दारा सिंग पासून ते गँग्ज ऑफ वासेपूर पर्यंत गाजलेला रॉबिन हूड ‘सुल्ताना डाकू’ कोण होता?

८० च्या दशकातील अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये एक डाकू धनदांडग्यांना लुटून कशाप्रकारे गरीब जनतेच भल करत असतो. हे दाखवल गेलय. चित्रपटाला व्हिलन जनतेला लुबाडत असतो. आपली मनमानी चालवत असतो. मग एक हिरोचा उदय होतो. तो व्हिलनला नडायला लागतो. व्हिलनच्या अन्यायाविरुद्ध लढा चालू करतो. व्यवस्थेपुढे हतबल झाल्यानंतर हिरो अपराधाकडे वळतो.

बघता बघता हिरो मोठा डाकू बनतो. पण डाकू झाल्यानंतर तो फक्त अन्यायी धनवान लोकांनाच अद्दल घडवतो. श्रीमंत लोकांची संपत्ती लुटून गोर गरिबांना वाटतो. या कारणामुळे डाकू जनतेचा  देव भासू लागतो. वगैरे वगैरे.

भारतीय चित्रपटांच्या कथेत या आशयाचे नानाविध किस्से आहे. कारण भारताच्या इतिहासात असे खरे खुरे रॉबिन हूड होऊन गेलेत. जे फक्त भारतातल्या जुलमी शेठ लोकांनाच नव्हे तर ब्रिटिशांना पण लुटायचे. आणि गरीब जनतेला दान करायचे.

हा काळ होता एक शतकापूर्वीचा. त्यावेळी भारतीय लोकं ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीच्या छायेत होते. सर्वत्र भारतात ब्रिटिशांनी अंधाधुंद माजवलेली.  धान्य, सोन सर्व काही इंग्रज लुटत होते. अशावेळी उत्तरप्रदेशातल्या एका पोराने ब्रिटीशांनाचा लुटायला सुरुवात केली. त्याने इंग्रजांना इतकं लुटलं, इतकं लुटलं की, उत्तरप्रदेश आणि पंजाब परिसरातल्या ब्रिटीश पोलिसांचा जीव नाकेनऊ आला होता. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षापासून त्याने इंग्रजांविरुद्ध याप्रकारे लढा उभारला होता. त्या ‘रॉबिन हूड’चं नाव होत

‘सुल्ताना डाकू’

सुल्ताना डाकू कसा झाला?

सुल्ताना जन्म उत्तरप्रदेशातील मुरादाबादमधल्या हरथला या गावात झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्याच्या आई वडिलांनी त्याला नजीदाबाद जवळील किल्ल्यात पाठवल होत. त्याच बालपण तिथच गेल. किल्ल्यात आर्मी कॅम्प चालायचा. त्या कॅम्प मध्ये सुल्तानाला धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले गेल. त्यामुळे तो कॅम्प मधून पळून गेला. आणि तिथूनच त्याच्या अपराधी जीवनाला सुरुवात झाली.

सुल्तानाचा कल वयाच्या १७ व्या वर्षी अपराधी क्षेत्राकडे वळला. सुरुवातीला तो छोट्या छोट्या चोऱ्या करायचा. शोषित आणि वंचित लोकांसाठी त्याचा लढण्याचा निर्धार पाहून अल्पावधीतच त्याच्यासोबत लोक जोडली गेली. त्यामुळेच सुल्ताना वर्षभराच्या कालावधीत १०० लोकांची गॅंग बनवू शकला.

कसा होता सुल्ताना ?

सुल्त्ताना स्वताला मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचा वंशज म्हणवून घेत होता. म्हणून त्यान आपल्या घोड्याच नाव चेतक अस ठेवलेल. त्याने आपल्या कुत्र्याच नाव रॉय बहाद्दूर ठेवले होते. रॉय बहाद्दूर ही ब्रिटीशांतर्फे दिली जाणारी पदवी आहे. मात्र, इंग्रजांप्रती असलेल्या रागमुळे तो कुत्र्याला रॉय बहाद्दूर म्हनायचा. तो तोंडात एक चाकू लपवायचा आणि वेळ आल्यावर त्याचा उपयोगही करायचा. त्याच्या अशा कृत्यांमुळेच त्याचा दबदबा कायम होता.

जितका क्रूर तितकाच दयाळू म्हणून सुल्तानाची ओळख होती. जे लोक भारताला लुटतात त्या लोकांना लुटण्यात काही गैर नाही अशी त्याची धारणा होती.

पहिली अटक

ब्रिटीशांकडून भारतीयांवर झालेल्या अन्यायानेच सुल्तानला डाकू बनवले होत. त्यामुळे ब्रिटीशांनी  लुबाडलेली संपती परत मिळवणे हा त्याचा हेतू होता. ब्रिटीशांची आणि सर्वसामान्यांच शोषण करणाऱ्या श्रीमंतांची त्याने अमाप लुट केली. त्यामुळेच सुल्ताना ब्रिटीश पोलिसांच्या निशाण्यावर आला होता. सुल्ताना आणि त्याच्या टोळीने सुरु केलेल्या लुटीमुळे ब्रिटीश सरकार त्रस्त झाल होत. त्यामुळे ब्रिटीश पोलिसांनी सुल्तानाचा पिच्छा सुरु केला होता.

