आता फुटबॉलप्रमाणे क्रिकेटमध्ये खेळाडू जखमी झाला तर सबस्टीट्युट खेळवता येणार.

यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप नुकताच संपला. क्रिकेट इतिहासात ४४ वर्षानंतर यंदाच्या वर्ल्डकपने नवा चॅम्पियन्स दिला हे खरं पण सोबतच इतिहासातील सर्वात वादग्रस्त वर्ल्डकप म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याला कारण ठरलं ते अँपायर्सची गचाळ कामगिरी.

एकतर पावसाळ्यात वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले म्हणून आयसीसीला जगभरातील क्रिकेटप्रेमी शिव्या घालत होते. पावसामुळे बरेच सामने एक बॉल ही न खेळवता रद्द करावे लागले होते. ते कमी म्हणून की काय त्यात अँपायर्सनी चुकीचे निर्णय देऊन अनेक सामन्यांचे चित्रच बदलून टाकले होते. यात रोहीत शर्मा क्लिअर नॉट आऊट असतांना आऊट देण्यापासून ते फायनल मॅचमध्ये ओव्हर थ्रोवर ५ ऐवजी ६ रन्स देण्यासारख्या घोडचूका अँपायर्सनी केलेल्या.

यावेळेस फायनल मॅच टार्गेट चेस करतांना आणि सुपर ओव्हर दोन्हीत टाय झाल्यानंतर विजेता ठरवण्यासाठी जो नियम वापरला तो क्रिकेट इतिहासात काळा दगडावरची पांढरी रेघ बनून कायम राहील. तो नियम ज्याच्या कुणाच्या सुपीक डोक्यातून आला, तो जर समोर आला तर कुठलाही क्रिकेटप्रेमी बॅटने त्याच डोकं फोडल्याशिवाय राहायचा नाय.

तर यासोबतच हा वर्ल्डकप आणखी एका कारणानं चर्चेत राहिलेला. ते म्हणजे मोठमोठे प्लेयर जखमी होऊन वर्ल्डकप मधून बाहेर गेलेले.

यात दक्षिण आफ्रिकाचा हशीम आमला, डेल स्टेन, भारताचे शिखर धवन आणि भुनेश्वर कुमार शिवाय आणखी काही प्लेयर्स खेळतांना मैदानावर जखमी होऊन बाहेर झालेले. अशा जखमी झालेल्या प्लेयरच्या जागी आतापर्यंत ट्वेलथ मॅन म्हणून राखीव असलेल्या प्लेयरला सब्स्टिट्यूट प्लयेर म्हणून खेळवल्या जात होतं. पण त्याला फक्त फिल्डिंग करावी लागायची असा नियम होता.

मात्र आता हा नियम आयसीसीने बदलला असून सब्स्टिट्यूट प्लयेर इथून पुढे कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळवला जाणार. म्हणजे तो बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही करू शकणार. हा नवीन नियम येत्या १ ऑगस्ट पासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या ऍशेस सिरीजमध्ये लागू केला जाईल.

असा असेल नवा नियम :

  • जखमी प्लेयरच्या कन्कशन सब्स्टिट्यूट प्लेयर घ्यायचा की नाही यावर टीम मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (डॉक्टर) घेतील. डॉक्टरने निर्णय घेतल्यानंतर त्यावर मॅच रफेरी अंतिम निर्णय घेतील.
  • यासाठी सगळ्या टिम्सला सोबत डॉक्टर ठेवावा लागणार. तो प्लेयरची फिटनेस टेस्ट घेऊन तो खेळू शकतो की नाही हे ठरवणार. डॉक्टरला आपल्या टीमच्या फायद्याचा निर्णय घेता येणार नाही.
  • प्लेयरची बदली ही लाइक फॉर लाइकच्या आधारावर होणार. म्हणजे बॅट्समनच्या बदल्यात बॅट्समन आणि बॉलरच्या बदल्यात बॉलर घ्यावा लागणार. पण मग यात असंही होऊ शकत की, बॅटिंगची कंडिशन बघून मिडल ऑर्डर मधला बॅट्समन जखमी झाला तर त्याजागी ऑपनर बॅट्समन घेता येईल किंवा मग पिच स्विंग मिळत असतांना फास्ट बॉलर जखमी झाला तर त्याजागी स्पिनर घेता येईल.
  •  सध्या सगळ्या टिम्स १५ प्लेयर्सची निवड करून खेळतात. आता या नवीन नियमानुसार लाईक फॉर लाईक या तत्वावर निवड करावी लागणार.

असाच काही वर्षापूर्वी असाच सुपरसबचा नियम आयसीसीने आणला होता. यातही फुटबॉल प्रमाणे एक खेळाडू सबस्टीट्युट म्हणून खेळवता येत होत. पण या नियमात अनेक लूपहोल्स होते. फक्त टॉस जिंकणाऱ्या टीमला याचा फायदा होत होता. भिक नको पण कुत्रा अवर अशी वेळ आली. अखेर सगळ्यांनी मिळून आयसीसीला हा नियम रद्द करायला लावला.

यावेळी अशी वेळ येऊ नये म्हणून हा नियम दोन वर्षांसाठीच लागू केला जाणार आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि काही कमतरता निघतील त्या आधारावर हा नियम पुढे चालू ठेवायचा की नाही ठरवले जाणार.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.