दोन दशकं उलटून गेली अजूनही सुनील जोशीचं रेकॉर्ड तोडणं कुठल्याही बॉलरला जमलेलं नाही.

भारताला एम एस के प्रसाद नंतर दुसरे निवड समिती अध्यक्ष मिळाले होते ते होते सुनील जोशी. बीसीसीआयने राष्ट्रीय निवड समितीची जबाबदारी माजी भारतीय स्पिनर सुनील जोशी याना निवडलं होतं. सुनील जोशींना ज्यावेळी निवाड्यात आलं त्यावेळी क्रिकेट पाहणाऱ्या लोकांमध्ये प्रश्न होते कि सुनील जोशी नक्की कोण आहेत आणि क्रिकेटमध्ये त्यांनी काय रेकॉर्ड केला याबद्दलचा आजचा किस्सा.

सुनील जोशी यांचा जन्म ६ जून १९७० साली कर्नाटकमधल्या गडग या गावी झाला. लहानपणापासून ते क्रिकेटप्रती किती जागरूक होते याची वृत्ती त्यांच्यात दिसून आली होती. केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी ते रोज ६४ किलोमीटरचा प्रवास करून हुबळीला क्रिकेट प्रॅक्टिससाठी पोहचायचे आणि त्यानंतर घर आणि शाळा असा त्यांचा दिनक्रम होता.

१९९५-९६ च्या रणजी सिजनमध्ये त्यांनी कर्नाटकाकडून खेळताना ५०० धावा आणि ५० विकेट्स मिळवल्या होत्या. इतकंच नाही तर इंग्लमधल्या कौंटी क्रिकेटमध्येही त्यांनी आपल्या बॉलिंगची धार दाखवली होती. २००८ आणि २००९ साली ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाकडून खेळत होते. २०१० नंतर त्यांचा करार संपला.

पण सुनील जोशी यांचा एक रेकॉर्ड आहे जो अजूनही कोणी तोडू शकलं नाहीए. सुनील जोशी हे नाव लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये घेतलं जाणारं टॉपचं नाव आहे पण त्यांच्या वाट्याला जास्त काळ क्रिकेट आलं नाही म्हणून त्यांचं नावही बऱ्याच लोकांना माहिती नाहीए. भारताचा सगळ्यात कंजूस बॉलर म्हणून सुनील जोशी यांचं नाव घेतलं जातं.

वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी धावा देऊन पाच विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. दोन दशकाहून अधिक काळ लोटूनही हे रेकॉर्ड अबाधित आहे. २६ सप्टेंबर १९९९ या दिवशी एल जी कपमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध सुनील जोशींनी हा विक्रम केला होता. या सामन्यात सुनील जोशींनी केलेली घातक गोलंदाजी हि दुसऱ्या दिवशी पेपरची हेडलाईन होती.

साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ हा अनिल कुंबळेशिवाय उतरला होता. कुंबळे हा भारताचा स्पिन बॉलिंगचा आधारस्तंभ होता आणि तोच नेमका या मॅचला बाहेर बसला होता. कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनसुद्धा या मॅचला नव्हता त्यामुळे कॅप्टन म्हणून अजय जडेजा जबाबदारी पार पाडणार होता.

आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण क्रोनिएचा हा निर्णय टीमचा बाजार उठवणारा होता. १० ओव्हरनंतर स्पिनर बॉलिंग करणार या ट्रेंडनुसार अजय जडेजाने सुनील जोशींना बॉलिंगला पाचारण केलं. आफ्रिकन बॅट्समन लोकांसाठी सुनील जोशी काळ बनून उभे राहिले.

अजय जडेजाने ज्या विश्वासाने सुनील जोशींना बॉलिंग दिली त्या विश्वासाला ते पात्र ठरले. आपल्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर हर्शेल गिब्जला बाद करून जोशींनी आफ्रिकेला जबर धक्का दिला. यानंतर सुनील जोशींच्या बॉलिंगने जे कहर केलं ते आफ्रिकन टीमला पडलेलं एक दुःखद स्वप्न म्हणून समोर आलं.

जॉन्टी ह्रोड्स, शॉन पोलॉक अशा दिग्गज खेळाडूंना जोशींनी बाद करून मॅच पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवली. या पूर्ण सामन्यात,

सुनील जोशींनी तब्बल ६ ओव्हर मेडन टाकल्या आणि ६ विकेट घेतल्या त्याही केवळ ६ धावा देऊन.

या मॅचमध्ये त्यांचं प्रदर्शन होतं १०-६-६-५ .

साऊथ आफ्रिका सुनील जोशींच्या या बॉलिंगमुळे १७७ धावांवरच संपली.

भारताने हि मॅच सहजपणे जिंकली.

जागतिक स्तरावर सुनील जोशींचं हे सगळ्यात कमी धावा आणि मेडन ओव्हर टाकून ५ विकेट घेण्याचं दुसऱ्या क्रमांकाचं रेकॉर्ड आहे. एक नंबरवर झिम्बाबवेच्या ल्युक जॉगवीने अफगाणिस्तानविरुद्ध ६ धावा देऊन ५ विकेट मिळवल्या होत्या.पण सगळ्यात आधी हा रेकॉर्ड सुनील जोशींनी नोंदवला होता. वनडे मध्ये सगळ्यात किफायती बोलींगमध्ये १९८६ साली कर्टनी वॉल्शने १ धाव देऊन ५ विकेट घेतल्या होत्या.

१९९६ ते २००१ या काळात भारतीय संघाकडून सुनील जोशी खेळत होते. पण त्यांचा हा रेकॉर्ड त्यांच्या कारकिर्दीची शान म्हणून कायम झळकत राहील. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.