प्रसिद्ध पोलीस अधिकारी जफर उमर हे सुल्तानाला जेरबंद करण्यात एकदा यशस्वी झाले होते. जफर उमर हे उत्तम कादंबरीकार होते. त्यांनी याबाबत आपल्या एका पुस्तकांत उल्लेख केला आहे. पण त्यावेळी सुल्तानावर हत्त्येचे आरोप नव्हते. फक्त चोरीचे आरोप असल्याने सुल्तानाला चार वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. पुढे त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. आश्चर्यकारक बाब म्हणजे पोलीस अधिकारी जफर उमर यांना त्यावेळी बक्षीस म्हणून तब्बल पाच हजार इनाम मिळाल होता.

ब्रिटीशांची अमाप लुटमार

ब्रिटीशांची लुट करणे हाच मुख्य हेतू ठेवत सुल्ताना आणि त्याची गॅंग ब्रिटीशांच्या खजिन्यावर डोळा ठरवून असायचे. त्यावेळी नैनितालच्या राजनिवासाकडे जाणारा आणि प्रसिद्ध डेहरादूनकडे जाणारा एकमेव रस्ता नाजिदाबादमधूनच जात होता. इथ सुल्ताना आणि त्याची गॅंग दबा धरून बसायची आणि ब्रिटीश या रस्त्याने चालले की त्यांना लुटायचे.

सुल्ताना आणि त्याची गॅंग एवढ्यावरच समाधान मानून घेणारी नव्हती. तर त्यांनी ब्रिटीशांच्या मालगाड्या देखील लुटल्या होत्या.

त्यामुळेच ब्रिटीश सरकारने सुल्ताना आणि त्याच्या गॅंगला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.  ब्रीटीशांसाठी सुल्ताना मोठा अडथळा बनला होता. पण सहजासहजी हाती लागेल तो सुल्ताना कसला? वारंवार प्रयत्न करूनही सुल्तानाला पकडला जात नव्हता. साहजिकच त्यामुळे ब्रिटीश  पोलीस पार वैतागुन गेले होते.

 ३०० पोलिसांची तुकडी

सुल्तानामुळे ब्रिटीशांच्या अडचणी वाढू लागल्याने त्यांनी एक महत्वाचे पाउल उचलले. सुल्तानाला जेरबंद करण्यासाठी पर्सी बिंडहम या पोलीस अधिकार्याच्या नेतृत्वाखाली ३०० पोलिसांची तुकडी बनवली गेली. यात ५० घोडेस्वार देखील समाविष्ट होते. तरीही सुल्ताना पोलिसांच्या तावडीत येत नव्हता. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सुल्तानाला पकडण्यासाठी उत्तम शिकारी असणाऱ्या फ्रेडी यंग या पोलीस अधिकाऱ्याला धाडल.

दरम्यान, सुल्तानाने खडक सिंग नावाच्या लुटलं होत. ही गोष्ट ब्रिटीश पोलीस अधिकारी पर्सी बिंडहम आणि फ्रेडी यंगला कळाली. आणि तिथच सुल्तान गोत्यात आला. पुढे खडक सिंग आणि पोलिसांनी सुल्तानाला पकडण्याचा साफळा रचला.

फ्रेडी यंगची मोहीम

सुल्तान प्रकरणाचा तपास करताना पोलिसांमार्फत सुल्तान आणि त्याच्या गॅंगला मदत पोहोचतेय हे फ्रेडीच्या लक्षात आल. मनोहर लाल नावाचा पोलीस सुल्तानाला सगळी गुप्त माहिती पोहोचवत असल्याच त्याच्या लक्षात आल. म्हणून फ्रेडीने मनोहरची  उचलबांगडी केली.

पुढे फ्रेडीने नजीबाबादच्या जाणत्या लोकांची मदत घेवून सुल्तानाच्या जवळची व्यक्ती अब्दुल रज्जाकला आपल्या सोबत घेतेल. सुल्तानाला सगळ्यात जास्त विश्वास असणारा व्यक्ती मिळाल्याने फ्रेडीने नवीन योजना आखण्यास सुरुवात केली.

अब्दुल एकीकडे सुल्तानाच्या तर दुसरीकडे पोलिसांच्या संपर्कात होता. फ्रेडीने अब्दुल रज्जाकच्या माहितीनुसार सुल्तानाला घेरले. तो प्रत्येक हालचालींची सूचना पोलिसांना देत होता. अब्दुलने बोलावलेल्या ठिकाणी सुलताना आला आणि अखेर सुल्ताना फ्रेडीच्या जाळ्यात अडकला गेला. सेमुअल पेरिस नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सुलतानाच्या सहकाऱ्यांना देखील पकडले.

कुस्तीनंतर सुल्ताना आणि फ्रेडीची दोस्ती

ब्रिटीश पोलिसांच्या अथक प्रयात्नंतर सुल्ताना सापडला. पण जेलमध्ये सुल्तानाच्या कहाणीमुळे फ्रेडी प्रभावित झाला. त्यामुळे फ्रेडीने सुल्तानाला माफी अर्जावेळी मदत केली. पण दुर्दैवाने तो अर्ज रद्द केला गेला. सुल्तानाला आपल्या मुलाला डाकू होऊ द्यायचं नव्हतं. आपल्यामुळे  मुलाची बदनामी होऊ नये अस त्याला वाटायचं. त्यामुळे त्यान आपल्या मृत्यूनंतर मुलाला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवावे, अशी मागणी फ्रेडीकडे केली. सुल्तानाच्या मागणीचा सन्मान राखत फ्रेडीने सुल्तानाच्या मुलाला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवल.

सुल्तानाला फाशी

७ जुलै १९२४ ला सुल्तानाला त्याचा सहकाऱ्यांसोबत आग्र्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. लूटमार आणि हत्येच्या आरोपाखाली ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा सुनावली होती. सुल्तानाला मदत करणाऱ्या  ४० कुटुंबांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.