इंडियन फुटबॉलची आज जी क्रेझ वाढलीय त्याचं सगळं क्रेडिट सुनील छेत्रीला जातं..

मागच्या काही काळात सुनील छेत्रीने एक ट्विट केलं होतं कि शिव्या द्या, टीका करा, आनंद घ्या पण फ़ुटबॉलची मॅच पाहायला स्टेडियममध्ये या, संघाला आणि खेळाला सपोर्ट करा. सुनील छेत्रीच्या या ट्विटवरून हजारो लोकांनी फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. सुनील छेत्रीचा दर्जा भारताच्या टीममध्ये तोच आहे जो इंडियन क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा आहे. भारतीय फुटबॉलचा विराट कोहली असंही आपण म्हणून शकतो.

एकेकाळी भारतातून फुटबॉल हा खेळ गायब होण्याच्या मार्गावर होता, म्हणजे आपल्याकडं फ़ुटबॉल हा फक्त पावसाळ्यात खेळला जाणारा सिजनल खेळ आहे अशी मान्यता फुटबॉलला होती. पण सुनील छेत्रीने युवा वर्गाला पुन्हा एकदा फुटबॉलच्या प्रेमात पाडलं आणि मोठ्या प्रमाणावर लोकं फ़ुटबॉल खेळताना दिसतात. पण सुनील छेत्री या क्षेत्रात इतका मोठा स्टार कसा झाला याबद्दलचा प्रवास आपण जाणून घेऊया. 

३ ऑगस्ट १९८४ रोजी आंध्रप्रदेशच्या सिकंदराबादमध्ये सुनील छेत्रीचा जन्म झाला. आई वडिलांचा त्याला भक्कम सपोर्ट होताच पण सुनील छेत्रीला लहानपणापासूनच खेळाचं वेड होतं. घरची पार्श्वभूमी हि खेळाशी निगडित असल्याने तो फुटबॉलकडे वळला. वडिलांच्या आर्मीच्या जॉबमुळे सुनीलचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी होत गेलं. गंगटोक, दार्जिलिंग, कोलकाता, नवी दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्याच शिक्षण झालं.

वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा फायदा सुनील छेत्रीला असा झाला कि तिथल्या नवीन लोकांसोबत त्याची ओळख वाढत राहिली आणि त्यांच्यासोबत फुटबॉल खेळायची संधी त्याला मिळत गेली. हा तो काळ होता जेव्हा भारतातील प्रत्येक पोरगं हे क्रिकेटच्या आहारी गेलेलं होतं. पण सुनील छेत्रीकडून फुटबॉल सुटला नाही. 

स्थानिक फुटबॉल खेळताना सुनीलने दिल्ली सिटी एफसी आणि बऱ्याच संघाकडून खेळण्याची सुरवात केली. पण खऱ्या अर्थाने सुनीलला ब्रेक मिळाला तो २००२ साली कोलकाताच्या मोहन बागान या फुटबॉल क्लबकडून. २००२ ते २००५ या काळात खेळताना सुनील छेत्रीने जबरदस्त खेळ दाखवला. इथल्या खेळाच्या जोरावर सुनीलला २००४ साली इंडियन अंडर २० नॅशनल टीममध्ये जागा मिळाली.

पुढे २००५ साली भारताच्या नॅशनल फुटबॉल टीमकडूनसुद्धा सुनील छेत्रीला खेळायची संधी मिळाली. इथून पुढे सुनील छेत्री हे नाव फुटबॉलच्या मैदानात धार धरू लागलं. अनेक इंडियन फुटबॉल क्लबकडून सुनील छेत्रीला खेळायची संधी मिळाली. १२ जून २००५ या दिवशी सुनील छेत्रीने पहिला नॅशनल गोल पाकिस्तानविरुद्ध नोंदवला.

आज घडीला सुनील छेत्री ऑल टाइम टॉप गोल स्कोरर म्हणून कायम आहे. भारताच्या फुटबॉल टीमचा तो कर्णधार सुद्धा झाला. हे तर काहीच नाही, जागतिक पातळीवर मोस्ट गोल स्कोररच्या यादीत सुनील छेत्री हे नाव तिसऱ्या नंबरला आहे. लोनार्डो, मेस्सी यांची ज्या रॅकमध्ये नावं आहेत त्या रँकमध्ये सुनील छेत्रीचंसुद्धा नाव आहे.

सुनील छेत्रीच्या खेळाच्या जोरावर आणि तो कॅप्टन झाल्यापासून भारताच्या फुटबॉल रँकमध्ये मोठा बदल झालेला आहे. अनईक अवॉर्ड आणि गोल सुनील छेत्रीच्या नावे आहे. फुटबॉलला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस हे सुनील छेत्रीमुळे आलेले आहेत. क्रिकेटच्या आहारी गेलेली तरुणाई परत एकदा फुटबॉलकडे खेचून आणण्याचं सगळं क्रेडिट हे सुनील छेत्रीला जातं.

सुनील छेत्रीने जेव्हा प्रेक्षकांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी तरी मैदानात या असं आवाहन केलं होतं तेव्हा त्याला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली दोघांनीही पाठिंबा दिला होता. सुनील छेत्री हा भारताचा आयकॉनिक आणि स्टार प्लेअर आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.