तेव्हापासून सनीपाजींना पाकिस्तानमध्ये येण्यास आजन्म बंदी घालण्यात आली आहे..

बॉलिवूड हे कधी भारतापुरतं मर्यादित नव्हतंच. आजही सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशातील लोकं बॉलिवूडवर भरभरून बोलताना दिसतात. बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचताना दितात, गाणी गाताना दिसतात. बॉलिवूडमधले अनेक पिच्चर आणि हिरो जगभरात लोकप्रिय आहेत.

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचे अनेक चित्रपट तुफान चालतात. शाहरुख, सलमान, आमिर हे खान त्रिकुट पाकिस्तानचा खूप मोठा फॅन बेस कमावून आहेत. रणबीर, दीपिका, करीना, आलिया हि मंडळीसुद्धा पाकिस्तानात आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून जगभर आपला डंका वाजवताना दिसतात. पण काही बॉलिवूड स्टार्स लोकांना पाकिस्तानमध्ये अजिबात पसंत केलं जात नाही. इतकंच नाही तर त्यांचे चित्रपट सुद्धा पाकिस्तानात लावू दिले जात नाही.

या बॉलिवूड स्टार्सपैकी एक स्टार म्हणजे सनी देओल. सनी देओल हा पाकिस्तानतला नावडता बॉलिवूड स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर सनी देओलच्या चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. सिनेमा हॉल मध्ये सनी देओलचा पिच्चर न लावण्यामागे केवळ पाकिस्तानी जनताच नाही तर पाकिस्तान सरकार सुद्धा जबाबदार आहे.

सनी देओलचे चित्रपट का बॅन आहेत ?

सनी देओलच्या अभिनयाबद्दल काय बोलायचं. म्हणजे भारतात ज्यावेळी सनी देओलचे चित्रपट लागायचे तेव्हा लोक तुफ्फान गर्दी करायचे, अगदी त्याचा रद्दी पिच्चर असला तरी लोकं तो हिट करायचे. थेटरात त्याच्या ऍक्शन सीन्सवर आणि डायलॉगवर लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायची. सनी देओल म्हणल्यावर पिच्चर हिट होणार इतकी खात्री तर निर्मात्यांना फिक्स असायची. आपल्या आवाजाची आणि अभिनयाची एक वेगळी शैली त्याने तयार केली होती.

पण असं काय घडलं कि सनी देओलच्या सिनेमांवर बंदी तर घातलीच गेली शिवाय पाकिस्तानमध्ये येण्याची सुद्धा त्याच्यावर बंदी घातली गेली. त्याच्या व्हिजावर आजीवन बंदी पाकिस्तानने घातली.

सनी देओलने देशभक्तीपर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याने जितके देशभक्ती वरचे पिच्चर केले ते सगळे तुफ्फान चालले. त्यात बॉर्डर, गदर- एक प्रेम कथा , माँ तुझे सलाम, द हिरो हे सिनेमे होते जे बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाले होते. पाकिस्तान सरकारने सांगितलं कि हे चित्रपट पाकिस्तान विरोधी आहे. यात सनी देओल हा कायम पाकिस्तानच्या विरोधात डायलॉगबाजी करत असतो. आणि त्याकाळात सनी देओलचे डायलॉग तर आपल्याला माहितीच आहेत.

हमारा हिंदुस्थान जिंदाबाद हे , जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा…..

पाकिस्तानी लोकांना हे मुळीच आवडणारं नव्हतं. सनी देओलच्या अशा भूमिकांमुळे तो पाकिस्तानात अप्रिय होत गेला.

२००१ साली सनी देओलचा गदर हा सिनेमा सुपरहिट झाला होता. यात तारासिंग हे पात्र सनी देओलने केलं होतं. ज्यात तो तारा सिंग भारत-पाकिस्तान सतत प्रवास करत असतो आणि सकीना नावाच्या पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडतो. पण सकिनाच्या वडिलांना हे मान्य नसतं मग बरेच राडे होतात आणि सनी देओल पाकिस्तानमध्ये जाऊन तिला भारतात आणतो.

यात सनी देओलने पाकिस्तान विरोधात बरीच डायलॉगबाजी केली होती. पण यानंतर मात्र सनी देओलचे सिनेमेच पाकिस्तानात बाद करण्यात आले. इतकंच नाही तर ब्रिटन, अमेरिका, आणि इतर ठिकाणसिक्सचे पाकिस्तानी फॅन्स सनी देओलच्या चित्रपटांना डीसलाईक करतात.

यावर सनी देओल स्पष्टीकरण देताना एका मुलाखतीत म्हणाला होता कि, भलेही मी तसे रोल केले असतील पण एक अभिनेता म्हणून तुम्ही युनिव्हर्सल असायला हवं. तशा भूमिका ऑर झाल्याने तसे रोल मी केले. पण पाकिस्तानी जनता आजही माझे सिनेमे आवडीने बघते. माझं कौतुक करते. हे बॅन प्रकरण सरकारमधल्या काही लोकांनी सुरु केलं आहे. त्यामुळे लोकांचा सपोर्ट असतोच. संधी मिळाली तर मी पाकिस्तानमध्येही जाईल माझ्या चाहत्यांना भेटण्यासाठी. 

बाकी काहीही असो सनी देओलच्या डायलॉगबाजीतून जे वातावरण तयार व्हायचं ते इतर कुठल्याही अभिनेत्यामुळे तयार होत नसायचं. गदर सिनेमा हा भारत पाकिस्तान संबंधावर बेतलेला असला तरी तो फक्त पिच्चर म्हणूनच पाहावा त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये असही सनी देओल म्हणाला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.