या पठ्यानं एका वर्षात ३६५ पोरी फिरवल्या आहेत, तुमचं कस चाललय..?

#Euuu, #सोनू #मोनू #जानू #पिल्लू हि गॅंग सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धूमाकुळ घालत असताना असा एक व्यक्ती आहे, जो #हॅशटॅग न वापरता देखील शे पाचशे मुलींना सहज फिरवू शकतो.

हि स्टोरी आहे चैन्नईच्या सुंदर रामूची…

या पठ्याचा पराक्रम काय ? तर मुलींना डेटवर घेवून जायचा. ते तर सगळेच करतात,

पण यानं किती जणींनी फिरवलय तर तब्बल ३६५ पोरी फिरवल्या आहेत. २०१८ या वर्षात ३६५ आणि २०१७ मध्ये २२५ मुली.

सुंदर रामूच्या नावात सुंदर असलं तरी हा दिसायला बऱ्यापैकीच आहे. सुंदर व्यवसायाने फोटोग्राफर. एकदिवस त्यानं ठरवलं कि वर्षाभरात आपण वेगवेगळ्या मुलींना डेटवर घेवून जायचं. मग गाडी सुटली, हळूहळू मौसम लागला. आज एक, उद्या दूसरी करत या पट्टाने वर्षाभरात तब्बल ३६५ मुली फिरवल्या. म्हणजे दिवसाला एक.

https://www.facebook.com/sunder.ramu.92

या ३६५ मुलींमध्ये २१ वर्षांच्या मुलींपासून ते १०७ वर्षांच्या आज्जीबाईंचा देखील समावेश आहे. कधी मॉडेल तर कधी गृहणी कधी हिरोईन तर कधी पत्रकार. वय वर्ष १८ वरील कायदेशीर सज्ञान असणाऱ्या अनेक मुलींना चैन्नईचा रस्तान् रस्ता दाखवण्याचं काम या सख्त लौंडा टाईप युवकानं अगदी मनावर घेवून केलेलं आहे.

वर्षाभरात इतक्या मुलींना फिरवल्यावर त्याचा कॉन्फीडन्स इतका वाढला की त्यानं एक नियमावली तयार केली. नियम असा की, तो बील भरणार नाही. कुठ घेवून जायचं ते तो ठरवणार नाही. या क्रांन्तीकारी निर्णयाच कारण पण तितकच भारी आहे. त्याच्यावर मुली जेवढा खर्च करतात तेवढीच रक्कम तो समाजसेवी संस्थांना दान करतो पण केलेलं दान हे डेटवर घेवून जाणाऱ्या मुलींना सांगत नाही.

https://www.facebook.com/sunder.ramu.92

आत्ता ब्रेकिंग न्यूज २०१८ मध्ये हा पट्या ३६५ मुलींना डेटवर घेवून गेला आहे

तसा शाश्वत विकासाचा मार्गच यानं आपल्याला दाखवला आहे. विकासाची स्वप्न पहायची असतील तर क्रांन्तीकारी निर्णय घ्यावेच लागतील तर घ्या आदर्श. कारण क्रांन्तीची स्वप्न गुलाबी डोळ्यातूनच पाहिली जातात अस कोणतर म्हणलयच…

नाहीतर आपलं आहेच हम दौं हमारे दौ !!!

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.