फिफानं सन्मान केला, पण सुनील छेत्रीची किंमत भारताला कळलेली नाही…

इमॅजिन करा, तुम्ही रोहित शर्माचा एक व्हिडीओ बघताय, ज्यात रोहित म्हणतोय ‘आज आमची मॅच आहे, प्लिज ती बघायला या, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे.’ इमॅजिन करणं सुद्धा अवघड ए. आपल्याकडं क्रिकेट म्हणलं की विषय एन्ड असतोय, इंटरनॅशनल मॅचचं सोडा ओ, लोकं चेन्नई सुपर किंग्सची प्रॅक्टिस बघायला पण गर्दी करतात.

इन्स्टा बायोमध्ये लिहीत असली, तरी आपल्याकडची जनता लय स्पोर्ट्स लव्हर ए असं समजायचं काय कारण नाही. 

कारण भारताच्या फुटबॉल टीमची मॅच असली तरी आपल्याला माहीत नसतंय, आयएसएलच्या चार टीमा सांगणंही जड जातंय आणि भारताच्या कॅप्टनला व्हिडीओ करुन लोकांना मॅच बघायला येण्याचं आवाहन करावं लागतंय.

ही असली परिस्थिती बघून एखाद्यानं फुटबॉल खेळणं सोडून दिलं असतं, पण हा गडी खेळत राहिला, कित्येक पोरांना आणि भारताच्या टीमला घडवत राहिला, आपण बोलतोय अर्थातच सुनील छेत्रीबद्दल.

सध्या सुनील छेत्रीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. त्यात एका पोडियमवर पहिल्या नंबरला रोनाल्डो, दुसऱ्याला मेस्सी आणि तिसऱ्या नंबरवर हात जोडलेला छेत्री उभा आहे. हा फोटो नेमका का व्हायरल होतोय ? जगभरात गाजणाऱ्या छेत्रीला भारताकडून योग्य तो सन्मान खरंच मिळत नाही का ? हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा…

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.