रस्ता चुकल्यामुळे बायकोसोबत भांडण झालं आणि गुगल मॅपचा शोध लागला…

गुगल मॅप मुळे अनेक लोकांची चांगली सोय झाली. व्यवस्थित पत्ता माहिती नसतानाही गुगल बाबाच्या कृपेने आपण थेट हव्या त्या ठिकाणी पोहचू शकतो. आता गुगल मॅपने इतकी सोय केलीय पण गुगल मॅप हा दरवेळी योग्यच रस्ता दाखवत नाही तर कधी कधी जिथं अर्जंट पोहचायचं असतं तिथं तिसराच रस्ता दाखवून माणूस हरवतो. कधी कधी सोपा रस्ता हा गुगल मॅप इतका फिरवून फिरवून सांगतो कि डोक्याला शॉट होतो. पण हे सगळे फायदे तोटे नंतर पण याच गुगल मॅपचा शोध कसा लागला याचा किस्सा सुद्धा लै इंटरेस्टिंग आहे.

तर गुगल मॅपचा शोध लावला गुगलचे CEO सुंदर पिचई यांनी. या शोधाची सुरवात होते २००४ सालापासून. अमेरिकेत राहणाऱ्या सुंदर पिचई यांना एकदा आपल्या बायकोसोबत एका ठिकाणी जेवायला जायचं होतं. सुंदर पिचईनी घरून निघण्या अगोदर बायकोला सांगितलं कि तू थेट डिनर प्लेसला पोहोच, मी तुला थेट जेवायच्या ठिकाणी भेटतो. 

सुंदर पिचई यांची बायको अंजली बरोबर ८ वाजता डिनर प्लेसला येऊन पोहचल्या. पिचई सुद्धा आपल्या बरोबर वेळेला ऑफिसमधून निघाले खरे पण मध्ये ते रस्ता हरवले. त्या ठिकाणाचा रस्ता शोधता शोधता पिचईना रात्रीचे १० वाजले. आता कोणाची बायको एवढ्या टाइम तिथं थांबली असती सेम टू सेम तसंच पिचईंची बायको तिथून निघून गेली.

योग्य वेळी न पोहचल्याने पिचईंची बायको प्रचंड संतापलेली होती आणि पिचईंवर नाराज होती. सुंदर पिचई घरी पोहचले आणि या कपलमध्ये डेंजर भांडणं झाले. आता बायकोबरोबर भांडण झाल्याने पिचई रागाने ऑफिसला गेले आणि ऑफिसला जाऊन विचार करू लागले कि असं काय बनवता येईल जेणेकरून माणूस रस्ता हरवणार नाही.

रात्रभर ऑफिसमध्ये पिचई विचार करत बसले कि काय करता येईल. मग सकाळ झाली आणि रात्रभर विचार केलेल्या पिचई यांनी आपला टीमसमोर गुगल मॅपची हि आयडिया मांडली. पण सगळ्या टीमने सुंदर पिचईना नकार दिला. पण पिचई यांना टीमला कस हॅन्डल करायचं याचं नॉलेज होतं. टीमला समजावून त्यांनी आपली आयडिया व्यवस्थित त्यांना समजावून सांगितली.

शेवटी तो दिवस उजाडला आणि २००५ साली अमेरिकेमध्ये गुगल मॅपची सुरवात झाली. अमेरिकेनंतर २००८ साली गुगल मॅपने भारतातसुद्धा प्रवेश केला. आज गुगल मॅपचं मार्केट इतकं आहे कि जगातला प्रत्येक सातवा माणूस गुगल मॅपचा वापर करतो. अगदी खेडोपाड्यात प्रॉडक्टची डिलिव्हरी करायची असेल तर बरीच मंडळी गुगल मॅपचा वापर करते. सॅटेलाईटद्वारे त्यात सुधारणा करून दरवेळी गुगल मॅप अपडेट होत गेलं. 

आता बायकोसोबत भांडणाचा परिणाम म्हणून सुंदर पिचई यांनी गुगल मॅपचा शोध लावला, आपलं काय आपल्याला भांडणं करायला लग्नच होईना आपले नाहीतर आपणही काहीतरी जबऱ्या शोध लावून जगाला दाखवून दिलं असतं आपण काय चीज आहे ते.

मध्ये विठ्ठलाचा टिळा सुद्धा गाजला होता तो या ट्रेण्डने कि गुगल मॅप रस्ता दाखवतो आणि विठोबाचा टिळा आयुष्याची वाट दाखवतो…..!

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.