पुरुषप्रधान राजकारणात काँग्रेसच्या महिला संघटनेची सुरवात त्यांच्यामुळे झाली होती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (१५ सप्टेंबर)  नवी दिल्लीत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापनादिनी नवीन लोगो आणि झेंड्याचं अनावरण केले. अखिल भारतीय महिला काँग्रेसने ट्विटद्वारे महिला काँग्रेसचा नवीन लोगो पोस्ट केला. त्यांनी म्हंटले की, नवीन लोगो मूळ काँग्रेस पक्षाचे हात चिन्ह समाविष्ट करून पक्ष आणि देशात महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश देते.

भारताच्या राजकारणात पुरुषांबरोबरच अनेक महिला नेत्यांचेही मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्या आधी आणि नंतरच्या काही काळात जेव्हा राजकारण हे पुरुषप्रधान क्षेत्र मानलं जायचं. त्यावेळीही अनेक महिलांनी या क्षेत्रात मुख्य भूमिका निभावली.

यातीलच एक नाव म्हणजे सुचेता कृपलानी.

ब्रिटिशांच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या निर्भय सेनानींच्या यादीत सुचेता याचं नाव आग्रहाने घेतलं जात. पंजाबातल्या अंबालामध्ये २५ जून १९०८ मध्ये सुचेता यांचा जन्म एका बंगाली ब्राम्हण कुटुंबात झाला. हा असा काळ होता जेव्हा देशाचे वातावरण राष्ट्रवादी भावनांनी भारलेले होते आणि स्वातंत्र्यलढ्याला गती मिळत होती. 

त्यामुळे लहानवयातचं त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि तिथूनच त्यांची राजकारणातील आवड तीव्र झाली.  Sucheta: An Unfinished Biography या आपल्या बायोग्राफीत त्यांनी म्हंटल कि,

“एकदा कुटुंबातली मोठी मंडळी जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी चर्चा करत होते. मला ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड राग वाटण्याइतपत तेव्हा मला समजत होते. त्याचा राग मी आमच्याबरोबर खेळणाऱ्या काही अँग्लो-इंडियन मुलांवर काढला.”

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर सुचेता यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि महात्मा गांधींच्या जवळच्या शिष्यांपैकी एक बनल्या. गांधीजींसोबत त्यांनी बऱ्याच चळवळीत सहभाग घेतला. अनेक ठिकाणी चळवळींचे नेतृत्व देखील केले. 

पुढे १९९६ मध्ये त्यांनी आचार्य कृपलानी यांच्याशी लग्न केले, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. असे म्हंटले जाते की, वयाच्या या फरकामुळे गांधींनी सुरुवातीला लग्नाला विरोध केला, परंतु सुचेता यांच्या आग्रहामुळे शेवटी हे लग्न पार पडलं.

जरी हे दोघेही स्वतःला कट्टर गांधीवादी मानत असले तरी, सुचेता यांना पतीपेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेण्याची भीती वाटली नाही. पुढे जवाहरलाल नेहरूंसोबत पटलं नाही, म्हणून नेहरूंवर कडक टीका करत आचार्य यांनी कॉंग्रेसपासून वेगळे होऊन १९५१ मध्ये त्यांचा स्वतःचा पक्ष, किसान मजदूर प्रजा पार्टीची स्थापना केली.

या पक्षात पुढे अनेक लोक जोडले गेले. मात्र काही वैचारिक मतभेदांमुळे त्या आपल्या पतीच्या पक्षातून बाहेर पडल्या. 

१९५७ मध्ये त्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.

दरम्यान, हजारो महिलांनी काँग्रेसच्या विविध संघर्षांमध्ये भाग घेतला, परंतु महिलांना आतापर्यंत योग्यरित्या संघटित केले गेले नव्हते आणि काँग्रेसच्या संघटनेला समांतर किंवा भाग म्हणून कोणतीही महिला संघटना नव्हती असं सुचेता यांचं मत होतं. याच पार्श्वभूमीवर सुचेता यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना केली.

भारताच्या स्वातंत्र्यापासून टिकून राहिलेल्या आणि बळकट झालेल्या सामूहिकतेसाठीही त्या जबाबदार होत्या. आपल्या एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या कि, 

“मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे होते, प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांना भेटायचे होते, सर्व महिला कामगारांना भेटायचे होते आणि प्रत्येक राज्यात छोट्या महिला युनिट उभ्या करायच्या होत्या.

सुचेता यांनी १९४० मध्ये काँग्रेसच्या महिला शाखेची स्थापना केली, महिलांना सक्रियपणे राजकारणात येण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. १९४६ मध्ये महात्मा गांधींसोबत काम करत असताना सुचेता यांनी सध्याच्या बांगलादेशातील आग्नेय जिल्हा नोआखलीमधील फाळणीच्या दंगलग्रस्तांना मदत केली.

त्यानंतर १९४७ मध्ये, स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सुचेता यांनी संविधान सभेच्या स्वातंत्र्य सत्रात नेहरूंच्या प्रसिद्ध ‘ट्रायस्ट विथ डेस्टिनी’ भाषणापूर्वी वंदे मातरम गीत गायले. संविधान सभेसाठी निवडल्या जाणाऱ्या १५ महिलांपैकी त्या एक होत्या.

भारताच्या पहिला महिला मुख्यमंत्री

१९६३ मध्ये इंदिरा गांधींनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्या संयुक्त प्रांताच्या म्हणजेच सध्याच्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री झाल्या. जिथे त्यांनी १९६७ पर्यंत कारभार चालवला. त्या काळात राजकारणात स्त्रियांची संख्या कमी असल्याने त्यांचं हे पद स्वतःमध्येचं एक उल्लेखनीय कामगिरी होती. एक खंबीर प्रशासक म्हणून त्यांनी प्रतिष्ठा राखली.

त्यांच्या कार्यकाळात राज्य कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी उपोषण केले. हे आंदोलन चांगलेच पेटले होते. सलग ६२ दिवस हे आंदोलन सुरु असताना देखील सुचेता यांनी या मागणीला नकार दिला.

आपला उत्तर प्रदेशातला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही सुचेता राष्ट्राची सेवा करतचं राहिल्या. मात्र १९७१ मध्ये संपूर्ण राजकारणातून निवृत्ती घेतली.  त्यानंतरच्या तीन वर्षांतच म्हणजे १ डिसेंबर १९७४ ला त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.