एकदा सुरु झालं की एन्डगेमचा विषयच नाय.. नाम है वायग्रा!

आत्ता मध्यंतरी ट्विटरवर एक कांड झाला. ट्विटरवर सनी नावाच्या एका युजरने इमर्जन्सी मॅसेज ट्विट केला. ज्यामध्ये सुरेश चव्हाण नावाच्या एका ‘बोगस’ पेशंटसाठी औषध पाहिजे होत. १०० मिलीग्रामचा डोस होता तो. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा बोगस पेशन्ट ऍडमिट असल्याचं सांगण्यात आल. त्याचा खोटा नंबरही त्या ट्विटमध्ये पोस्ट केला. स्वरा भास्करला त्याने हे ट्विट रिट्विट करण्याची विनंती केली. आणि बिचाऱ्या स्वराने ते औषध हवंय म्हणून रिट्विट ही केलं. आणि पुढं जे घडलं ते महाभयंकर होत.

जे औषध पाहिजे होत त्याच नाव होत.. सिल्डेनाफिल.

नाही का समजलं? वायग्रा म्हणतात त्याला सामान्य भाषेत..

हसू नका, आपल्या गल्लीबोळातल्या मेडिकलमध्ये सुद्धा मिळतंय ते, निळी गोळी असते बारकीशी.

सो बेसिकली लाइफ इज रेस, इफ यु डोन्ट रन फास्ट, यु विल बी लाईक

बोहोत ज्यादा पका हुआ, गला हुआ केला.

वायग्रा नहीं खाया तो क्या किया..?

आपल्याकडे आत्ताशी वायग्राचा किरण दिसायला सुरवात झालीय. याआधी पुरुष फ्रस्ट्रेट होऊन वर गेले खरं आशेचा किरण काय दिसला नाही. अमेरिकेत ही अशीच परिस्थिती होती. ४० वर्षांपेक्षा जास्त पुरुष आपलं सेक्स लाईफ सोडण्याच्या तयारीला लागलेले होते. सगळीकडे अंधकार दाटून आला होता.

अचानक आशेचा एक किरण दिसला. १९९८ मध्ये फायझर फार्मा कंपनीने सेक्स बॉम्ब तयार करुन खळबळ उडवून दिली. सगळं जगच बदलून ठेवलं या निळ्या गोळीने. ही छोटीशी निळी गोळी लाखो वृद्धांच्या कानात जाऊन सांगू लागली की, जनाब रुको जरा, अभि आपकी सेक्स लाईफ बाकी है!

ती गोळी नव्हती राव, निळी परीच अवतरली होती त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या खोडांच्या आयुष्यात..

पण ही व्हायग्रा नावाची गोळी सेक्ससाठी मुळीच तयार केली नव्हती. खरं तर १९९१ मध्ये, फायझर कंपनी एनजाइनासाठी (रक्ताचा प्रवाह कमी झाल्यामुळे छातीत दुखत) स्लाइडनेफिल सिट्रेट नावाच्या औषधाची तपासणी करीत होती. गोळी खाण्याच्या या प्रयोगात भाग घेणाऱ्या पुरुषांनी त्यांच्यात झालेल्या साइड इफेक्ट बद्दल सांगितले.

अमेरिकन रेडिओ सर्व्हिस एनपीआरने सांगितल्याप्रमाणे, हे औषध रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी तयार केलं गेलं. पण यातून काहीतरी वेगळंच ‘उठायला’ लागल. यामुळे बर्‍याच लोकांनी या गोळीला ‘फायझर रायझर’ अस पण म्हटलं. पुरुषांकडून मिळालेली ही माहिती कंपनीने गांभीर्याने घेतली. या दिशेने काम सुरु केल. आणि मग १ ९९८ मध्ये, लैंगिक जगात क्रांती घडविणारे हे औषध नपुंसकत्वासाठी रामबाण उपाय बनलं.

पेनीसच्या संबंधित समस्येसाठी जगातील लाखो पुरुष व्हायग्राकडे बघतात. पहिल्यांदा अमेरिकेचे रिपब्लिकन सेनेटर बॉब डोल हे या औषधाच्या जाहिरातीत झळकले. ते पुरुषांच्या सेक्सलाईफ बद्दल खुलून बोलले.

तथापि, व्हायग्राच्या कंपनीबद्दल महिलांची एक तक्रार होती. ती म्हणजे फायझरने महिलांच्या लैंगिक संबंधित समस्यांकडे लक्षच दिले नाही. अशा परिस्थितीत २०१५ मध्ये ‘फीमेल व्हायग्रा’ लाँच करण्यात आला. ज्या स्त्रियांना सेक्स आवडत पण स्टॅमिना कमी झालाय अशा स्त्रियांना समोर  लक्षात ठेवून हे डिझाइन केल.

पण, पुरुषांच्या व्हायग्राइतक ते प्रभावी सिद्ध झाल नाही. उलट यामुळे मळमळ होणं, उलट्या होणे, चिंताग्रस्त होण, आत्महत्या करण यासारखे बरेच मोठे दुष्परिणाम पाहायला मिळाले. पण फायझरच पुरुषी व्हायग्रा एकदम बाप होता.

चले तों चांद तक नहीं तो शाम तक, हा फंडाच बदलला बॉस फायझरने..

व्हायग्राचा वापर पुरुषांचं पेनीस इरेक्ट म्हणजेच स्ट्रेट करण्यासाठी केला जातो. व्हायग्राच्या टॅब्लेट घेतल्यास पेनिसमधून रक्तप्रवाह जोरदार सुरु होतो. ज्यामुळं चांगलाच जोर काढता येतो. सेक्सच्या मेन कोर्सचा टाइम लिमिट वाढवायचा असेल तर पेनिसमध्ये ब्लड फ्लो जास्त लागतो. व्हायग्रामध्ये सिल्डेनाफिल नावाचे एक रसायन आढळते, जे पेनिसमधला रक्तप्रवाह वाढवायला मदत करत.

व्हायग्राच्या गोळ्या कोणी खाऊ नये

ज्यांना हृदयाची समस्या आहे त्यांनी व्हायग्रा घेऊ नये. यामुळे हृदयावर दबाव वाढतो. कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाची औषध एकत्र घेता येत नाहीत. व्हायग्रा हाय प्रेशर तयार करत. त्यामुळं व्हायग्रा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

एकापेक्षा जास्त गोळ्या घ्यायच्या असतील तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

याच्या एका गोळीचा इफेक्ट साधारणतः तासभर राहतो. त्यामुळं बकाबक गोळ्या खाऊ नका नाहीतर रक्तपुरवठा खण्डित न होता डायरेक्ट ढगात जाल. 

विशेष सूचना: आजच जर व्हायग्राच नाव ऐकलं असेल तर आंबट शौकिनांसारखं लगेच ट्राय करु नका. पेनीस फ्लॅट झालं नाही तर भिडू कोणतीही जबाबदारी घेणार नाही.

हे ही वाचा भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.