फक्त या एका कारणासाठी सुभाषबाबू हे जिन्नांना पंतप्रधान करण्यासही तयार झाले होते

१४ ऑगस्‍ट १९४७ रोजी भारताची फाळणी होऊन देशाचे दोन तुकडे झाले. त्‍यावेळी देशात ठिकठिकाणी दंगली उसळल्‍या होत्‍या. यामुळे तब्‍बल १.४५ कोटी लोक प्रभापित झाले तर १० लाखांच्‍या आजपास नागरिकांना हिंसाचारामध्‍ये जीव गमवावा लागला. लाखो मुले या दंगलीत अनाथ झाले तर मुस्‍लीम बहुसंख्‍य असलेली गावेच्‍या गावे उजाड झालीत.

पण भारताच्या फाळणीसाठी पंडित नेहरुच जबाबदार होते, असे अनेक उजव्या विचारसरणीचे लोक सांगतात.

नेहरुंना देशाचे पहिले पंतप्रधान व्हायचे होते मग त्यासाठी फाळणी झाली तरी चालेल असा त्यांचा हट्ट होता, असे त्यांचे मत असते.

मात्र, फाळणीसाठी मोहम्मद अली जिना यांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचा दावा पाकिस्तानी लेखक इश्तियाक अहमद यांनी केला आहे.

इश्तियाक अहमद यांनी आपल्या ‘जिन्ना; हीज सक्सेस अ‍ॅण्ड फेलर अ‍ॅण्ड रोल इन हिस्ट्री’ या पुस्तकात हा दावा केला आहे. फाळणी होऊ नये यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष आग्रही होते. मात्र, मुस्लिम लीगचे नेते जीना फाळणीवर अडून बसले होते.

फारुख एहमद दार यांनी देखील आपल्या ‘जिन्नांचे पाकिस्तान : स्थापना आणि आव्हान’ या पुस्तकात असचं काहीस म्हंटले आहे.

२३ मार्च १९४० रोजी मुस्लिम लीगने लाहोर ठराव संमत केला. या नुसार त्यामध्ये स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. यावेळी हा ठराव मागे घ्यावा यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे जिन्ना यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते.

दार यांनी आपल्या पुस्तकात एकुण तीन महत्वाच्या प्रसंगांचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात,

पहिली घटना म्हणजे, सुभाषचंद्र बोस यांनी जून १९४० मध्ये हा फाळणीचा लाहोर ठराव मागे घेण्यासाठी किंबहुना रद्द करण्यासाठी जिन्ना यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याची ऑफर दिली होती. 

सुभाषबाबू यांनी तेव्हा फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना केली होती. काँग्रेस अध्यक्ष असल्यापासून सुभाषबाबू जिन्ना यांच्या मुस्लिम लीगला सोबत घेण्याच्या प्रयत्नात होते.

तशी या दोघांची पत्रे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सुभाषबाबूंच्यानंतर काही दिवसांनी सी. राजगोपालचारी हे मुस्लीम लिगच्या नेत्यांना भेटले. या भेटीत तर त्यांनी पंतप्रधानांसोबतच आपल्या आवडीची आणि हवी असलेली कॅबिनेट मंत्रीपद ही देण्याचे मान्य केले.

अगदी शेवटपर्यंत कॉंग्रेसने हे प्रयत्न चालू ठेवले होते.

एप्रिल १९४७ मध्ये महात्मा गांधी हे मुस्लीम लीगने स्वतंत्र राष्ट्राची मागणी सोडल्यास केंद्रातील सत्ता मुस्लीम प्रशासनाच्या हातात देण्यास तयार होते.

पुढे जिन्ना यांनी कशा शब्दांत या सर्व गोष्टींना नकार दिला हे दार यांनी सांगितले आहे.

या सर्व प्रलोभनांपुढे जिन्ना वितळले नाहीत. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, त्यांच्या मते हे स्वतंत्र राष्ट्र दक्षिण आशियातील मुस्लिमांच्या हिताचे आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांनी जिन्ना यांचे मन वळवण्यास अपयशी ठरले असतानाही कॉंग्रेसच्या नेत्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत पाकिस्तानच्या निर्मितीस अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. तरीही, ते असे करण्यात अपयशी ठरले.

कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधानांनी १६ मे १९४६ रोजी कॅबिनेट मिशन आणली.

ही योजना का स्विकारली याबाबत सांगताना डार आणि इतर लोक संकोचत नाहीत. या कॅबिनेट मिशनने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी नाकारली होती. मात्र प्रशासकीय सोयीसाठी केंद्र सरकारकडे कमी जबाबदाऱ्या देवून प्रांताना जास्त अधिकार देण्यात यावेत आणि दहा वर्षांनी या संबंधाचा पुन्हा आढावा घ्यावा, असे म्हंटले होते. सोबतच प्रिंसली स्टेट्सनेही केवळ संरक्षण आणि परराष्ट्र हे विषयच केवळ केंद्राकडे द्यावे. आणि इतर सर्व अधिकार आपल्याकडे ठेवावेत. त्यामुळे त्रिमंत्री योजना अंशतः मान्य झाली.

मात्र पाकिस्तानी – अमेरिकन लेखिका आयशा जलाल यांनी या थेअरी नाकारल्या आहेत. जलाल यांनी १९८५ मध्ये या विषयावरती एक संशोधन केले होतो.

विषय होता,

The Sole Spokesman: Jinnah, the Muslim League and the Demand for Pakistan.

त्यांच्या संशोधनातुन असा निष्कर्ष आला की ‘अखिल भारतीय पातळीवर जिन्ना यांनी भारतीय मुस्लिमांचे एकमेव प्रवक्ता म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला. १९३० नंतर जीन्ना यांना काळजी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर होणाऱ्या सत्ता आणि त्यासंबंधीतील व्यवस्थेसाठी होती. यालाच जोडून ‘दुसर्‍या ठिकाणी त्या लिहितात,’ कॉंग्रेसने फाळणीचा आग्रह धरला होता, जिन्ना मात्र फाळणीच्या विरोधातच होते. तसेच जिना यांनी सत्ता वाटपाबाबत काँग्रेससोबत करार करण्याबाबत भूमिका बजावली असल्याते प्रा. जलाल यांची थेरी होती.

१९८० पर्यंत या थेरीला काहींनी मान्यतादेखील दिली होती.

पुढे २३ मार्च २००५ रोजी डॉनमध्ये प्रकाशित झालेल्या ‘बिथवीन मिथ आणि हिस्ट्री’ या लेखात ती अशी तक्रार करते की

जीन्ना यांनी पाकिस्तानची मागणी केवळ भारतावर दबावतंत्राचा वापर करण्यासाठी केली आहे, असा तिचा गैरसमज करुन देण्याचा प्रयत्न चालू होता.

तिच्या ‘द सोल स्पोक्समन जिन्ना, मुस्लिम लीग अँड द डिमांड फॉर पाकिस्तान अ‍ॅण्ड सेल्फ अँड सोर्व्हनिटीः इंडिव्हिज्युअल ॲण्ड कम्युनिटी इन द साऊथ एशियन इस्लाम सिन्स 1850’ या पुस्तकात तिने मुस्लीम राष्ट्रवादाची मागणी आणि उत्तर वसाहतवादी राजकारणाचे आणि सार्वभौम राज्याचे अस्वस्थ वर्णन केले आहे.

पुढे त्या लाहोर ठरावाचा उल्लेख करतात, ज्यामध्ये, जीन्ना यांनी “विभाजन” किंवा “पाकिस्तान” या नावाचा उल्लेख करणे टाळले होते.

त्याऐवजी उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भारतातील मुस्लिम-बहुसंख्य प्रांतांचे “स्वतंत्र” असे गट तयार करण्याची मागणी केली. जे घटकराज्य स्वायत्त आणि सार्वभौम असे असतील.

जीन्ना यांनी देखील अनेकदा आपण भारतावर सत्तेसाठी दबाव म्हणून पाकिस्तानची मागणी करत नाही असे सांगितले होते. २३ नोव्हेंबर १९४० मध्ये दिल्लीमध्ये बोलताना देखील त्यांनी हेच सांगितले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.