कॉलेजच्या पोरांना दुनियादारी शिकवणारा लेखक म्हणजे सुहास शिरवळकर….
शाळेचे दिवस मागे जाऊन कॉलेजचे दिवस सुरू होतात, मग नवे मित्र, राडे, प्रेमप्रकरण वैगरे वैगरे असे सगळे प्रकार सुरू होतात आणि त्यातच कॉलेज लाईफ सुरू असते. पण अशाच मित्रांच्या सर्कल मध्ये एकतरी पुस्तकं वाचणारा निघतो किंवा कॉलेज काळात जे वाचन करणारे पोरं भेटतात ते आपल्याला दोन पुस्तकं हमखास वाचायला सांगतात ते म्हणजे एक भालचंद्र नेमाडे यांचं कोसला आणि दुसरं म्हणजे सुहास शिरवळकर यांचं दुनियदारी.
या दोन पुस्तकांचं मार्केट अजूनतरी कुठल्या पुस्तकांना बाजूला सारणं जमलेलं नाही. पैकी सुहास शिरवळकर यांचा जेव्हा जेव्हा नामोल्लेख येतो तेव्हा तेव्हा दुनियदारी कादंबरीचा उल्लेख ओघाने येतोच. कॉलेजला दुनियदारीचा फंडा शिकवणारे सुहास शिरवळकर यांची साहित्यसंपदा, वैयक्तिक जीवन याबद्दल आपण जरा जाणून घेऊया.
नुकतीच गाजत असलेली समांतर वेबसिरीज ही सुहास शिरवळकर यांच्याच समांतर या कादंबरीवर आधारित आहे. सोबतच सुशींनी लिहिलेल्या दुनियादारी कादंबरीवर दुनियादारी सिनेमा आला होता तोही प्रचंड हिट झाला होता.
१५ नोव्हेंबर १९४८ रोजी सुहास शिरवळकर यांचा जन्म झाला. साहित्यविश्वात सुहास शिरवळकर सु.शी. म्हणून जास्त लोकप्रिय झाले. शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या.
१९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ या साहित्यप्रकाराकडे वळले. ‘लोकांना आवडेल ते’ अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले.
रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनी काही बालकथादेखील लिहिल्या.
एकदा पुस्तक हातात घेतले की ते वाचून पूर्ण होई पर्यंत खालिच ठेवु शकत नाही. अशी ही लिखाणाची अफ़लातुन शैली सुहास शिरवळकर यांची आहे.
सुहास शिरवळकर यांच्या कादंबर्यांनी एक काळ गाजवला होता तेव्हा तरुणाईमध्ये दुनियदारीचा कल्लोळ झाला होता आणि ही त्या काळच्या प्रचंड खपाच्या कादंबऱ्यांपैकी एक होती.
वेशीपलीकडे, ऑब्जेक्शन, युवर ऑनर, वंडर ट्वेल्व्ह, मुक्ती, कोवळीक , तलखी , इन्सानियत , सालम, सॉरी सर…,जमीन – आसमान, वास्तविक , जाई , अंतिम, क्षणोक्षणी, स्वीकृत, थरारक, पहाटवारा, दुनियादारी, दास्तान, तलाश, बरसात चांदण्याची, समांतर, असीम, कोसळ, प्रतिकार, प्रयास, बंदिस्त, समथिंग, रूपमती, निदान, काटेरी, म्हणून, सनसनाटी, तुकडा तुकडा चंद्र, जाता…येता,थोडक्यात असं, अखेर, महापर्व, ‘ओ गॉsड!’, क्षितीज, व्रतस्थ, गढूळ, कल्पांत, अंमल, डेड- एन्ड, स्पेल- बाउन्ड, हिंदोस्ता हमारा, लटकन्ती, झूम सत्र , राजरोस , मधुचंद्र, न्याय – अन्याय , हृदयस्पर्श, क्षण – क्षण आयुष्य , झालं – गेलं , काळंशार, झलक, पाळंमुळं , चूक -भूल … देणे घेणे ! , हमखास , क्रमश: , काळंबेर सावधाSन ! , सूत्रबद्ध , पळभरं, जन … , निमित्तमात्र, स्टार-हंटर्स, वर्चस्व ,कळप अशी भक्कम साहित्य निर्मिती सुशींनी केली जी मराठी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते.
११ जुलै २००३ रोजी सुहास शिरवळकर यांचं निधन झालं मात्र मराठी साहित्यात इतका भक्कम लेखनप्रपंच यांज लिहून ठेवलाय की त्याला तोडच नाही. सुशींनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमधले काही चांगले विचार आणि त्याची एक झलक पाहूया.
तुझं प्रेम हे आकाशाइतकंच खरं नि सर्वव्यापी आहे, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण आकाशाच अस्तीत्व नकारु शकत नाही पण, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते! तु माझ आकाश आहेस श्रध्दा माझा निवारा आहे! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे आकाशानं आकाशाइतकचं भव्य राहावं रीन त्यानं कोणाच्या निवाऱ्याचं छप्पर होउ नये!
– दुनियादारी…
एकदा संबंध येण्यापूर्वी, तो येऊ न देण माणसाच्या हातात असत. एकदा संबंध आला की, आपण एकमेकांची ओळख विसरुन जाऊ! हेही चालत नाही! एकदा माणूस कळला की आपल्या किंवा त्याच्या अंतापर्यंत तो असतोच !
– सूत्रबद्ध
हे ही वाच भिडू :
- UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात.
- नेमाडेंचा देशीवाद गुजरातमधल्या मच्छिमारांना पाकिस्तानपासून वाचवतोय !!!
- हजारो प्रती खपवणाऱ्या लेखकाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडावी हे दुर्दैव.
- आजही कॉलेजच्या दूनियेसाठी दुनियादारी एक कल्ट सिनेमा आहे