्यानंतर ग्युस्पे पानेनी याने हा प्रोजेक्ट आपल्या हातात घेतला. आणि १७६२ मध्ये काम पूर्ण झालं.

आता तीन लोकांनी बनवलाय म्हणून या फाऊंटन मध्ये तुम्हाला तीन कॅरेक्टर्स दिसतील. या फाऊंटनच्या अगदी मधोमध ओसेनियसची मूर्ती आहे. त्या ओसेनियसचा घोडा दोन समुद्री घोडे घेऊन जातोय. हे घोडे समुद्री भावना दाखवतात. त्या फाऊंटनच्या डाव्या बाजूला अबंडस नावाची समृद्धीची देवता आहे. दुसऱ्या बाजूला हेल्थची देवता आहे.

आता मोदींनी यात कॉईन का फेकला ? 

तर भाई प्रथा आहे म्हणून फेकला.असं म्हणतात कि त्या फाऊंटन मध्ये कॉईन फेकला की, इच्छा पुरी होते. कुणाला सांगायला लागत नाही, “विच्छा माझी पुरी करा” म्हणून. फाऊंटन आपलं काम बरोबर करतो. १ कॉईन फेकला की, तुम्ही रोमला परत येणार आणि दोन कॉईन फेकले तर तुमचं इटालियन पोरीवर प्रेम जडणार.

आता मोदींनी किती कॉईन फेकले आम्हाला काय माहित नाही. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.