लिंगायत समुदायामुळे येडियुरप्पाचं मुख्यमंत्री पद वाचू शकतं का ?

कर्नाटकात लवकरच राजकीय उलथापलाथ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात लिंगायत पंथाचं महत्व राजकीय दृष्ट्या वाढतच चाललं आहे. याच लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी देखील पूर्वीपासूनच राजकारणाचा भाग राहिला आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 16% टक्के लोकसंख्या हि लिंगायत समुदायाची आहे, त्यामुळे प्रचंड व्होट बँक असल्यावर या समाजाचा राजकारणाशी सबंध आला नाही असं शक्यच नाही.

इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या २२४ जागांपैकी १०० जागांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे, हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे आता…

 येडियुरप्पा कर्नाटकात लिंगायत समाजाला हाताशी धरून शक्तीप्रदर्शन करत आहेत.

आपलं मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी त्यांनी आता लिंगायत च्या प्रतिष्ठित महंतांना हाताशी धरलं आहे आणि त्यांनीही येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांना पुन्हा एकदा खुर्चीवरून हटवण्याची मागणी सुरुवातीपासूनच चालू आहे. हे प्रकरण आता थेट दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलय आणि त्यातच बी.एस. येडीयुरप्पा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर दक्षिणेकडील राज्यात आता नेतृत्व बदलण्याच्या अफवांना उजाळा देताना लिंगायत समुदायाच्या नेत्यांसह इतरांनीही शक्ती प्रदर्शन केले आहे.

२०१८ मध्ये जेव्हा ७८ वर्षीय येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवण्यात येत होतं, तेंव्हाही त्यांच्या वयामुळे  त्यांना विरोध केला गेला होता.

तेंव्हा त्यांना शपथविधीनंतर फ्लोर टेस्टच्या दरम्यान येडीयुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर जेडीएस आणि कॉंग्रेसने मिळून सरकार बनवलं होत आणि एचडी कुमारस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्री पद गेलं होत. मात्र त्यानंतर पक्षातले काही आमदार भाजपात गेले आणि पुन्हा भाजपचं  सरकार आलं

आणि २६ जुलै २०१९ ला ७८ वर्षीय येडीयुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले.

अजूनही त्यांना होणारा विरोध कायम आहे म्हणूनच त्यांनी लिंगायत समाजाला हाताशी धरून शक्तीप्रदर्शन केलं आहे.  लिंगायत समाजातील तीन डझनहून अधिक बंडखोर नेत्यांनी बेंगळुरू येथे  मुख्यमंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.

कर्नाटक राज्यातील सर्वात शक्तिशाली मट मानल्या जाणार्‍या सिद्धगंगा मठाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सिद्दलिंग स्वामी हे करतात.

सिद्दलिंग स्वामी हे माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, “ही फक्त लिंगायत समाजाची लढाई नाही. येडीयुरप्पा हेच कर्नाटकचे नेते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत चांगलीच कामगिरी केली आहे. मग त्यांनी मुख्यमंत्री पदावरून का जावे? आम्हाला ते पुढील २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत तेच आमचे मुख्यमंत्री असायला हवेत”.

दरम्यान, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी ट्विटरवर येडियुरप्पा यांना काढून टाकणे चूक सिद्ध होऊ शकते असे म्हटले होते.

केंद्रातल्या नेतृत्वाने लिंगायत समुदायाच्या व्होटबँकला त्रास न देता नेतृत्वात पिढीजात बदल घडवून आणण्याची गरज आहे.

जर आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या बळकट असलेले आणि संख्येने मोठा असलेल्या लिंगायत समुदायावर प्रचंड नियंत्रण असणाऱ्या येडीयुरप्पा यांच्यासारख्या नेत्याला आव्हान देणे हे भाजपची चूक सिद्ध होऊ शकते हे मात्र नक्कीच आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.