कोणतंही संकट येवो, सुभाषबाबूंचे ट्रबल शुटर म्हणून शरदचंद्र बोस फेमस होते……..

सुभाषचंद्र बोस यांचं नाव अख्ख्या जगाला माहिती आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना करून ब्रिटिशांची झोप उडवणारे सुभाषबाबु सगळ्यांनाच परिचित होते, पण सुभाषबाबूंच्या वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात जास्त योगदान कोणाचं असेल तर ते म्हणजे शरदचंद्र बोस यांचं. सुभाषबाबूंची कीर्तीचं इतकी मोठी होती कि त्या सावलीत शरदचंद्र बोस हे नाव लोकांना जास्त परिचयाचं राहिलं नाही, पण आज आपण जाणून घेऊया शरदचंद्र बोस यांच्याविषयी.

शरदचंद्र बोस हे सुभाषबाबूंचे मेज दादा म्हणून प्रसिद्ध होते.

त्यांच्यामुळेच सुभाषबाबूंनी राष्ट्रीय राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सुभाषबाबू आणि शरदचंद्र हे दोघे भाऊ होते यात सुभाषबाबू ८ वर्षांनी लहान होते. शरदचंद्र यांच्यावर बंग भंग आंदोलनाचा मोठा प्रभाव होता आणि त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षी ते काँग्रेससोबत जॉईन झाले. कॉलेजकाळात शरदचंद्र यांनी आपल्या भाषणाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या.

१९११ ते १९१४ या काळात शरदचंद्र बोस हे इंग्लंडमधून वकिलीची डिग्री घेऊन आले आणि कोलकाता हायकोर्टात वकिली करू लागले. हा तो काळ होता जेव्हा क्रांतिकारक लोकं आणि राजकीय आंदोलनकर्ते जेलमध्ये जाण्यास घाबरत नव्हते याच कारण होतं कि त्या सगळ्यांना विश्वास होता कि शरदचंद्र बोस हे आपल्याला सुखरूप जेलमधून बाहेर काढतील आणि आपल्या परिवाराची काळजीसुद्धा घेतील. 

शरदचंद्र बोस यांचं घर १, वुडबर्न पार्क राजकीय चळवळींचं माहेरघर बनलं होतं आणि गांधी, नेहरू हि सगळी मंडळी शरदचंद्र बोस यांच्याच घरी जमायची. या सगळ्या घटना आणि कारवाया लहानगे सुभाषचंद्र बोस पाहत असत आणि त्यांना आपल्या भावावर विश्वास होता कि पुढे काही झालं तर आपला भाऊ आपलं संरक्षक बनेल. जेव्हा काहीही अडचण सुभाषबाबूंना येत असे तेव्हा ते शरदचंद्र बोस यांना फोन करत आणि अडचण सोडवत असे.

जेव्हा सुभाषचंद्र बोस यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधल्या एका घटनेमधून प्राचार्यानी सस्पेंड केलं तेव्हा शरदचंद्र बोस यांनी आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करून सुभाषबाबूंना ऍडमिशन स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये केलं. सुभाषबाबूंची आर्थिक सगळी जबाबदारी शरदचंद्र बोस हेच पाहत होते. ज्या काँग्रेसला बंगालमध्ये उभं करण्यासाठी शरदचंद्र बोस यांनी आपलं सगळं काही पणाला लावलं होतं. इतका वेळ दिला प्रसंगी इंग्रजांसोबत पंगा घेतला पण त्याच काँग्रेसमधल्या काही लोकांनी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षपदाला खोडा घातला होता.

१९३९ च्या त्रिपुरा अधिवेशनात सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामाच दिला तेव्हा फक्त शरदचंद्र बोस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. या घटनेचा उद्रेक होऊन शरदबाबूंनी थेट गांधीजींना खरमरीत पत्र लिहून समाचार घेतला होता. सुभाषचंद्र बोस हे शरदचंद्र यांना खूप सन्मान देत त्यांच्याशी कायम आदराने बोलत असे. इतकं प्रेम आणि विश्वास या दोन भावांमध्ये होता. 

आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आणि यातून सुभाषचंद्र बोस हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले, त्यांच्या शौर्याच्या घटना सगळीकडे निनादू लागल्या. या सगळ्यात शरदबाबू दिसेनासे झाले. त्यावेळी सुभाषबाबूंनी जे जे पराक्रम केले त्याचा पाया हा शरदचंद्र बोस यांनीच घातलेला होता. स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक केस त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलेल्या होत्या त्या कारणामुळे ८ वर्षे ते जेलमध्ये राहिले.

शरदचंद्र बोस यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ट्रबल शुटर म्हणून सुभाषबाबूंना अनेक महत्वाच्या घटनांतून वाचवलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.