सुभाषबाबुंना जर्मनीला जात असताना संपवण्याचा प्लॅन आखण्यात आला होता.. 

आयर्लंडचे इतिहासकार यूनन ओ हैल्पिन यांनी गुप्त कागदपत्रांधून ही गोष्ट उघडकीस आणली होती. त्यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की जेव्हा भारतातील ब्रिटीश सत्तेच्या विरोधात सैन्य तयार करण्याची योजना सुभाषचंद्र बोस आखू लागले तेव्हाच ब्रिटीश सत्तेला सुभाषबाबूंचा संभाव्य धोका नजरेत आला व त्यांनी जर्मनी मध्ये पोहचण्याआधीच सुभाषबाबूंना संपवण्याचा प्लॅन आखला होता. 

यूनन ओ हैल्पिन यांचा सर्वाधिक भर हा ब्रिटीशांच्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास व त्यांची कागदपत्रे उघड करण्यावर राहिलेला आहे. 

काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण २००५ साली ते कलकत्ता येथे आले होते. कलकत्ता येथे भाषण करत असताना ते म्हणाले होते की जानेवारी १९४१ पासून कलकत्यातून नेताजी सुभाषचंद्र बोस अचानक गायब झाले. ते कुठे गेले असतील याचा तपास ब्रिटीश गुप्तचर संघटना करत होती. गुप्तचर संघटनेच्या मते सुभाषबाबू हे जपान किंवा पुर्वेच्या दिशेने गेल्याची शक्यता होती. त्या दिशेने तपास देखील चालू होता. 

मात्र अचानकपणे गुप्तचर संघटनांच्या हाती एक पत्र लागलं. या पत्रानुसार सुभाषबाबू सध्या काबुलमध्ये असून मध्य पूर्व रस्त्याच्या मार्गे ते जर्मनीमध्ये जाणार आहेत. 

त्यानंतर हालचाली वाढवण्यात आल्या. ब्रिटीनच्या मुख्यालयातून तुर्की येथे असणाऱ्या दोन गुप्तहेरांवर जबाबदारी देण्यात आली की सुभाषबाबू जर्मनीमध्ये पोहचण्यापूर्वी त्यांना ठार करण्यात यावं… 

पण त्यांचा हा प्लॅन अशक्य झाला कारण सुभाषबाबूंनी मध्य आशियातून थेट सोव्हिएत रशियाचा रस्ता पकडला व रशियामार्गे ते जर्मनीमध्ये पोहचले. 

हैल्पिन आपल्या भाषणात सांगतात की,

ब्रिटीशांना सुभाषबाबूंची सर्वांधिक चिंता होती. ते जर आपल्या प्लॅनमध्ये सक्सेस झाले तर त्याची मोठ्ठी किंमत ब्रिटीशांना सोसावी लागेल यावर सर्वांच एकमत असल्याने कोणत्याही परिस्थितीत जर्मनीमध्ये जाण्यापूर्वी सुभाषबाबूंना संपवण ब्रिटीशांना गरजेचं वाटत होतं. 

जेव्हा हैल्पिन यांनी कागदपत्रातून ही गोष्ट उघड केली होती तेव्हा नेताजींचे नातू व हॉवर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर असणारे सुगत बोस म्हणाले होते की, त्यांनी ज्या पद्धतीने तत्कालीन ब्रिटीश भारतीय सैनिकांमध्ये देशप्रेम निर्माण केले होते, त्यानुसार आपल्या इतक्या मोठ्या सैन्यामधून भारतीय सैनिकांना सहजपणे बाजूला काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यामुळेच ब्रिटीश सरकारसाठी सर्वात मोठ्ठा धोका हा सुभाषबाबूंचाच होता हेच सिद्ध होते. 

यानंतरच्या इतिहासात सुभाषबाबूंनी हिटलरची भेट घेतली, पुढे जपानमध्ये गेले आझाद हिंद सेनेची स्थापना या सर्व गोष्टी हेच सिद्ध करतात की सुभाषचंद्र बोस यांची किती भिती ब्रिटीशांना होती. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.