दुपारच्या चहाबरोबरचं, आठ आण्यातलं लग्न

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा आज जन्मदिन. त्यांची तशी ओळख म्हणाल तर प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या त्या पत्नी. मूळच्या धामापूरच्या असेलल्या सुनीताबाईंचा जन्म रत्नागिरीतला.  भाईंप्रमाण सुनीताबाईंचं लिखाणही वाखाणण्याजोगं होत. त्यांच्या प्रत्येक साहित्याला भरभरूर प्रतिसाद मिळाला. ‘आहे मनोहर तरी’, प्रिय जी.ए., मण्यांची माळ, मनातलं अवकाश, सोयरे सकळ, समांतर जीवन’ या त्यांच्या लिखाणाला पुरस्काराने गौरवण्यात आलंय.

सुनीताबाईंनी आपल्या साहित्यात पु.ल. देशपांडे आणि त्यांच्या अनेक आठवणी शेअर केल्यात. अश्याच आपल्या ‘मनातलं अवकाश’ या संग्रहात त्यांनी आपल्या आठ आण्याच्या लग्नाचा किस्सा सांगितलंय.

तर ती गोष्ट साठ-बासष्ठ वर्षांपूर्वीची. जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी मुंबईच्या दादर-माटुंगा विभागात ‘ ओरियंट  हायस्कूल ‘  नावाची एक शाळा चालवायचे. दुसरीकडं कुठं अॅडमिशन न मिळालेले विद्यार्थी आणि नोकरी शोधात असणाऱ्या शिक्षकांना या शाळेचा आधार होता. भाईंनी सुद्धा शिक्षक म्ह्णून तिथं प्रवेश केला. काही काळाने सुनीताबाईंनी सुद्धा तिथं शिकवायला सुरुवात केली.

भाई वरच्या वर्गाला शिकवायचे आणि सुनीताबाई खालच्या वर्गांना. तिथंच बाळासाहेब ठाकरे भाईंचा विद्यार्थी होते तर श्रीकांत ठाकरे म्हणजेच राज ठाकरेचे वडील बाईंच्या वर्षात होते. 

त्याच शाळेत एकत्र काम करताना भाईची आणि सुनीताबाईंनी ओळख झाली. हळूहळू ते नातं पुढं गेलं आणि  ते दोघे एकमेकांच्या  प्रेमात पडले. काही दिवसांनंतर भाईंनी “आपण लग्न करू या” असा आग्रहच लावून ठरला. पण सुनीताबाईंना लग्न म्हंटल कृत्रिम बंधन वाटायचं. त्यांच्यामते समजा, आज लग्न केलं आणि उद्या पटलं नाही तर,  मग त्या लग्नात ‘शुभमंगल सावधान’ म्हणणारा तो भटजी, नाहीतर रजिस्टर पद्धतींनी केलं तर ते करून देणारा कायदेतज्ज्ञ नंतरची भांडण मिटवायला येणारे का?  मग लग्नात  त्यांच्या उपस्थितीची काय गरज?

सुनीताबाईंचं ताठ मत वाकायला तयार नव्हतं, पण भाईंचा आग्रह सुरूच होता. शेवटी भाई म्हणाले,

‘माझ्यासाठी तू एकच कर, लग्नाला फक्त हो म्हण, मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी  आहे,”

आता भाईंचा एवढा आग्रह आणि सुनीताबाई ऐकणार नाहीत, असं कस होईल. अखेर सुनीताबाई लग्नाला हो म्हणाल्या.

खरं तर, याआधी एकदा भाईचं  लग्न झालेलं  होतं. कर्जतच्या दिवाडकर लोकांनी थाटामाटात आपली लाडकी लेक भाईंना दिली.  लग्न झालं, पण लग्नाच्या १५-१६ दिवसातच ती मुलगी तापाने आजारी पडली. बरेच उपचार केले गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तिचा मृत्यू झाला.

तर भाई आणि सुनीताबाईंनी लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा, पण सुनीताबाईंच्या आईचा या लग्नाला विरोध होता. त्यांच्या आईनं आपल्या लेकीसाठी काही स्थळं पाहून ठेवली होती. त्यामुळं एका बिजवराशी लग्न करणं सुनीताबाईंच्या आईनं अजिबात पसंत नव्हतं.  त्यात दोघांच्या जाती वेगळ्या.

नंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या सुनिताबाई  रत्नागिरीला आल्या. त्यावेळी लग्नाची बोलणी करायला म्ह्णून भाई आपला भाऊ  उमाकांत  आणि जुवळे सरांचा  हरकाम्या बाळू  तेंडुलकर यांना घेऊन आले. सुनीताबाईंनी अप्पा-आईंसोबत त्यांची ओळख करून दिली. आधी त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि पुढच्या दहापंधरा मिनिटातच भाईने  सर्वांना हसवून आपलेसे करून घेतलं.

अखेर पुढच्या चारपाच दिवसात रजिस्टर पद्धतीनं  लग्न करायचं ठरलं. या लग्नात वायफळ खर्च करायचा नाही, असं दोघांनी आधीच ठरवलं होत. त्या वेळी आठ आण्याला  भरायचा छापील फॉर्म मिळायचा.  तेवढाही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून सुनीताबाईंनी तो फॉर्मही विकत आणला. स्वतः वाचून  ठेवला आणि  आप्पांनाही दाखवला.

सुनीताबाईंच्या वडील पेशाने वकील होते. त्यामुळं  आप्पांनी कोर्टातून परततांना आपल्या सहकारी वकिलांना मुलीचं  लग्न रजिस्टर करायचं  आहे,‘फॉर्म’ वगैरे सगळं तयार आहे. मग  साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येता?” असं विचारलं. त्यावर, मग आत्ताच जाऊ या की, म्हणून ते सगळेजण  आप्पांबरोबरच निघाले.

आप्पा नेहमीप्रमाणं दुपारी घरी आले पण आप्पांच्या सोबत  यावेळी  आणखी  तीनचार जण होते. हे पाहिल्यावर सुनीताबाईंनी आपल्या  आईला  आणखी  चारपाच  कप  पाणी वाढवायला सांगितलं.  हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आलेत आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटात सुनीताबाई आणि भाईंचं लग्न होणार आहे, याची घराच्या कुणालाच नव्हती.

नवरी सुनीताबाई घरच्याच  साध्या  खादीच्या  सुती साडीवर तर नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर आणि सध्या बिन बाह्यांची बनियन घालून.  आप्पांनी जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली.  आणि त्या फॉर्मवर  सुनीताबाई आणि भाईंसोबत  त्या साक्षीदारांना सह्या करायला सांगितले. अश्या पद्धतीनं  सगळ्यांच्या  सह्या झाल्या आणि लग्न सोहळा पार पडला.

नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्न झालं.  आपल्या संग्रहात सुनीताबाई म्हणतात,

आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून, कु.सुनीता ठाकूर हिचे नाव सौ. सुनीता देशपांडे करण्याचे काम  फक्त आठ  आण्यात आणि दोनचार मिनिटात उरकले. 

दरम्यान, योगायोग म्हणजे भाई आणि सुनीताबाईंचं लग्न झालं ते १२ जूनला आणि त्यानंतर बरोबर ५४ वर्षांनी १२ जुनलाच भाईंचा मृत्यू झाला. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.