१०० वर्षाची परंपरा असणाऱ्या सोसायटी चहाची ना चव बदलली ना क्वालिटी

‘चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच’,’एकदा प्याल तर परत याल’ अशा पाट्या लावत आज चौकाचौकात चहाची दुकानं लागलेत. आमचाच चहा वेगळा असं म्हणत ह्या फ्रेंचाइजीवाल्यांनी मसाला चहाचे एवढं  प्रकार काढलेत की त्यातले काही चहा आता खोकल्याच्या औषधासारखं लागू लागलेत.  जास्तीच नाही बोलतंय पण आता आपला साधा चहापत्ती, दूध आणि साखर टाकून केलेला चहा भेटणं अवघड झालंय.

मसाला चहाचं फॅड येयच्या आत घरात मस्त आपला साधा चहा बनायचा तरीही चहाचे पेलेच्या पेले रचवले जायचे.

त्यातले काही अशे ब्रँड आहेत की ज्यांचा चहा आपण वर्षानुवर्षे पितोय तरी कंटाळा नाही येत. सोसायटी चहा हा त्यातलाच एक. इतक्या वर्षात ना त्याची चव बदलली ना त्याचं पॅकेजिंग.

प्लेन निळ्या रंगाचं पॅकिंग त्यावर एक कपबशी आणि किटली. बस्स एव्हडंच. तरीही सोसायटी चहा म्हटल्यावर आपोआपच ते पॅकिंग डोळ्यसमोर येतंय.

तर या फेमस पॅकिंगमागं पण एक स्टोरी आहे. त्याआधी या चहाच्या कंपनीबद्दल थोडं सांगतो.

हिरालाल शाह यांनी १९२४ मध्ये मशीद बंदरच्या प्रसिद्ध चहा गल्लीतुन व्यापार सुरू केला. घाऊक विक्रीसाठी भारताच्या विविध भागांतून ते चहा विकण्यासाठी आणत असत. स्थानिक ग्राहकांसाठी एक मोठा पुरवठादार असण्यासोबतच ते आंतरराष्ट्रीय चहा व्यापारात देखील उतरले होते. पार मध्यपूर्वेतील देशांपर्यंत त्यांचा चहाचा व्यापार पसरला होता.

मात्र आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच रोज कोटींच्या घरात अमृततुल्याचे कप रचवणाऱ्या भारतीयांची तल्लफ भागवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होतं. आणि त्यासाठीच १९३३ मध्ये त्यांनी मुंबईत चहाच्या किरकोळ विक्रीच्या उद्देशाने हसमुखराई अँड कंपनी सुरू केली. आणि पहिले दुकान काळबादेवी, मुंबई येथे थाटले.

१९८० च्या दशकात हसमुखराई अँड कंपनी ही मुंबईतील चहा उद्योगातील एक प्रमुख बाजारपेठ बनली.

पुढे मग ग्राहक आता पॅकेज केलेल्या चहाच्या सोयीला प्राधान्य द्यायला लागलेत हे लक्षात घेऊन, कंपनीने १९९१ मध्ये पॅकेट स्वरूपात चहा लाँच केला, जो आज महाराष्ट्रातल्या किराणा दुकानात  ‘सोसायटी टी’ या नावानं उपलब्ध आहे.

तर आता येऊ त्या आयकॉनिक पॅकेजच्या स्टोरीवर. हिरालाल शाह यांचा मुलगा अतुल शाह यांनी सोसायटी हा ब्रँड लाँच केला एक वेगळच आव्हान त्यांच्यापुढं उभं राहिलं. 

जाहिरातींमध्ये लाल रंग खूप चालतो लाल कलर लोकांच्या मनात गरजेची भावना निर्माण करतो आणि भूक वाढवतो अशी सायकॉलॉजि या मागे सांगितली जाते. 

म्हणून हा रंग FMCG चेनद्वारे वारंवार वापरला जातो. मॅकडोनाल्ड असू द्या की मॅगी की पार्ले प्रत्येक ब्रॅण्डच्या डिझाइन मध्ये तुम्हला रेड कलर दिसेल. जाहिरातवाल्यानी मग अतुल शाह यांना हाच ऑपशन दिला. आणि दुसरा कलर हिरवा निवडायला सांगितलं. हिरवा रंग निसर्ग आणि शांतता दर्शवतो असा जाहिरातवाल्यांचा रिसर्च.

अतुल शहांनी मग विचार करून कलर निवडला निळा. निळा रंग जो सुरक्षितता आणि ताजेतवाने पानाची भावना निर्माण करतो तोच आपल्या ब्रँडची कोअर फिलॉसॉफी स्पष्ट करतो अशी त्यांची गट फीलिंग होती. 

आपल्या मनाला जे वाटतं त्यावरचं अतुल शहा ठाम राहिले. त्यांची ही आयडिया एवढी चालतेय की वर्षाला ५०० कोटींचा टूर्नओव्हर झालेली सोसायटी भारतीयांचा चहाची तल्लफ भागवण्याचा आघाडीची चॉईस झालाय.

त्यामुळं भिडू आपल्याला जे वाटतंय त्याच्यावर ठाम राहा कारण ते म्हणतात ना ऐकाव पण ‘मानाचंच’ आणि कराव पण ‘मानाचंच’.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.