एकदा शेट्टी अण्णानं १२८ नेपाळी वेश्यांना मदत करुन शानपट्टीचं काम केलेलं.
बॉलिवूडचा येडा अण्णा कधीकधी चांगली काम करतो. पण केलेल्या कामाचा गवगवा कधी करतं नाही. त्याच्या अशाच एका मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आणि मग भिडू लोकांना समजलं आपला येडा अण्णा कधीकधी शानपट्टीची काम पण करतो.
नेमका विषय काय होता?
५ फेब्रुवारी १९९६ च्या रात्रीची ही गोष्ट. त्या रात्री मुंबई पोलिसांनी मुंबईतल्याचं रेड लाईट एरिया कामाठीपुऱ्यात छापा टाकला होता. तसं तर ते अधून मधून छापे टाकतच असतात पण यावेळी थोडं वेगळं कारण होतं. ते कारण होतं एड्सच्या रोगाला थांबवणं.
९६ सालात हा आजार जगभर फिरून भारतात येऊन पोहोचला होता. या रोगाला आपली पाळंमुळं पसरवायला वेश्यावस्ती पेक्षा चांगली जागा कोणती असू शकते. त्यावेळी आलेल्या रिपोर्टमधून असं समजलं कि, एकट्या मुंबईत एक लाखापेक्षा जास्त सेक्सवर्कर्स होत्या.
त्या छाप्यात कामठीपुरातल्या एकूण ४५६ वेश्यांना एड्स झाला होता. त्यातल्या जवळजवळ २१८ वेश्या महिला नेपाळी होत्या. याच नेपाळी वेश्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टी म्हणजेच अण्णाने मदत केली होती.
या छाप्यानंतर एड्ससाठी काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने भारतातील बऱ्याच खेड्यातल्या आणि शहरातल्या महिलांना त्यांच्या शहरांत परत पाठविण्यात आलं. त्यातल्या नेपाळी महिलांना काही दिवस ताब्यात ठेऊन त्यांची एचआयव्हीची टेस्ट घेण्यात आली.
इंटरप्रेस सर्व्हिस या वृत्तसंस्थेने त्यावेळेसच्या दिलेल्या वृत्तानुसार, यापैकी दोन वेश्या एड्समुळे मरण पावल्या. पण, त्यापैकी किती महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत हे माहिती नव्हतं. बरं, नेपाळ सरकारला पण या वेश्या महिलांना नेपाळमध्ये परत घेण्याची इच्छा नव्हती. आणि भारत सरकार त्यांना वेश्या व्यवसायाच्या दलदलीत जाण्यापासून रोखू इच्छित होतं.
नेपाळी सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्या मते,
या एड्सग्रस्त महिलांची सुटका करण्यासाठी भारत सरकार त्यांना नेपाळ पाठवू इच्छित होतं. तर दुसरीकडे या महिलांकडे जन्माचा दाखला किंवा नेपाळी नागरिकत्व नसल्यामुळे नेपाळी सरकार त्यांना अडवत होतं.
म्हणजे दोन्ही बाजूंची समस्या एड्सचीच होती. पण ही बाब सरकारी पातळीवर अडकली होती.
त्याच काळातल्या एका महिलेचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कामठीपुरातून सुटलेल्या या नेपाळी महिलेच्या संभाषणात, ही महिला सांगते की जेव्हा नेपाळी सरकारने त्यांना परत नेपाळ मध्ये आणण्यास नकार दिला तेव्हा सुनील शेट्टीने या महिलांना नेपाळमध्ये पाठवले होते. त्यापैकी १२८ जणींना त्याने विमानाने नेपाळमध्ये पाठवले होते. आणि त्यांचा सर्व खर्च सुनील शेट्टीने उचलला होता.
पण आपल्या येड्या अण्णाने नेपाळी वेश्यांना केलेली ही मदत एका कानाचं दुसऱ्या कानाला कळू दिलं नव्हतं.
हे हि वाच भिडू
- जगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण खातात !
- सोसायटीवाल्यांच्या त्रासाला वैतागून त्या म्हणाल्या,मी सेक्स रॅकेट चालवत नाही.
- भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता