स्पेस मॅरेथॉनमध्ये धावण्याचा सुनीता विलियम्सने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता…

५ फेब्रुवारी २००७ चा तो दिवस. या दिवशी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्सने एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सलग १९५ दिवस राहण्याचा तो रेकॉर्ड होता.

सुनीता विलियम्सने शॅनॉन ल्युसिडने बनवलेल्या १८८ दिवस आणि ४ तासाच्या रेकॉर्डला पार केलं होतं. वेगवेगळ्या अभियानाअंतर्गत सुनीता विलियम्सने एकूण ३२१ दिवस १७ दिवस आणि १५ मिनिटे अंतराळात राहून आली होती. सुनीता विलियम्स हि भारतीय वंशाची दुसरी महिला अंतराळवीर आहे.

१९५८ मध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून सुनीताचे आईवडील हे बोस्टनला येऊन स्थायिक झाले होते. सुनीताचे वडील पांड्या हे अमेरिकेत डॉक्टर होते. १९ सप्टेंबर १९६५ रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनीताचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुनीताने संयुक्त राष्ट्राच्या फिजिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. १९९५ मध्ये फ्लोरिडा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये एमएस पूर्ण केलं.

जून १९९८ मध्ये अमेरिकेच्या स्पेस एजन्सी नासामध्ये सुनीता विलियम्सची निवड झाली. सुनीताने वेगवेगळ्या ३० स्पेस प्रोजेक्टमध्ये २ हजार ७७० वेळा उड्डाण केलं होतं. २००६ मध्ये पहिल्यांदा सुनीता विलियम्स अंतराळात गेली होती. २००३ साली कोलंबिया घटनेने कल्पना चावला आणि काही अंतराळवीरांचा जीव घेतला होता म्हणून सुनिताचं स्पेस मिशन बराच काळ टाळलं जात होतं. 

सुनीता विलियम्सने केलेलं वर्ल्ड रेकॉर्ड हा आजही चर्चेचा विषय आहे. सुनीता विलियम्स हि पहिली अशी अंतराळवीर होती जिने ५० तास स्पेस वॉक करण्याचं रेकॉर्ड बनवलं होतं. हा वॉक स्पेस स्टेशनमध्ये नव्हता तर स्पेस शटलच्या बाहेर होता.

२००७ मध्ये ऑर्बिटमध्ये असताना सुनीता विलियम्सने बोस्टन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. तेव्हा अंतराळात मॅरेथॉन धावणारी पहिलीच व्यक्ती म्हणून सुनीता विलियम्सच्या नावे हा रेकॉर्ड झाला.

सुनीता विलियम्सने ट्रेडमिलवर मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी चार तास घेतले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि त्या प्रोसिजरमध्ये किमान दोनदा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली गेली होती. दोनवेळा वेगवेगळे रेकॉर्ड सुनीता विल्यमसच्या नावे झाले होते.

सुनीता आपल्या कारकिर्दीमध्ये हेलिकॉप्टर पायलट, जलतरणपटू, नौसैनिक, मॅरेथॉन अशा सगळ्या प्रकारात पटाईत होती. २००८ मध्ये भारत सरकारने सुनीता विलियमसच्या विशेष कामगिरीमुळे तिला पदमभूषण देऊन गौरविण्यात आलं होतं.

कल्पना चावला नंतर सुनीता विलियम्सला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं. भारताची दुसरी महिला अंतराळवीर म्हणून तिचा मोठा गौरव करण्यात आला होता. आजही स्त्री शक्तीचा जागर करण्याच्या अभियानात सुनीता विलियम्सचं नाव घेतलं जातं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.